काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधन

फोटो स्रोत, Facebook
काँग्रेसचे महाराष्ट्रातील खासदार बाळू धानरकर यांचं गुरुग्राम (हरियाणा) मधील मेदांता रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बाळू धानोरकर हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करत होते. ते काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार होते.
पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आज (30 मे) सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने त्यांचं पार्थिव चंद्रपुरात आणण्यात येईल. तर उद्या (31 मे) वरोरा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी ही माहिती दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार बाळू धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते.

फोटो स्रोत, Facebook
बाळू धानोरकरांचा अल्पपरिचय
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास त्यांनी शिवसेनेत केला.
वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघात ते काम करत असताना, त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.
2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला आणि परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.
काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार
2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसला विजय मिळवून दिला.
लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते.
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन खासदार झाले होते.
धानोरकरांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद - सतेज पाटील
माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आदरांजली व्यक्त करताना म्हटलं की, "चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार सुरेश नारायण उर्फ बाळू धानोरकर यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. ईश्वर त्यांना सदगती देवो. आम्ही धानोरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
मिलिंद नार्वेकरांकडून धानोरकरांना आदरांजली
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आदरांजली अर्पण केलीय.
नार्वेकर ट्वीटमध्ये म्हणाले की, "चंद्रपूरचे खासदार आणि माझे मित्र बाळू धानोरकर जी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. प्रतिभा वहिनी आणि धानोरकर कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगातून सावरण्यास ईश्वर बळ देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली!"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
माझ्या कुटुंबातील सदस्य गमावला - बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळू धानोरकरांना आदरांजली अर्पण केलीय.
बावनकुळे ट्वीटमध्ये म्हणाले की, "हा तरुण लोकनेता आता आपल्यात नाही. हे दुःखद वास्तव स्वीकारायला मन अजूनही धजावत नाही. बाळू धानोरकर यांच्या अकाली जाण्याने मी माझ्या कुटुंबातील सदस्य गमावला आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
धानोरकरांचं निधन दु:खद आणि धक्कादायक - रोहित पवार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आदरांजली अर्पण करताना म्हणाले की, "काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर (४८) यांचं उपचारादरम्यान निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! धानोरकर कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांना हे दुःख पचविण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना!"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
हे वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)