गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात अल्-जझीराचे 5 पत्रकार ठार

व्हीडिओ कॅप्शन, गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात अल्-जझीराचे 5 पत्रकार ठार
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात अल्-जझीराचे 5 पत्रकार ठार

गाझा शहरातील अल-शिफा रुग्णालयाजवळ इस्रायलने केलेल्या हल्ल्यात प्रसिद्ध पत्रकार अनस अल-शरीफसह अल जझीराचे पाच पत्रकार ठार झाले आहेत.

शरीफ यांच्यासोबत आणखी एक प्रतिनिधी, मोहम्मद करेकेह, कॅमेरामन इब्राहिम झहेर, मोहम्मद नौफल आणि मोआमेन अलीवा हे सगळे रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पत्रकारांसाठी असलेल्या तंबूत होते, असे अल् जझीराने म्हटलं आहे.

इस्रायलच्या संरक्षण दलांनी (IDF) शरीफ यांना लक्ष्य केल्याची पुष्टी केली आहे, आणि त्यांच्यावर "हमासमधील दहशतवादी सेलचा प्रमुख" असल्याचा आरोप केला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)