पंतप्रधान नरेंद्र मोदींनी GST विषयी केलेल्या घोषणेचा अर्थ काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 21 सप्टेंबर रोजी देशाला संबोधित करत 'नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स'च्या घोषणेचा पुनरुच्चार केला.
त्यांनी म्हटलं की, "उद्यापासून नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू होतील. एकप्रकारे उद्यापासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरु होतो आहे.
या जीएसटी बचव उत्सवामुळे आपली बचत वाढेल आणि तुम्ही आपल्या पसंतीच्या गोष्टी अधिक सोयीस्करपणे खरेदी करु शकाल."
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लागू होणाऱ्या या बदलांमुळे बचत उत्सव सुरु होईल, असं म्हणत पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "देशातील गरीब, मध्यमवर्गीय, नव मध्यमवर्गीय, युवा, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी, उद्योजक सगळ्यांनाच या बचत उत्सवाचा खूप फायदा होईल."
या नव्या सुधारणांमुळे छोटे दुकानदान देखील उत्साहात आहेत, हे सांगताना ते म्हणाले की, "आम्ही 'नागरिक देवो भव:' या मंत्रासोबत पुढे जात आहोत. नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्समध्ये याची स्पष्ट झलक दिसून येते."
पण या घोषणेचा अर्थ कसा लावायचा?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन)






