'या' देशाच्या एका निर्णयामुळे भारतात तेल महागण्याची शक्यता

पाम तेल

फोटो स्रोत, Getty Images

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी सांगितलं की, येत्या 28 तारखेपासून पाम तेलासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्यात थांबवण्याची घोषणा केली आहे.

पाम तेलाच्या उत्पादनावर यादरम्यान लक्ष ठेवलं जाईल असं ते म्हणाले. देशात स्वस्त आणि भरपूर प्रमाणात तेलाचा पुरवठा सुरळीत झाला की, ही बंदी उठवण्याचा विचार केला जाईल.

एका व्हीडिओ संदेशात राष्ट्राध्यक्ष झोको विडोडो यांनी शुक्रवारी सांगितलं की, देशात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. पाम तेलावर लागलेली बंदी पुढील निर्णयापर्यंत कायम राहील.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर पामची शेती होते. त्याच्या फळांपासून पाम तेलाचं उत्पादन होतं. त्यातूनच खाद्यतेल तयार केलं जातं. त्याशिवाय डिटर्जंट, शँम्पू, टुथपेस्ट, चॉकलेट, लिपस्टिक, मध्येही त्याचा वापर होतो. जगाच्या काही भागात त्याचा वापर जैविक इंधन म्हणूनही होतो.

पाम तेलाच्या उत्पादनात इंडोनेशिया जगातील सर्वात जास्त निर्यात करणारा देश आहे. मात्र, स्थानिक पातळीवर सध्या तिथे या तेलाचा तुटवडा आहे.

नॅसडॅक च्या वेबसाईटनुसार जानेवारीच्या शेवटच्या दिवसात इंडोनेशियाने पाम तेसाची निर्यात मर्यादित केली होती. मार्चमध्ये त्यावर लागलेली बंदी उठवली होती. आता आंतररराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत.

ब्लुमबर्गमध्ये छापून आलेल्या एका अहवालानुसार, रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर वाढती महागाई लक्षात घेता खाद्यपदार्थाचा तुटवडा टाळण्यासाठी अनेक देश आपली पिकं वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. इंडोनेशियाचा हा निर्णय याच दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे.

याच आठवड्यात चॅनल न्यूज एशियात छापून आलेल्या एका बातमीनुसार, इंडोनेशियाच्या एका निर्णयाने चिंता वाढली आहे. त्याचवेळी आंततराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

पाम तेल

फोटो स्रोत, Getty Images

एका अहवालानुसार, युक्रेन हा सूर्यफुलाच्या तेलाचा सर्वांत मोठा उत्पादक आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे या तेलाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.

जगाला लागणाऱ्या एकूण तेलापैकी 76 टक्के सूर्यफुलाच्या तेलाचा व्यापार काळ्या समुद्रातून होतो. मात्र युक्रेन युद्धामुळे या व्यापारावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. अशात लोकांची आशा सोयाबीन आणि पाम तेलावर होती.

खाद्यतेलाचा विचार करायचा झाला तर सोयाबीनच्या तेलाला पाम तेल हा चांगला पर्याय आहे.

गेल्या काही आठवड्यात गोडेतेलात जगातला सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या अर्जेंटिना ने सोयाबीनच्या तेलावरच्या निर्यातीवर बंदी आणली होती. त्यामुळे 2021-22 मध्ये उगवलेल्या पिकाची निर्यात थांबली आहे.

मार्च महिन्यात रॉयटर्सने रॉयटर्सने दिलेल्या एका बातमीनुसार अर्जेंटिंना ने सोयाबीन तेलाच्या निर्यातीवर 31 टक्के कर लावला आहे. त्याच वर्षात 2021-22 मध्ये दुष्काळ असूनसुद्धा सोयाबीनचं उत्पादन 4 कोटीपासून 42 कोटी टन झालं आहे.

तेल

फोटो स्रोत, Getty Images

सरकारच्या या निर्णयानंतर अर्जेंटिनामधील व्यापारांना हा निर्णय देशहिताचा वाटत नाही. त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या निर्यातीवर बंदी आली तर देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल आणि परकीय गंगाजळीला फटका बसेल. तसंच तेलाची आयात करणारे देश अमेरिका किंवा ब्राझील कडे जाऊ शकतात.

वाढत्या महागाईमुळे संयुक्त राष्ट्रांनी सर्व देशांना विनंती केली आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी किमतीवर नियंत्रण ठेवावं. सध्या चालू असलेल्या युद्धाचा त्यावर परिणाम होऊ देऊ नये आणि व्यापार चालू ठेवावा.

सध्या संपूर्ण जगात कोव्हिडमुळे सप्लाय चेनवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे रशिया युक्रेन युद्धाशिवाय अर्जेंटिना आणि इंडोनेशियाने घेतलेल्या निर्णयाचा जगावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे जगात खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात पाम तेलाच्या विक्रीवर अनेक निर्बंध घातले गेले होते. सरकारने पाम तेलाची किंमत 9300 इंडोनेशियन रुपये प्रतिकिलो ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

निक्केई एशियानुसार देशात खाद्यतेलाच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात गेल्या वर्षापासून 40 टक्के वाढ झाली होती. त्यानंतर व्यापार मंत्री मोहम्मद लुफ्ती यांनी सर्व उत्पादकांना एकूण उत्पादनापैकी 20 टक्के तेल बाजारात विकण्यास सांगितलं होतं.

भारतावर काय परिणाम होईल?

बिझनेस स्टँडर्डमध्ये छापून आलेल्या एका अहलवनालानुसार भारतात 1.3 कोटी टन खाद्य तेलाची आयात होते. त्यातील 63 टक्के वाटा पाम तेलाचा आहे. त्याचा एक मोठा भाग इंडोनेशियातून खरेदी केला जातो. मलेशिया आणि थायलंडमधूनही काही भाग खरेदी केला जातो.

बीएलअग्रो कंपनी इंडोनेशिया आणि मलेशियाहून पाम तेलाची भारतात आयात करतं. कंपनीचे चेअरमन घनश्याम खंडेलवाल यांनी बीबीसीशी संवाद साधला. ते म्हणाले, "भारतात वापरल्या जाणाऱ्या तेलापैकी 65 टक्के तेल आयात केलं जातं. 35 टक्के उत्पादन भारतात होतं. आयात होणाऱ्या तेलापैकी 60 टक्के पाम तेल असतं. कारण ते इतर प्रकारच्या तेलात मिसळलं जातं."

या आयातीवर सरकारचा 50 हजार कोटी खर्च करतं.

पाम तेल

फोटो स्रोत, Getty Images

सॉलवँट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक बी. व्ही. मेहता यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितलं की, इंडोनेशियाच्या या निर्णयाचा दुसऱ्या देशांवर वाईट परिणाम होईल.

त्यांचं म्हणणं आहे की, या संकटाचा सामना करण्यासाठी भारताला राजनैतिक मार्गाचा वापर करावा लागेल.

द हिंदू बिझनेस लाईन द हिंदू बिझनेस लाईन मध्ये छापून आलेल्या अहवालाचा आधार घ्यायचा झाल तर ग्राहकांनी आता कंबर कसली पाहिजे.

या अहवालात असं म्हटलं आहे की, कोव्हिड ओसरल्यानंतर रमजान आणि लग्नाचा काळ सुरू झाला आहे. लोकांना महागाईचा फटका बसला आहे. त्यामुळे इंडोनेशियाच्या या निर्णयाने तेलाच्या किमती कमी होतील. मात्र भारतात तेलाच्या किमतीत मोठी वाढ होईल.

इंडियन एक्सप्रेसमध्येछापून आलेल्या एका बातमीनुसार तेलाच्या किमतीत 3000 ते 5000 प्रति टन वाढ होईल, याची व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी असं या बातमीत नमूद केलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)