'20-25 गुंडांनी माझ्या मुलाला खूप मारलं', जामनेरमध्ये तरुणाची हत्या का करण्यात आली?
'20-25 गुंडांनी माझ्या मुलाला खूप मारलं', जामनेरमध्ये तरुणाची हत्या का करण्यात आली?
सुलेमान रहीम पठाण या 21 वर्षीय तरुणाला जामनेरमधील एका कॅफेमध्ये काही जणांनी मारहाण केली. मारहाण एवढी जबर होती की, त्यातच सुलेमानचा मृत्यू झाला.
शेतकरी कुटुंबातल्या सुलेमानला पोलीस व्हायचं होतं. त्यासाठी त्याची तयारीसुद्धा सुरू होती. 11 ऑगस्टच्या दिवशी तो जामनेरच्या कॅफेत काही मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी गेला, पण तिथंच त्याच्यावर काही जणांनी हल्ला केला.
त्याला उचलून त्याच्या गावी घेऊन गेले आणि कुटुंबासह त्याला पुन्हा मारहाण केली. एवढी मारहाण केली की त्यात त्याचा मृत्यू झाला.






