विकीलीक्सच्या ज्युलियन असांज यांनी अमेरिकेला कसं हादरवलं होतं?
विकीलीक्सच्या ज्युलियन असांज यांनी अमेरिकेला कसं हादरवलं होतं?
विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज आणि अमेरिकन प्रशासनामध्ये समझोता झाल्याचं विकीलीक्सने म्हटलंय.
यानुसार असांज युकेतून रवाना झाले असून ते अमेरिकेतील त्यांच्यावरील गुन्हेगारीच्या आरोपांमध्ये आपण दोषी असल्याचं स्वीकारल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात येईल.
अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीची माहिती उघड केल्याच्या आरोपात ते 1901 दिवस कोठडीत होते. ज्युलियन असांज कोण आहेत? विकीलीक्सचं नेमकं प्रकरण काय होतं? जाणून घ्या या सोपीगोष्टमध्ये
वार्तांकन - टीम बीबीसी
लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले






