'माझा जीव वाचवण्यासाठी मी टॅटू काढला'

टॅटू

फोटो स्रोत, ARQUIVO PESSOAL

फोटो कॅप्शन, टॅटू

अमांडा मुनारेटी सेलबाख (39) यांना लहानपणीच एक गोष्ट समजली होती. ती म्हणजे dipyrone संयुग असलेलं कोणतही औषध घेतलं की त्यांच्या सर्वांगाला मुंग्या यायच्या आणि खाजही सुटायची.

सुरुवातीला ही सगळी लक्षणं ते औषध शरीरात काम करत असल्यामुळे होत असावं असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु नंतर ही औषधं घेतल्यानंतर होणारा त्रास अधिकच वाईट होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

आता व्यवसाय सांभाळणाऱ्या अमांडा सांगतात, हे औषध घेतलं की माझं तोंड आणि डोळे सुजायला लागले. नंतर स्थिती त्याहून जास्त बिघडू लागली. घसा पूर्ण बंद होऊ लागला आणि श्वास घ्यायलाही त्रास होत असे.

ही लक्षणं गंभीर होत गेल्यानंतर त्यांनी वैद्यकीय मदत घेतली आणि अलर्जी टेस्ट केल्या त्यात अमांडा या सर्व प्रकारच्या नॉन स्टिरॉयडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज NSAID च्या बाबतीत संवेदनशील (अलर्जी) असल्याचं समजलं.

शरीरात दाह किंवा जळजळीमुळे तयार होणाऱ्या वेदना क्षमवण्यासाठी NSAID औषधं वापरली जातात. यात डायक्लोफेनॅक, आयब्रुफेन, पॅरासिटमॉल, निम्सुलाईट आणि असेटीलसलिक्लिक अँसिड ही औषधं असतात.

दोनवेळा गरोदरपण

या अॅलर्जीचा सर्वात मोठा पहिला तडाखा त्यांना 2011 मध्ये बसला. त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी त्यांचं सिझेरियन करण्यात आलं तेव्हा हा त्रास झाला.

आपल्याला अनेक औषधांची अँलर्जी आहे हे माहिती असल्यामुळे त्यांनी तशी डॉक्टरांना माहिती दिली होती. पण त्यांच्यामते त्याचा उपयोग झाला नाही.

टॅटू

फोटो स्रोत, ARQUIVO PESSOAL

फोटो कॅप्शन, अमांडा

अमांडा सांगतात,“ शस्त्रक्रीयेनंतर होणारा दाह कमी करण्यासाठी मला अँट इन्फ्लमेटरी औषध देणं गरजेचंच होतं असं डॉक्टरांनी सांगितलं. मुलीचा जन्म झाल्यावर मला लगेचच बरं नाहीसं वाटू लागलं. अंगात मुंग्या आल्यासारखं झालं. मला बोलताच येईना, श्वासही घेता येईना, मी जवळपास मेलेच होते.

” त्या औषधांचा प्रभाव कमी करण्यासाठी मला वेगळी औषधं देण्याची गरज होती.

त्याच्या पुढच्यावर्षीच त्यांचं दुसरं बाळ जन्माला आलं. यावेळेही सिझेरियनच्यावेळेस त्यांना अँटी इन्फ्लमेटरी औषधं देण्यात आली. यावेळेसही त्यांचा घसा सुजला, श्वासनलिकाच बंद झाल्यासारखं झालं आणि फुप्फुसापर्यंत हवाच जाणं कठीण झालं.

यावेळेस श्वासनलिकेचं कंठातलं मुख मी ऑपरेशन बाळंतपण खोलीत असतानाच बंद झालं. डॉक्टर घाबरून गेले तिथंच मला अलर्जी नियंत्रणात आणणारी औषधं देणं गरजेचं होतं.

टॅटू

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यांबरोबरच अमांडा यांनी एक निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या हातावर एक टॅटू काढून घेतला. यात आपल्याला काही औषधांची अॅ लर्जी असून अशा स्थितीत काय करायचं ते लिहिलं.

टॅटू

फोटो स्रोत, ARQUIVO PESSOAL

फोटो कॅप्शन, टॅटू

मला सर्वात जास्त भीती वाटत होती ते म्हणजे माझा अपघात झाला तर काय करायचं. माझ्या अलर्जीबद्दल मी कसं सांगणार याची काळजी वाटे. पाकिटात लिहून ठेवणं वगैरे अशावेळी कामाला आलं नसतं. कारण एकदम घाईच्यावेळेस पाकिट वगैरे कोणी पाहाणार नाही. आधीच हातावर गोंदवलं असल्यामुळे मदत करणाऱ्यांना ते सहज समजेलं. असं त्या सांगतात.

2018 साली टॅटू काढल्यानंतर अशाप्रकारची वैद्यकीय आणीबाणीची स्थिती आली नाही असं त्या सांगतात.

डॉक्टरांसाठी उपयोगी

अशाप्रकारच्या टॅटूंना फंक्शनल टॅटू म्हणतात, अनेक लोक अशी आरोग्याबद्दलची माहिती किंवा रक्तगट गोंदवून घेतात.

साओ पावलो येथिल डॉक्टर अनुआर सालेह हातोम सांगतात, रुग्ण अत्यवस्थ आणि बोलण्याच्या स्थितीत नसतो तेव्हा या माहितीचा उपयोग होतो.

टॅटू

फोटो स्रोत, ARQUIVO PESSOAL

फोटो कॅप्शन, अमांडा

रुग्ण आला की आधी आम्ही अशी काही माहिती आहे का पाहातो, त्याच्या शरीराचं निरीक्षण करतो. असं काही त्याच्या अंगावर असेल तर मदत होते.

डॉक्टरांच्या मते असे टॅटू सहज दिसतील अशा पद्धतीने काढलेले असावेत, जेणेकरुन मदत करायला सोपं जाईल.

टॅटू काढण्यापूर्वी ते सहन करण्याची ताकद तुमच्या शरीरात आहे का ते पाहावं. संसर्ग किंवा संसर्गजन्य आजार होणार नाही याची काळजी घ्यावी. टॅटू काढणं हे स्वच्छता पाळल्या जाणाऱ्या ठिकाणीच व्हावं.

टॅटू काढताना योग्य ती खबरदारी घेतली नाही तर काही गंभीर आजारांचा संसर्गही होऊ शकतो.

टॅटू ऐवजी आपली वैद्यकीय माहिती देणारं ब्रेसलेट घालणं, जवळच्या माणसांना आपल्या आरोग्याची पूर्ण माहितीदेणं, मोबाईलमध्ये अलर्जीची माहिती ठेवणं, सर्व माहिती लिहिलेलं एखादं प्लास्टिक कार्ड पर्समध्ये बाळगणं असे उपायही करता येतील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)