बीबीसीला झाली 100 वर्षं, जाणून घ्या 10 रंजक गोष्टी

बीबीसी ही जगातील सर्वांत मोठी ब्रॉडकास्टिंग कंपनी आहे. तिची स्थापना 18 ऑक्टोबर 1922 ला लंडनमध्ये झाली होती. बीबीसीला एका मोठा विविधांगी, उत्साहवर्धक आणि मोठा इतिहास आहे.
बीबीसीच्या शताब्दीच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या क्षणांवर, काही गोष्टींवर नजर टाकूया ज्यांनी बीबीसीच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ला 100 वर्षं पूर्ण झाली आहेत.
1. पहिलं रेडिओ स्टेशन
सुरुवातीच्या काळात काही रेडिओ स्टेशन बंद झाल्यावर मात्र बीबीसी ने त्यांचं दैनंदिन रेडिओ स्टेशन 14 नोव्हेंबर 1922 ला लंडनमध्ये ही सेवा सुरू केली.
रोज संध्याकाळी एक बातमीपत्र या स्टेशनवर यायचं. विविध वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातम्यांच्या आधारावर हे बातमीपत्र सादर व्हायचं. त्यानंतर हवामान वार्तापत्र सादर व्हायचं. हे वार्तापत्र नॅशनल मेट्रॉलॉजिक सर्व्हिसतर्फे तयार केलं जायचं.
हे वार्तापत्र आर्थर बरोस वाचायचे. ते कार्यक्रम संचालक या पदावर काम करायचे.

ते पूर्ण बुलेटिन एकदा वेगवान आणि एकदा कमी वेगात वाचायचे. श्रोत्यांना नोट्स घेता याव्या यासाठी ते असं करत.
2. वर्ल्ड सर्व्हिसची सुरुवात
19 डिसेंबर 1932 ला पंचम जॉर्ज यांनी युके आणि जगाच्या इतर भागांना उद्देशून ख्रिसमसच्या दिवशी एक भाषण केलं.
या भाषणात त्यांनी ही सर्व्हिस सुरू करण्याची घोषणा केली. ही सेवा, वाळवंट, शीतप्रदेश आणि समुद्र यांच्यामुळे वेगळ्या झालेल्या स्त्री पुरुषांसाठी ही सेवा आहे..
बीबीसी एम्पायर सर्व्हिसची त्या दिवशी सुरुवात झाली होती. त्यालाचा आता बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस असं म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
देश, भाषा आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस ही जगातील सगळ्यात मोठी ब्रॉडकास्टिंग सेवा आहे.
जवळजवळ 40 भाषांमध्ये बीबीसीचं ऑनलाईन, सोशल मीडिया, टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून प्रसारण होतं.
3.बीबीसीचा मायक्रोफोन
1930 च्या दशकातला मायक्रोफोन महाग होता. त्यामुळे बीबीसीने मॅक्रॉनी नावाच्या कंपनीबरोबर काम करत त्यांचा स्वत:चा एक मायक्रोफोन विकसित केला.
1934 मध्ये आलेल्या Type A मायक्रोफोनने प्रसारणाच्या क्षेत्रात क्रांती आणली.

या मायक्रोफोनचा उत्तरोत्तर विकास करण्यात आला आणि तो बीबीसी मायक्रोफोन म्हणून विविध ब्रिटिश सिरियल्स आणि नाटकांमध्ये ओळखला जाऊ लागला.
4. बीबीसी अरेबिक- पहिली प्रादेशिक भाषा सेवा.
बीबीसी अरेबिक ही पहिली प्रादेशिक रेडिओ सेवा म्हणून उदयाला आली.
ही सेवा 1938 मध्ये सुरू करण्यात आली. अहमद कमाल सोरुर इफेंदी या सेवेचा 'मुख्य आवाज' झाले.
ते आल्यामुळे ही सेवा एका रात्रीतच लोकप्रिय झाली. कारण इफेंदी अरब जगतात पूर्वीपासूनच अतिशय लोकप्रिय होते.

पुढच्या दशकात अशा अनेक प्रादेशिक सेवा सुरू करण्यात आल्या. रेडिओ आणि टेलिव्हिजन वर अनेक कार्यक्रम सुरू करण्यात आले.
बीबीसी ऑनलाईन चा जन्म 1997 मध्ये झाला. मग इतर भाषांमध्येही ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आल्या.
सोशल मीडियामुळे बीबीसी न्यूज आणि बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या भाषा सेवा विविध प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध झाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
सध्या बीबीसीने डिजिटल माध्यमांवर लक्ष केंद्रित केलं आहे.
5. बीबीसीच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला निवेदक
उना मॅरसन बीबीसीच्या पहिल्या वहिल्या कृष्णवर्णीय महिला निवेदक झाल्या.
उना मूळच्या जमैकाच्या होत्या. त्यांनी 1939 मध्ये बीबीसीत काम करायला सुरुवात केली तेव्हाही त्या अनुभवी पत्रकारच होत्या.

त्या सुरुवातीला अलेक्झांड्रा पॅलेस टेलिव्हिजन स्टुडिओज मध्ये सहायक होत्या. त्या 1941 मध्ये बीबीसीत पूर्णवेळ आल्या.
त्यांना कवितेची खूप आवड होती. त्यांच्या Calling the west series मुळे बीबीसीला कॅरेबियन आवाज मिळाला.
6. दुसऱ्या महायुद्धाचा शेवट
1 मे 1945 सा बीबीसीने हिटलरने आत्महत्या केल्याची बातमी दिली. संध्याकाळी सात वाजता संध्याकाळचे कार्यक्रम मध्येच थांबवण्यात आले. त्या दिवशीने जर्मनीने इटलीसमोर आत्मसमर्पण केलं होतं. 4 मे ला त्यांनी डेन्मार्कला घेरलं आणि युद्धाचा शेवट झाला.
असं झालंय याबद्दल अनेकांना पुढचे अनेक दिवस खात्री नसते. 7 मे ला बकिंगहॅम पॅलेससमोर अनेक लोक एकत्र जमले होते.
संपूर्ण देश पाच वर्षं ज्या बातमीची वाट पाहत होता ती शेवटपर्यंत आली नाही. नाझींचा नाश झाला आहे, हे अमेरिकन आणि रशियन लोकांकडून ऐकण्याची ब्रिटिश लोक वाट पाहत होते.

फोटो स्रोत, Getty Images
संध्याकाळी सहा वाजता बीबीसीने श्रोत्यांना सांगितलं की त्या दिवशी चर्चिल भाषण करणार नाही. मग 19.40 वाजता सर्व कार्यक्रम थांबवण्यात आले आणि पुढचा दिवस विजयाचा आहे असं जाहीर करण्यात आलं.
युरोपातील युद्ध संपलं होतं. चर्चिल यांनी दुसऱ्या दिवशी निवेदन केलं. अनेकांना ते ऐकण्याची उत्सुकता होती. लोकांनी तो दिवस साजरा केला.
बीबीसीने पुढचे दहा दिवस विशेष कार्यक्रम केले. त्या काळात ब्रॉडकास्टिंग हाऊसला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती.
7. बीबीसी टीव्ही जगभर पोहोचला
1967 मध्ये Our world या कार्यक्रमाने इतिहास रचला.
हा कार्यक्रम प्रसारित होण्याआधी सॅटेलाईटच्या माध्यमातून काही देशात प्रायोगिक तत्त्वावर सुरू होता.
1936 मध्ये High Definition दर्जाचं प्रसारण करणारी बीबीसी ही पहिली वाहिनी होती.
Our world हा शो मात्र वेगळा होता. त्यात प्रत्येक खंडातील देशात होत असलेल्या घडामोडी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला.
सॅटेलाईटमार्फत जगाला जोडण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.
या शो साठी ब्रिटिशांचं योगदान म्हणून बिटल्सने एक नवीन गाणं सादर केलं, All you need is love. हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं.

या गाण्यामुळे 1985 साली प्रसारित झालेल्या Live Aid या लोकप्रिय कार्यक्रमाची पायाभरणी झाली.
तसंच विविध ठिकाणी बॉब जेल्डॉफ आणि मिडगे उरे यांनी गाण्याचे कार्यक्रम केले. इथिओपिया येथे आलेल्या दुष्काळासाठी निधी उभारण्यासाठी हे कार्यक्रम केले.
बीबीसी तेव्हा यशाच्या शिखरावर होते. सॅटेलाईटच्या माध्यमातून टीव्हीवर प्रसारण करणारं ते माध्यम झालं. बीबीसीने 60 देशात 400 मिलियन प्रेक्षकांनी हे कार्यक्रम लाईव्ह पाहिले.
8. विषछत्री ने घेतला बीबीसी पत्रकाराचा बळी
छत्रीसदृश एका वस्तूने बीबीसीच्या पत्रकाराचा बळी घेतल्याची घटना घडली. जॉर्जी मारकोव्ह असं त्यांचं नाव होतं.
7 सप्टेंबर 1978 ला मार्कोव्ह बीबीसीचं कार्यालय असलेल्या बूश हाऊसमध्ये निघाल होते. तेव्हा पायाच्या मागच्या बाजूला एका रहस्यमय व्यक्तीने छत्री त्यांच्या पायात खुपसली आणि पळून गेला.

फोटो स्रोत, International Spy museaum
या घटनेनंतर मार्कोव्ह गंभीर आजारी पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यांनी इतर कर्मचाऱ्यांना सांगितलं की बल्गेरियाच्या गुप्तचर विभागाने आणि KGB ने त्यांच्यावर विषप्रयोग केला.
तीन दिवसानंतर त्यांचं निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात बायको आणि दोन वर्षांची मुलगी होती.
ते बल्गेरियाच्या कम्युनिस्ट पक्षावर ते सातत्याने टीका करायचे. त्यामुळे त्यांच्या हत्येत KGB आणि बल्गेरियाच्या गुप्तचर विभागाचा हात असल्याचा संशय बराच काळ बळावला होता.
पोलिसांच्या गुप्त फाईल्समध्ये मारेकऱ्याचं नाव Picadilly असल्याचं समोर आलं. मात्र त्यांना शेवटपर्यंत न्याय मिळाला नाही.
9. अफ्रिकन स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर
हा खिताब अफ्रिकेच्या सर्वोच्च खेळाडूला देण्यात येतो. त्यात प्रीमिअर लीग लिवरपुलचा फुटबॉल खेळाडू मोहम्मद सालेह चा समावेश आहे. 2018 मध्ये त्याला हा किताब देण्यात आला आहे.

2001 पासून हा पुरस्कार फक्त फुटबॉल खेळाडूंना देण्यात येतो. 2021 मध्ये हा पुरस्कार अफ्रिकन स्पोर्ट्स पर्सनालिटी ऑफ द इयर म्हणून देण्यात येत आहे.
आफ्रिकेच्या क्रीडाविश्वाचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराच्या स्वरुपात अनेक बदल करण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी अफ्रिकन खेळाडूंमध्ये चढाओढ आहे.
10. डेव्हिड अटेनबरो आणि ग्रीन प्लॅनेट
डेव्हिड अटेनबरो हे बीबीसीत काम करायचे. त्यांच्या आवाजात केलेले पर्यावरणविषयक माहितीपट जगभरात पोहोचले आहेत.
Blue Planet, Life collection आणि Natural World हे कार्यक्रम आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहेत. या कार्यक्रमासाठी त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले आहेत.
डेव्हिड अटेनबरो यांनी 1960 च्या दशकात बीबीसीत काम करायला सुरुवात केली. ते मग बीबीसीत सीनिअर मॅनेजर झाले. नंतर ते कंट्रोलरपदापर्यंत पोहोचले.

फोटो स्रोत, Getty Images
लोकांना शिक्षण देण्याच्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे 'चँपिअन ऑफ द अर्थट हा किताब देण्यात आला.
ग्रीन प्लॅनेट ही त्यांची सीरिज अतिशय लोकप्रिय आहे. जगभरातील वेगवेगळ्या हवामानात झाडं कशी जगतात हे या कार्यक्रमात सांगितलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








