चिंपांझी झाडं बडवून एकमेकांशी संवाद कसा साधतात? संशोधनातून आलं समोर

फोटो स्रोत, A SOLDAT
शास्त्रज्ञांच्या मते जंगली चिंपांझी झाडं बडवून एकमेकांशी संवाद साधतात. शास्त्रज्ञांनी यासंदर्भात युगांडामधल्या जंगलात राहणाऱ्या चिंपांझींच्या वर्तनाचा अभ्यास केला. चिंपांझी झाडांच्या मुळांशी हात आपटतात.
तालबद्ध पद्धतीने चिंपांझी आवाज काढतात. या माध्यमातून ते दूर अंतरावरच्या अन्य चिंपांझींशी बोलतात. कोण कुठे आहे, काय करत आहे या गोष्टींबद्दल त्यांना माहिती मिळते.
'अॅनिमल बिहेव्हिअर' नावाच्या शोधपत्रिकेत हे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत.
सेंट अँड्र्यूज विद्यापीठाच्या डॉ. कॅथरिन होबायटर यांनी चिंपांझींच्या वर्तनाचा अभ्यास केला. विस्तीर्ण आणि डेरेदार झाडांच्या मुळांचा चिंपांझी वाद्यासारखा उपयोग करून घेतात. झाडांच्या मुळावर ते हात आणि पाय आपटतात.
तुम्ही मुळांवर खूप जोरात प्रहार केलात तर त्यातून खूप खोलवर असा आवाज येतो जो जंगलात दूर अंतरापर्यंत ऐकू येतो, असं डॉ.कॅथरिन यांनी बीबीसी 4 इनसाईड सायन्स प्रोग्रॅमशी बोलताना सांगितलं.
"आवाज ऐकला की आम्हाला कोण वाजवतंय ते कळतं. आम्ही ज्या चिंपाझींच्या शोधात आहोत त्यांना धुंडाळून काढण्याचा हा एक भन्नाट प्रकार आहे," असं त्यांनी सांगितलं.
पुरुष चिंपांझी वेगवेगळ्या पद्धतीने आवाज काढतात.ते वेगवेगळ्या पद्धतीने आवाज काढून एकमेकांशी संपर्क करतात.
चिंपांझींच्या या वर्तनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या व्हिएन्ना विद्यापीठाच्या मुख्य संशोधक व्हेस्ता इल्यूटेरी यांना काही प्राण्यांच्या वादनात नियमित ताल जाणवतो. रॉक अँड ब्ल्यूज ड्रमरसारखं वाजवतात. काही जॅझसारखं वाजवतात.
"मला स्वत:ला आश्चर्य वाटलं की जंगलात काही आठवडे राहिल्यानंतर कोण कुठला आवाज काढतोय हे मला समजू लागलं. पण त्यांची आवाज काढण्याची पद्धत इतकी निरनिराळी असते की आपल्याला ओळखणं कठीण होऊन जातं," असं इल्यूटेरी सांगतात.
इल्यूटेरी यांनी एका तरुण चिंपाझीचं वर्णन जॉन बॉनहॅम असं केलं. बॉनहॅम हे दिवंगत ड्रमर होते. त्यांनी या चिंपाझींचं नाव ट्रिस्टन असं ठेवलं आहे. तो
प्रवासात करताना हे प्राणी विशिष्ट पद्धतीनेच आवाज काढतात हे लक्षात आलं आहे. वादनातून कोण वाजवतंय हे कळू द्यायचं की नाही हे चिंपाझी ठरवतात.
चिंपांझींच्या वादनाचे अर्थ समजून घेतले तर त्यातून संभाषण प्रक्रियेतलं जटिल कोडं उलगडेल. चिंपांझी एकमेकांना भेटतात तेव्हा अभिवादन करतात. पण ते जंगलात रवाना होतात तेव्हा एकमेकांचा निरोप घेत नाहीत.
"ते एकमेकांना निरोप देत नाहीत. कारण ते झाडांच्या मुळाशी हातपाय आपटून एकमेकांशी नेहमीच संपर्कात राहतात. भलेही अंतराने दूर असतील तरीही ते संपर्कात राहतात," असं डॉ. होबायटर यांनी सांगितलं.
लांब अंतरावर असूनही होणाऱ्या या ध्वनी संवादामुळे चिंपांझी एकमेकांची ख्यालीखुशालीही समजून घेतात. चिंपाझी आणि माणूस यांच्यात नेमका काय फरक आहे हे समजून घ्यायला यामुळे मदत होईल, असा जाणकारांना विश्वास आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








