वजन कमी करण्यासाठीच्या 'या' औषधाविषयी WHO ने काय इशारा दिलाय?
वजन कमी करण्यासाठीच्या 'या' औषधाविषयी WHO ने काय इशारा दिलाय?
वजन घटवणं किंवा Weight Loss याविषयी सगळीकडे चर्चा सुरू असतात. त्यासाठी वेगवेगळे सल्ले दिले जातात.
वजन घटवण्यासाठीचा असाच एक मार्ग - एक शॉर्टकट धोक्याचा धरू शकतो असा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिला आहे. हा इशारा आहे वेट लॉससाठीच्या एका औषधाबद्दल.
Ozempic हे औषध सध्या 'Weight Loss Drug' म्हणजे वजन घटवणारं औषध म्हणून प्रसिद्ध झालंय. याला Skinny Jab असंही म्हटलं जातंय.
पण याच प्रसिद्धीमुळे या औषधाचा अनेकदा तुटवडा निर्माण होतोय आणि सोबतच याच्या इतर अनेक आवृत्त्याही बाजारात आल्यायत. आणि याचविषयीचा खबरदारीचा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलाय. समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.






