Climate Change: 2070 पर्यंत भारतातील उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणले जाईल - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, हवामान बदल परिषद, संयुक्त राष्ट्रं,

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी

हवामान बदलासंदर्भात महत्त्वपूर्ण परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. भारतासारख्या विकसनशील देशांसाठी हवामान बदल ही मोठी समस्या आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं.

2070 पर्यंत भारतातील उत्सर्जनाचे प्रमाण शून्यवर आणले जाईल, असं मोदी यांनी ग्लासगो येथे झालेल्या परिषदेत म्हटलं.

"जगभरात हवामान बदलासंदर्भात अडॅप्टेशनला म्हणजेच भवतालाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेला तितकं महत्त्व मिळालेलं नाही जेवढं मिटिगेशनला अर्थात एखादा प्रश्न सोडवण्याला मिळालं आहे. हवामान बदलाचा फटका बसलेल्या देशांसाठी हे अन्यायकारी आहे", असं पंतप्रधान म्हणाले.

"हवामान बदलामुळे शेतीत मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागले आहेत. अवेळी पडणारा पाऊस आणि पूर या संकटांचा सामना करावा लागत आहे", असं पंतप्रधान म्हणाले.

2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट भारत गाठेल असं पंतप्रधानांनी म्हटले आहे. या परिषदेचे उद्दिष्ट 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरोवर आणण्याचे आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

ब्रिटनमधील ग्लासगो शहरात रविवारपासून हवामान बदलासंबंधीची COP26 ही परिषद सुरू झाली आहे. COP26 परिषद 31 ऑक्टोबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत चालेल.

जगभरातील नेते आणि प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले आहेत. परंतु चीनचे राष्ट्रपती शी जिगपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन या परिषदेत सहभागी होणार नाहीत.

COP26 चं आयोजन हे 2020 मध्ये होणार होतं, मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही परिषद स्थगित करावी लागली.

बोरिस जॉन्सन काय म्हणाले?

आपण काय काम केलं याचं मूल्यमापन पुढील पिढी करेल असे उद्गार युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे.

आपल्याकडे तंत्रज्ञान आहे पण प्रश्न हा आहे की आपल्याकडे इच्छाशक्ती आहे की नाही? राजकीय नेते म्हणतात की आम्ही 2050 किंवा 2060 मध्ये हे करू, ते करू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, हवामान बदल परिषद, संयुक्त राष्ट्रं,

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन

पण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या ठिकाणी जे उपस्थित नेते आहेत त्यांचे सरासरी वयच 60 वर्षं आहे. आपल्या कामाचे मूल्यमापन येणारी पिढी करेल.

'आपली कबर आपणच खोदत आहोत'- संयुक्त राष्ट्रांचे महासचिव

हरित वायूंविरोधातला एक बुलंद आवाज अशी ज्यांची ओळख आहे ते संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अॅंटोनियो गुटेरस यांनी सर्वांना धोक्याचा इशारा दिला आहे.

आपल्याला जीवाश्म इंधनांचे जे व्यसन लागले आहे त्यामुळे ही मानवजात धोक्यात आली आहे. आपली कबर आपणच खोदत आहोत असं गुटेरस यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, हवामान बदल परिषद, संयुक्त राष्ट्रं,
फोटो कॅप्शन, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अॅंटोनियो गुटेरस

एकतर या गोष्टी आपण थांबवायला हव्या अन्यथा याच गोष्टी आपल्याला एकेदिवशी थांबवतील. कार्बनद्वारे स्वतःचा मृत्यू ओढावून घेणे थांबवा.

निसर्गाला शौचालयाप्रमाणे वापरणे थांबवा. आणखी उत्खनन थांबवा. आपण आपलीच कबर खोदत आहोत या शब्दांत गुटेरस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लिओनार्डो डिकॅप्रिओ काय म्हणतो?

अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओनंही COP 26 बद्दल ट्वीट केलं आहे.'हवामान बदलाचं संकट आलं आहे. लीडर्स जग तुमच्याकडे पाहात आहे आणि या प्रसंगी तुमच्याकडून अपेक्षांवर खरं उतरण्याची गरज आहे. आपण अजून वेळ वाया घालवू शकत नाही.'

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)