मैथिली पाटीलच्या विमान अपघातातील मृत्यूला एक महिना उलटला, पण अद्यापही मदत नाही; कुटुंबीय काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, मैथिली पाटीलच्या विमान अपघातातील मृत्यूला एक महिना उलटला पण मदत मिळाली नाही कुटुंबीयांनी खंत व्यक्त केली
मैथिली पाटीलच्या विमान अपघातातील मृत्यूला एक महिना उलटला, पण अद्यापही मदत नाही; कुटुंबीय काय म्हणाले?

अहमदाबाद विमान अपघाताला आज एक महिना झाला. त्याचबरोबर या दुर्घटनेचा प्राथमिक तपास अहवालही (प्रिलीमिनरी रिपोर्ट) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या अपघातामध्ये पनवेल जवळील शेवा गावच्या 23 वर्षांच्या मैथिली पाटीलचे निधन झालं होतं. मैथिली दुर्घटनाग्रस्त विमानात कॅबिन क्रू होती.

या अपघातानंतर आश्वासनं तर मिळाली पण गेल्या महिनाभरात प्रशासनाकडून काहीही ठोस मदत मिळाली नसल्याची खंत तिच्या कुटुंबियांनी बोलून दाखवलीये.