बीबीसी न्यूज पंजाबीचं ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू

वारिस पंजाब दे संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांचा पोलीस गेल्या काही दिवसांपासून शोध घेत आहेत. या कारवाई दरम्यान काही ट्विटर अकाउंट सरकारकडून ब्लॉक करण्यात आले आहेत त्यामध्ये बीबीसी पंजाबीचा देखील समावेश होता.
आता हे अकाऊंट पुन्हा सुरू झालं आहे.
बीबीसी न्यूज पंजाबीचे अकाउंट पाहिल्यानंतर अकाउंट विथहेल्ड असा मेसेज त्यावर झळकत होता.
यानंतर बीबीसीने भारत सरकारला बीबीसी पंजाबीचे अकाउंट ब्लॉक केल्याबद्दल इमेल पाठवला होता. सरकारकडून त्याचे उत्तर आल्यावर हे या बातमी अपडेट केले जाईल.
पण काही तास बंद राहिल्यानंतर तुर्तास बीबीसी न्यूज पंजाबीचं ट्विटर अकाउंट सुरू करण्यात आलं आहे.
पंजाबमधील अनेक पत्रकारांचे, लेखकांचे, विश्लेषकांचे, राजकीय कार्यकर्त्यांचे अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहेत.
भारत सरकारने बीबीसीला दिलेल्या एका उत्तरात म्हटलं आहे की माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने असा कोणताही आदेश ट्विटरला दिलेला नव्हता.
बीबीसीने केलेल्या ईमेलला भारत सरकारने दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे, “आमच्याकडे ज्या नोंदी आहेत त्यानुसार सरकारने असा कोणताच आदेश ट्विटरला दिला नव्हता.”
मंत्रालयाच्या मते बीबीसीची तक्रार ट्विटरला पाठवण्यात आली आहे आणि त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. मंत्रालयच्या मते बीबीसी थेट ट्विटरशी संपर्क साधू शकतं.
जर ट्विटरच्या उत्तराने समाधानी नसाल तर https://gac.gov.in यावर संपर्क साधा असंही सरकारने सांगितलं आहे.

अनेकांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक
चंदीगड येथील डिजिटल मीडिया ऑर्गनायजेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या गगनदीप सिंग यांचं ट्विटर अकाउंट 19 मार्च रोजीच ब्लॉक करण्यात आलं होतं. बीबीसी पंजाबीच्या अर्शदीप कौर यांच्याशी बोलताना गगनदीप यांनी सांगितलं की 'माझं ट्विटर अकाउंट 19 मार्च रोजी ब्लॉक करण्यात आलं होतं. ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारच्या सांगण्यावरुन हे झाले आहे.'
गगनदीप सिंग सांगतात, "मी 18 मार्च रोजी एक व्हीडिओ पोस्ट केला होता. हा व्हायरल व्हीडिओ होता. यात अमृतपाल सिंग आणि त्याचे सहकारी हे एका कारमध्ये बसलेले आहेत, असा व्हीडिओ मी पोस्ट केला होता. 18 मार्च रोजीचा हा व्हीडिओ होता."
गगनदीप यांच्याप्रमाणे संदीप सिंग यांचं अकाउंट देखील ब्लॉक करण्यात आले आहे. संदीप सिंग हे मुक्त पत्रकार आहेत. त्यांनी विविध माध्यमांसाठी आपले लेख दिले आहेत.
संदीप सिंग यांनी बीबीसी पंजाबीचे पत्रकार अवतार सिंग यांना सांगितले की "मी 20 मार्च रोजी काही स्क्रीनशॉट्स टाकले होते. ज्यात ट्विटरने इतर पत्रकारांचे अकाउंट रद्द केले अशी पोस्ट मी केली होती. संध्याकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की माझंच अकाउंट ब्लॉक करण्यात आलं आहे."
संदीप पुढे सांगतात की, जेव्हापासून अमृतपाल सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मुद्दा गाजतोय त्या दिवसापासून मी सर्व माहिती देत होतो. मी फक्त तीच माहिती शेअर करत होतो जी टीव्हीवर येत होती. वेगळी अशी कुठली माहिती नव्हती.
त्यांनी पुढे सांगितले की, "ज्या संस्था सरकारच्या इच्छेप्रमाणे काम करतात त्यांच्या अकाउंटला काही करण्यात आले नाही, पण ज्या संस्था किंवा माध्यम समूह वेगळी माहिती देतात किंवा वेगळा दृष्टिकोन बाळगतात त्यांच्याविरोधात मात्र कारवाई करण्यात आली आहे."
आतापर्यंत एकूण 75 जणांचे अकाउंट ब्लॉक करण्यात आली आहे. त्यांची यादी एका पत्रकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी पंजाबीला दिली आहे.
या यादीनुसार 75 जणांचे अकाउंट भारतात रद्द करण्यात आले आहे, बीबीसीने स्वतंत्ररीत्या याची पडताळणी केलेली नाही.
बीबीसी पंजाबीचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक
बीबीसी न्यूज पंजाबीचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं आहे. ट्विटरने ही माहिती इमेलद्वारे दिली आहे.
“भारत सरकारने कायदेशीर मागणी केल्याप्रमाणे पारदर्शकता ठेवण्यासाठी आपलं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करत असल्याची माहिती आपणांस देण्यात येत आहे.” अशी माहिती ट्विटरने इमेलद्वारे दिली आहे.
माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चा भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. यासाठी ट्विटर ने बीबीसी पंजाबीच्या दोन स्टोऱ्यांचा दाखला दिला आहे.
या कायद्यानुसार ट्विटर अकाऊँट ब्लॉक करता येतं असं ट्विटरने सांगितलं आहे. मात्र ट्विटरवर शेअर केलेलं कंटेट इतर ठिकाणी उपलब्ध असतो.
भारताच्या गृहमंत्रालयाच्या ते संपर्कात असून अकाऊंट बद्दल काही अपडेट असतील तर कळवण्यात येईल असंही ट्विटरने पुढे म्हटलं आहे.
अमृतपाल सिंह ने खलिस्तानची मागणी केल्यावर पंजाबच्या अनेक पत्रकारांच्या ट्विटर खात्यावर बंदी आणण्यात आली आहे.
पंजाब पोलिसांच्या मते अमृतपाल सिंह अजूनही बेपत्ता आहे.
ट्विटर अकाऊंट कधी ब्लॉक केलं जातं?

ट्विटरच्या हेल्प सेंटरनुसार, “ ट्विटर अकाऊंटबद्दल बहुतांश देशांचे सारखेच नियम असतात. एखाद्या विभागाकडून किंवा प्रशासनाकडून तक्रार आली तर आम्ही तिथला मजकूर किंवा ते अकाऊंट बंद करतो”
“ज्या देशाने किंवा राज्याने तक्रार केली तितक्या सीमेपर्यंतच ही कारवाई मर्यादित असते.”
ट्विटरच्या मते “पारदर्शीपणा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे ब्लॉक केलेल्या अकाऊंट साठीसुद्धा काही धोरणं असतात. एखाद्या विभागाने किंवा व्यक्तीने काही तक्रार केली तर आम्ही युझरला तशी नोटीस देतो.
कोण काय म्हणालं?
ही बातमी आल्यानंतर अनेकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

पत्रकार आदित्य राज कौल म्हणाले, “पंजाबमधली कायदा आणि सुव्यवस्था तसंच भारताविरोधी कारवाया पंजाबमध्ये सुरू असल्यामुळे बीबीसी पंजाबीचं अकाऊंटवर बंदी आणण्यात आली आहे.”



हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








