सोपी गोष्ट: जातीभेदामुळे लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होतोय का?
सोपी गोष्ट: जातीभेदामुळे लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होतोय का?
लहान मुलांची उंची त्यांच्या वयासाठी अपेक्षित उंचीइतकी नसेल, तर याला Stunting - वाढ खुंटणं म्हटलं जातं.
पुरेसं पोषण मिळत नसल्याची ही खूण असल्याचं मानलं जातं. भारतामध्ये आणि आफ्रिकेतल्या सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडच्या देशांमध्ये - म्हणजे Sub Saharan Africa भागामध्ये लहान मुलांची वाढ अशी खुंटण्याचं प्रमाण अधिक आहे.
भारतातलं हे प्रमाण सहारा वाळवंटाखालच्या आफ्रिकन देशांपेक्षाही अधिक असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय.
यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असल्या तरी सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरतोय - जातीभेद. जातीचा परिणाम लहान मुलांच्या वाढीवर होतोय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : सौतिक बिस्वास
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






