तुर्की भूकंप: ढिगाऱ्यांमधून वाट काढत कुटुंबीयांना शोधणारे भेदरलेले चेहरे आणि तडफड

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या 24 तासांमध्ये सलग 2 वेळा आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तुर्की आणि सीरियामध्ये मोठी जीवित आणि वित्त हानी झालीय. आतापर्यंत 2300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक जखमी आणि बेघर झालेत.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
पहिला भूकंप लोक झोपेत असताना पहाटे झाला. त्यामुळे जखमींची संख्या मोठी आहे. गृहयुद्धात अडकलेल्या सीरियातल्या लोकांना उपचारांसाठी मदतीवर अवलंबून राहावं लागतंय.
तुर्कीच्या सीमेजवळ बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या बाब अल-हावामधल्या भागात लोकांनी रुग्णालयांमध्ये उपचार मिळवण्यासाठी मोठी गर्दी केलीय. घाबरलेले आणि भेदरलेले चेहरे इथं सर्वत्र दिसून येत आहेत.

फोटो स्रोत, EPA
इमारतींची ही अशी अवस्था झाली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

फोटो स्रोत, YASIN AKGUL via Getty Images
बचावकार्यादरम्यान 3 वर्षांच्या एका मुलीला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी मदत आणि बचावकार्य तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

फोटो स्रोत, Anadolu Agency via Getty Images
भूकंपामध्ये अनेक प्राणीसुद्धा मारले गेले आहेत. ढिगाऱ्यातून काही प्राण्यांनासुद्धा बाहेर काढलं जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या भूकंपाचे झटके तुर्की, सीरिया, लेबेनॉन, सायप्रस आणि इस्रायलमध्ये जाणवले. त्याचा केंद्र बिंदू तुर्कीतल्या गाझियानटेपजवळ होता.

फोटो स्रोत, Anadolu Agency via Getty Images
गाझियानटेपमधल्या या इमारतीमध्ये अनेक लोक अडकून पडले आहेत.

फोटो स्रोत, Anadolu Agency via Getty Images
तुर्कीच्या अदाना जिल्ह्यात सुरू असलेल्या बचावकार्याचा हा एरियल फोटो. यातून भूकंपाची विदारकता लक्षात येते.

फोटो स्रोत, Anadolu Agency via Getty Images
अनेक गाड्यासुद्धा ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जगभरातून तुर्कीला मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. अमेरिका आणि इस्रायलनेसुद्धा तुर्कीला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

फोटो स्रोत, Sana via Reuters
सीरियाच्या हामा शहारत अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहे.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)






