भारतीय महिला हॉकी संघासमोर ऑलिम्पिकमध्ये पोहोचण्यात कोणती आव्हानं आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मनोज चतुर्वेदी
- Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार
भारतीय महिला हॉकी संघाला ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला आहे.
त्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या संधी आता कमी झाल्या आहेत.
गेल्यावर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रूपांतर न केल्यामुळे भारतीय संघ सुवर्णपदकापर्यंत पोहोचू शकला नव्हता.
याच मैदानावर काही महिन्यांपूर्वी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने जी कामगिरी दाखवली ती पुन्हा पाहायला मिळाली नाही.
भारतीय महिला हॉकी संघाच्या पराभवां प्रमुख कारण
गेल्या काही काळापासून पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रूपांतर करता न आल्याने भारतीय संघाला फटका बसल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय.
सध्याच्या हॉकीमध्ये पेनल्टी कॉर्नर हे सामन्यांचे निकाल ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीय संघ अनेक दिवसांपासून या क्षेत्रात कमकुवत दिसत आहे.
जेव्हा भारतीय संघ SAI च्या बेंगळुरूमधील मैदानावर या स्पर्धेची तयारी करत होता, तेव्हा या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी भारताचे प्रसिद्ध ड्रॅग-फ्लिकर रुपिंदर पाल यांनी पाच दिवसीय शिबिराचं आयोजन केलं होतं.
त्यांनी आपल्या अनुभवातून खेळाडूंना खूप काही शिकवलं. पण संघात या क्षेत्रात कोणतीही सुधारणा दिसून आली नाही.
रुपिंदर पाल यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी अशाच प्रकारचं शिबिर आयोजित केलं होतं, परंतु त्यावेळीही संघाची हीच दुखरी बाजू राहिली.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ही उणीव दूर करण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्नांची गरज आहे.
चांगला ड्रॅग फ्लिकर बनवण्यासाठी खूप काम करावं लागतं. हे भारतीय पुरुष संघातील ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीतकडे पाहून समजू शकतं. त्यामुळे या क्षेत्रात कायमस्वरूपी तज्ज्ञ नेमण्याची गरज आहे.
ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या पहिल्याच सामन्यात भारताने 7 पेनल्टी कॉर्नर वाया घालवले.
भारतीय खेळाडूंनी थेट गोल करण्याचा प्रयत्न केला आणि अमेरिकन गोलरक्षक बिन केल्सीला पराभूत करण्यात ते यशस्वी झाले नाहीत.
भारतीय टीम मिळालेल्या संधींचा फायदा का घेत नाही?
अमेरिकेविरुद्धच्या सामन्यावर नजर टाकली तर एक गोष्ट दिसून येते की या सामन्यात भारताला गोल करण्याच्या अधिक संधी मिळाल्या. मात्र या संधींचा आपल्याला फायदा करता आला नाही. त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
मिळालेल्या संधींचा फायदा उठवता न येण्यामागचं कारण म्हणजे सर्कलमध्ये (D) पोहोचल्यानंतर आवश्यक असलेली हुशारी भारतीय खेळाडूंमध्ये दिसत नव्हती.
महिला टीम चांगले हल्ले करत अमेरिकन सर्कलमध्ये पुन्हा पुन्हा पोहोचत होती. पण त्यांना गोल करण्यात यश मिळालं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
आणखी एक गोष्ट म्हणजे भारतीय संघाला दबावात संतुलन राखायला शिकावं लागेल.
भारतीय संघ एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर बरोबरी साधण्याचा प्रयत्न करताना दिसला, पण या प्रयत्नांचं गोलमध्ये रूपांतर होऊ न शकल्याने वेळ निघून गेली.
त्यामुळे अनेकवेळा सलीमा आणि संगीता यांसारख्या खेळाडू वैयक्तिक आक्रमणं करून वेळ वाया घालवताना दिसल्या. त्यावेळी त्यांचं संतुलन ढासळल्याचं जाणवत होतं
भारतीय खेळाडू एवढे गोंधळलेले दिसले की आपल्या संघातील उदिताने अमेरिकेच्या हाफमध्ये चेंडू टाकण्याऐवजी स्वत:च्या गोलला समांतर पास देताना दिसली.
अनेकवेळा भारताला योग्य सापळा न लावण्याचे परिणामही भोगावे लागले.
भारतीय संघाने घाबरून जाणे आवश्यक आहे
पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघ कसातरी अमेरिकेच्या गोलपासून बचावला. मात्र दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला टेमर अबॅगेलच्या गोलने अमेरिकेने आघाडी घेतली तेव्हा भारतीय संघ पिछाडीवर पडला.
या दरम्यान स्वत:वर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे संघाला हल्ल्यांचं गोलमध्ये रूपांतर करता आलं नाही.
सध्याच्या हॉकीमध्ये कौशल्यासोबतच मानसिक बळही खूप महत्त्वाचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारताची कर्णधार सविता पुनियाने सामन्यापूर्वी मानसिकदृष्ट्या तयार असण्याबाबत बोलली. पण सामना सुरू झाल्यावर त्यांच्याकडे ही गोष्टी अजिबात दिसली नाही.
विरोधी सर्कलमध्ये पोहोचल्यानंतर हुशारी वापरणं खूप गरजेचं असतं. हे भारतीय संघाला शिकण्याची गरज आहे. या बाबतीत संघ कमकुवत दिसत होता.
फिनिशमध्ये देखील सुधारणा आवश्यक आहे
भारतीय संघाला आपलं आक्रमण अधिक चांगल्या पद्धतीनं पूर्ण करायला शिकावं लागेल.
या सामन्यात भारतीय संघ पूर्वार्धात 0-1 ने पिछाडीवर होता. पण संघाने आक्रमणं चांगल्या प्रकारे पूर्ण केली असती तर 3-1 अशी आघाडी घेता आली असती.
पहिला गोल झाल्यावर भारतानं आक्रमणांवर लक्ष केंद्रित करून अमेरिकेला पूर्णपणे बचाव करण्यास भाग पाडलं.
दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या 5 मिनिटांत भारतानं उत्तम ताळमेळ राखत आक्रमणाला सुरुवात केली. पण असे किमान तीन प्रसंग आले जेव्हा अमेरिकेला गोल करता आला असता.
मात्र घाईमुळे या हल्ल्यांचं गोलमध्ये रूपांतर करण्यात भारतीय आक्रमणकर्त्यांना यश आलं नाही.
भारतीय मुख्य प्रशिक्षक यानिक शॉपमन हे चार वर्षांपूर्वी अमेरिकन प्रशिक्षक म्हणून भारतात आले होते आणि त्यावेळी अमेरिकेला पात्रतेसाठी प्रयत्न करावे लागले होते.
त्यावेळी भारताने त्यांच्यावर विजय मिळवून अमेरिकेच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. यावेळी शॉपमन हे भारताचे मुख्य प्रशिक्षक असल्याने त्यांच्या संघाच्या मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली आहे.
या पराभवामुळे भारताला निश्चितच धक्का बसला आहे, पण न्यूझीलंड आणि इटलीविरुद्धचे पुढचे सामने मोठ्या फरकाने जिंकल्यास उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








