नरेंद्र मोदीः चंद्रयान-3 जिथे उतरले त्या जागेला ‘शिवशक्ती’ नाव

modi

चंद्रयान-3 हे चंद्रावर ज्या ठिकाणी उतरलं, त्या ठिकाणाला 'शिवशक्ती' हे नाव देण्यात यावं, तर 2019 साली अपयशी ठरलेल्या चंद्रयान-2 चे ज्या ठिकाणी पाऊलखुणा आहेत, ते ठिकाण यापुढे 'तिरंगा पॉईंट' म्हणून संबोधण्यात यावं, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आज (26 ऑगस्ट) सर्वप्रथम इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. बंगळुरू येथील इस्रोच्या कार्यालयात इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांची भेट घेतल्यानंतर मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांशी संवाद साधला.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. तसेच या मोहिमेच्या माध्यमातून भारताचं नावलौकिक वाढवल्याबद्दल सर्वांचे आभारही मानले.

आपल्या भाषणात मोदी म्हणाले, “तुम्हाला भेटून मला एका वेगळ्याच आनंदाची अनुभूति होत आहे. व्यक्तीच्या जीवनात अनेक अशा घटना घडतात. ज्यावेळी उत्सुकता अत्यंत शिगेला पोहोचलेली असते. यावेळी माझ्यासोबतही तसंच झालं.”

“मी दक्षिण आफ्रिकेत होतो, नंतर ग्रीसला कार्यक्रम होता. पण माझं मन फक्त तुमच्यासोबतच होतं. पण कधी कधी मला वाटतं, मी तुमच्यासोबत अन्याय करतो की काय. उत्सुकता माझी आणि त्यामुळे तुम्हाला त्रास देतो. इतक्या सकाळी सकाळी तुम्हाला इथे बोलावलं,” असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, हे बोलत असताना नरेंद्र मोदी काहीसे भावुक झाल्याचं दिसून आलं. त्यांचा आवाज खोल झाला आणि डोळ्यात अश्रूही दिसले.

modi

फोटो स्रोत, TWITTER

पुढे मोदी म्हणाले, “भारतात येताच लवकरात लवकर मला तुमचे दर्शन घ्यायचे होते. तुम्हा सर्वांना सॅल्यूट करायचं होतं. तुमची मेहनत, धैर्य, चिकाटी आणि इच्छाशक्ती या सगळ्यांना माझं सॅल्यूट आहे. देशाला तुम्ही इतक्या उंचीवर घेऊन गेलात, हे काही साधारण यश नाही. हा अंतराळात घुमत असलेला भारताच्या सामर्थ्याचा शंखनाद आहे.

modi

फोटो स्रोत, TWITTER

‘इंडिया इज ऑन द मून’, आपण तिथे पोहोचले, जिथे आजवर कुणीच पोहोचू शकलं नव्हतं. जे कुणीच कधी केलेलं नव्हतं, आपण ते करून दाखवलं आहे. हा नवा भारत आहे. नवा भारत जो काही विचार करतो, नव्या पद्धतीने करतो. अंधकारात प्रकाशाचे किरण सोडण्याची धमक भारतात आहे. एकविसाव्या शतकात हाच भारत जगभरातील समस्यांवर तोडगा शोधेल.

माझ्या डोळ्यात 23 ऑगस्टचा तो क्षण वारंवार उभा राहतो. ज्यावेळी लँडर चंद्रावर उतरलं, तेव्हा इस्रोच नव्हे तर संपूर्ण देशभरात लोक उत्साहाने भारावून गेले, तो क्षण कोण विसरू शकतो.”

प्रत्येक भारतीयाला आपला विजय होणार असल्याचं माहीत होतं. मिशन यशस्वी झाल्यानंतर आपण परीक्षेत पास झाल्यासारखं प्रत्येकाला वाटलं. अजूनही त्यासाठी अभिनंदन केलं जात आहे. हे सगळं तुमच्यामुळेच शक्य झालं. यासाठी तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे.

नरेंद्र मोदी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आता मी एक फोटो पाहिला. ज्यामध्ये रोव्हर आपले पाय रोवून चंद्रावर उभा आहे. विविध अँगलने घेतलेले फोटो आणि व्हीडिओ येत आहेत. मानवी इतिहासात पहिल्यांदा त्या ठिकाणाचे फोटो आपण पाहत आहोत. ते जगाला दाखवण्याचं काम भारताने केलं आहे. संपूर्ण जगाने भारताचं वैज्ञानिक सामर्थ्य मान्य केलं आहे. पण हे केवळ भारताचंच यश नसून संपूर्ण मानव जातीचं यश आहे. आपलं मिशन ज्या क्षेत्राचा आढावा घेईल, त्यामुळे सर्वांनाच फायदा होईल.

अंतराळात केल्या जाणाऱ्या मोहिमांमध्ये टच डाऊन पॉईंटला (यान उतरलेल्या ठिकाणी) एक नाव देण्याची परंपरा आहे. चंद्रावर ज्या ठिकाणी आपलं चंद्रयान उतरलं, त्या ठिकाणाला नाव देण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. ज्या ठिकाणी चंद्रयान-3 चं लँडर उतरलं, ते ठिकाण आता ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखलं जाईल. शिवामध्ये मानव जातीच्या कल्याणाचा संकल्प आहे. तर शक्तीतून आपल्याला ते सामर्थ्य मिळतं. चंद्रावरील शिवशक्ती पॉईंट हे हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत जुळलेले असल्याचा बोध देतो.

याशिवाय आणखी एक नामकरणाला बराच काळ विलंब झालेला आहे. जेव्हा चंद्रयान-2 अयशस्वी ठरल्यानंतर त्याच्या पाऊलखुणा चंद्रावर एका ठिकाणी होत्या. तेव्हाही त्या ठिकाणाला नाव देण्याचा प्रस्ताव होता. पण त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की चंद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचल्यानंतरच या दोन्ही ठिकाणांना नाव देण्यात यावं.

त्यामुळे चंद्रयान-2 च्या पाऊलखुणा आहेत, ठिकाणाला यापुढे ‘तिरंगा पॉईंट’ संबोधण्यात येईल, असा निर्णय आम्ही घेतला आहे. कोणतंही अपयश हा शेवट नसतो, हे तिरंगा पॉईंट सतत सांगत राहील, असंही मोदींनी म्हटलं.

चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारा भारत हा चौथा देश बनला आहे. भारताने हा प्रवास कुठून सुरू केला, हे पाहिलं तर हे यश किती मोठं आहे, याची कल्पना येऊ शकते. एक काळ असा होता, जेव्हा भारताला तिसऱ्या जगतातील देश म्हणून ओळखलं जात असे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)