'किस' प्रकरणानंतर स्पेन फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षांचं निलंबन

लुईस रुबियालेझ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लुईस रुबियालेझ

'वादग्रस्त किस’प्रकरणी स्पेनच्या फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष लुईस रुबियालेझ यांना निलंबित करण्यात आलं आहे. फिफाच्या शिस्तपालन समितीनं याबाबत माहिती दिली आहे.

रुबियालेझ हे 2018 पासून स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष होते.

नेमकं प्रकरण काय?

"स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष लुईस रुबियालेझ यांनी आपलं चुंबन घेतलं, पण त्यासाठी आपण संमती दिली नव्हती," असं स्पॅनिश महिला फुटबॉलपटू जेनी हरमोसो यांनी आरोप केला.

त्यानंतर, जोपर्यंत रुबियालेझ यांना पदावरून हटवलं जात नाही, तोपर्यंत मैदानात उतरणार नसल्याची भूमिका स्पेनमधील 80 हून अधिक महिला खेळाडूंनी घेतली.

त्यानंतर या प्रकरणानं गंभीर वळण घेतलं आणि या प्रकरणाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले.

गेल्या रविवारी (20 ऑगस्ट) महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्पेननं इंग्लंडचा पराभव केला होता.

यादरम्यान रुबियालेझ यांनी स्पॅनिश महिला खेळाडू जेनी हरमोसोचं चुंबन घेतलं होतं.

तेव्हापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. पण त्याकडे त्यांनी आजतागायत दुर्लक्ष केलं होतं.

रुबियालेझ यांनी काय म्हटलं होतं?

शुक्रवारी (25 ऑगस्ट) रुबियालेझ यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आणि म्हटलं की, हे चुंबन खेळाडूच्या संमतीने घेतलं होतं.

लुईस रुबियालेझ

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, लुईस रुबियालेझ

दरम्यानच्या काळात रुबियालेझ यांना पदावरून हटवण्यासाठी स्पेन सरकारनं कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती.

स्पेनमधील फुटबॉलच्या अनेक महत्त्वाच्या प्रायोजकांनीही याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

या किसमुळे सुरू झालेल्या वादानं स्पेनमध्ये महिलांच्या हक्कांबाबत दीर्घकाळ चाललेल्या लढ्याला आक्रमक रुप दिलं आहे.

जेनी हरमोसो कोण आहे?

या सर्वांच्या केंद्रस्थानी असलेली खेळाडू म्हणजे जेनी हरमोसो. ती स्पेनची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू मानली जाते.

तिच्याबद्दलही आपण थोडक्यात जाणून घेऊ.

जेनी हरमोसो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेनी हरमोसो

जेनी हरमोसोच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा -

  • 1990 मध्ये जन्मलेली हरमोसो सध्या मेक्सिकन क्लब सीएफ Pachuca कडून खेळते.
  • ती अॅटलेटिको माद्रिदचा गोलरक्षक अँटोनियो हर्नांडेझची नात आहे आणि वयाच्या 12 व्या वर्षापासून तिनं फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली.
  • ती स्पेन आणि युरोपमधील अनेक क्लबकडून खेळली आहे. तिनं तिची बहुतेक कारकीर्द एफसी बार्सिलोना क्लबसाठी घालवली आहे. या क्लबसाठी ती 2013 ते 2017 आणि 2019 पासून गेल्या वर्षापर्यंत खेळली.
  • हरमोसो ही महिलांच्या खेळातील सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड्सपैकी एक म्हणून ओळखली जाते आणि स्पेन आणि बार्सिलोना या दोन्ही देशांसाठी तिच्याकडे लिजेंड म्हणून पाहिलं जातं.
  • ती दोन्ही संघांसाठी सर्वाधिक गोल करणारी खेळाडू आहे. तिने बार्सिलोनासाठी 181 आणि स्पेनसाठी 51 गोल केले आहेत.
  • हरमोसोनं सहा स्पॅनिश लीग विजेतेपदं पटकावलीआहेत. याशिवाय चॅम्पियन्स लीगही जिंकली आहे. विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. स्पॅनिश लीगमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जाणारा Pichichi पुरस्कार तिनं आतापर्यंत विक्रमी अशा पाच वेळा मिळवला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)