महाराणी एलिझाबेथ यांच्या मुलांनी जागवल्या त्यांच्या आठवणी

राणी एलिझाबेथ, चार्ल्स तृतीय,

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, राणी एलिझाबेथ

महाराणी एलिझाबेथ यांच्या मुलांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत.

त्यांच्या आईचा नर्मविनोदी स्वभाव, कौटुंबिक सुट्ट्या आणि त्यांच्या डोळ्यातली मिश्किलता यांची त्यांना सतत आठवण राहील. बीबीसी वन या वाहिनीने त्यांच्याशी संवाद साधला.

आंघोळीच्या वेळेचा किस्सा

1953 मध्ये राणीच्या राज्यारोहण सोहळ्याच्या वेळेचा हा किस्सा राजे चार्ल्स तृतीय यांनी हा किस्सा सांगितला.

"मी तो क्षण अजिबात विसरू शकत नाही. आम्ही लहान होतो. आंघोळ करत होतो आणि राज्यारोहण सोहळ्याच्या आधी ती आम्हाला भेटून गेली. तेव्हा ती राजमुकुट घालायचा सराव करत होती. असे क्षण मी कधीच विसरू शकत नाही." ते म्हणाले.

जेव्हा एलिझाबेथ महाराणी पदी विराजमान झाल्या तेव्हा चार्ल्स फक्त तीन वर्षांचे होते. आता ते 73 वर्षांचे आहेत. त्यामुळे ब्रिटिश राजघराण्यातल्या कोणत्याही सदस्यापेक्षा ते सर्वांत जास्त अनुभवी आहेत. मात्र तिच्यासोबतचा संवाद त्यांना सतत आठवत राहील. "ती काय होती. मी तिच्याशी कोणत्याही विषयावर बोलू शकत असेल. आता असं नसेल. हे पचनी पडणं सगळ्यात जड जाणार आहे."

महाराणी आणि कौटुंबिक सहली

सार्वजनिक आयुष्यात वावरताना खासगी आयुष्यही त्या समरसून जगल्या. असे अनमोल क्षण त्यांना कौटुंबिक सहलीच्या वेळी मिळायचे असं महाराणी एलिझाबेथ यांची मुलगी प्रिन्सेस अन यांनी सांगितलं.

"त्या काळात आम्ही खूप मजा करायचो. त्या काळात तिने खूप आनंद उपभोगला." असं त्या पुढे म्हणाल्या.

"त्याचं एक कारण असंही होतं की त्यात तिला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. छोटंसं गाव, कुत्रे, घोडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या नजरांपासून दूर असायचो." अन सांगतात.

महाराणी एलिझाबेथ यांच्या सर्वांत लहान मुलाच्या मते 2012 च्या ऑलिम्पिक्स च्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी तिने केलेला प्रवेश हा टीव्हीच्या इतिहासातला सर्वोच्च क्षण होता.

प्रिंस एडवर्ड

फोटो स्रोत, Getty Images

एका लघुपटात महाराणी डॅनियल क्रेग ला भेटत असल्याचं दाखवलं आहे. क्रेग यांनी पाच चित्रपटांत जेम्स बाँडची भूमिका निभावली होती.

तो प्रसंग असा होता की राणी हेलिकॉप्टर मध्ये चढते आणि ऑलिम्पिक स्टेडिअममध्ये उतरते असं दृश्य होतं. अर्थात त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीच्या सहाय्याने हा प्रसंग चित्रित करण्यात आला होता.

"एकदा डॅनियल क्रेग बकिंगहँम पॅलेसला आले. तेव्हा प्रत्येकाला असं वाटलं की क्वीनचा रोल कोण करणार? क्वीनच तिची भूमिका बजावणार होती." प्रिंस एडवर्ड उत्साहाने सांगतात.

प्रिंस एडवर्ड

फोटो स्रोत, BBC one

ज्यांनी हा प्रसंग पाहिला त्यांनाही आश्चर्यमिश्रित आनंदाचा धक्का बसला. त्यांना विश्वासच बसला नाही.

"मला वाटलं हा एक वेगळाच क्षण होता. त्या क्षणी तिची नर्मविनोद बुद्धी आणि डोळ्यातली चमक दिसली.आईने आणि टीमने कोणाला सांगितलं नाही मात्र तो क्षण खूप छान होता."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)