राहुल गांधींनी ज्या महादेवपुरात 'मतचोरी' झाल्याचा आरोप केला, तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे?

व्हीडिओ कॅप्शन, माधवपुरातून मतचोरी झाल्याचा आरोप केला आहे, तिथून काय समोर आलं?
राहुल गांधींनी ज्या महादेवपुरात 'मतचोरी' झाल्याचा आरोप केला, तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे?

मुनी रेड्डी गार्डन हे बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातल्या महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघाच्या एका कोपऱ्यात आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींनी जेव्हा मतदान चोरीचे आरोप केले तेव्हा, लहान लहान घरांचा हा भाग चर्चेत आला. कारण इथल्या घर क्रमांक 35 मध्येच 80 मतदारांची नोंदणी असल्याचा दावा करण्यात आला होता. या घरमालकांचं आणि तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे, ते जाणून घेऊयात.