मोदींनी 'मन की बात'मध्ये कौतुक केलं, त्या शेतकऱ्याच्या 'मन की बात' ऐका...

व्हीडिओ कॅप्शन, नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये धुळ्याच्या याच शेतकऱ्याचं कौतुक केलं होतं
मोदींनी 'मन की बात'मध्ये कौतुक केलं, त्या शेतकऱ्याच्या 'मन की बात' ऐका...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2020 च्या नोव्हेंबर महिन्यात तत्कालीन कृषी कायद्यांचं महत्त्व पटवून सांगताना ‘मन की बात’ या कार्यक्रमात शेतकरी जितेंद्र भोईंचा उल्लेख केला.

जितेंद्र भोई धुळे जिल्ह्यातल्या भटाणे गावात राहतात. त्यांना तत्कालीन कृषी कायद्यांचा फायदा झाला. व्यापाऱ्याकडे अडकलेले मक्याचे पैसे त्यांना परत मिळाले. पण हमीभाव न मिळाल्यामुळे त्यांना नुकसान सहन करावं लागलं.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं जितेंद्र भोई यांच्या गावी भेट दिली आणि त्यांना सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या.

रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट – किरण सायनेकर