'वर्क फ्रॉम होम' नंतर आता अनेकांची पूर्णवेळ ऑफिसला येण्याची मानसिकता नाही- सर्वेक्षण

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लोरा जोन्स आणि रेबेक्का वर्न
- Role, बीबीसी
'कोरोना आरोग्य संकटानंतर कर्मचारी पूर्णवेळ कार्यालयात येतील असं वाटत नाही.' असं मत बहुतांश लोकांनी बीबीसीच्या एका सर्वेक्षणातून मांडल्याचं समोर आलं आहे.
सर्वेक्षणातील एकूण 1,684 लोकांपैकी 70% लोकांनी असा अंदाज वर्तवला की, "कर्मचारी पूर्वीच्या तुलनेत कार्यालयात परत येणार नाहीत."
बहुसंख्य कामगारांनी सांगितले की, ते पूर्णवेळ किंवा किमान काही वेळा घरून काम करणे पसंत करतील. परंतु यामुळे कामाच्या सर्जनशीलतेवर परिणाम होईल अशी चिंता व्यवस्थापकांनी व्यक्त केलीय.
बीबीसीसाठी सर्वेक्षण करणाऱ्या यूजीओव्हीने सर्वेक्षण केलेल्या 530 वरिष्ठ नेतृत्त्वापैकी निम्म्या जणांनी सांगितलं की, घरुन काम करणाऱ्या कामगारांचा सर्जनशीलता आणि सहकार्य या दोन्हींवर विपरीत परिणाम होईल - सामान्य जनतेच्या 38% लोकांविरूद्ध.

फोटो स्रोत, Getty Images
इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्स आणि टेक जायंट अॅपल सारख्या मोठ्या कंपन्यांच्या बॉसनी अधिक फ्लेक्झिबिलीटीची मागणी नाकारली आहे, तर पूर्वीच्या कंपन्यांनी घरून काम करणे विक्षिप्तपणा असल्याचं म्हटलं आहे.
बीबीसीसाठी सर्वेक्षण केलेल्या लोकांच्या व्यवस्थापकांनी आणि सदस्यांनी मात्र हे मान्य केले की, घरुन काम करण्याचं धोरण सुरू ठेवल्याने उत्पादकता किंवा अर्थव्यवस्थेचे नुकसान होणार नाही.
उदाहरणार्थ, बीटीचे मुख्य कार्यकारी फिलिप जॉन्सन यांनी बीबीसीला सांगितलं की, भविष्यात आपल्या कार्यालयातील बहुतेक कर्मचाऱ्यांना आठवड्यातील तीन किंवा चार दिवस साइटवर काम करू देण्याचा विचार आहे. मात्र त्यांच्या हजारो अभियंत्यांना याप्रमाणे मुभा दिली जाणार नाही.
"आम्ही लोकांच्या व्यवसायात आहोत. यामुळे सहकार्य, गतीशीलता, टीमवर्क, सर्जनशीलता, आमच्यासाठी खरंच महत्त्वाच्या बाबी आहे," असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
संशोधनानुसार, तीन चतुर्थांशपेक्षा जास्त लोकांचा असा विश्वास आहे की त्यांचे बॉस त्यांना आणखी काही काळ घरातून काम करत राहण्याची परवानगी देतील.
ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, 2020 मध्ये किमान घरुन काही काम करणाऱ्या कामगारांचे प्रमाण 37 टक्क्यांपर्यंत वाढले, जे मागील वर्षी 27% होते.
'मला शक्य तेवढं कार्यालयातून काम करायचं आहे'
जुलैमध्ये सरकारच्या किकस्टार्ट जॉब्स योजनेच्या माध्यमातून माइसी लॉरिन्सन टॉकटॉकमध्ये सामील झाली. या योजनेअंतर्गत, जॉबसेंटर वर्क कोच 16 ते 24 वयोगटातील तरुण युनिव्हर्सल क्रेडिटवर नवीन, तात्पुरत्या, भूमिकांमध्ये आहेत.
सहा महिन्यांच्या कामातील कराराबद्दल माइसी कृतज्ञ असली, तरी ती शक्य तेव्हा ऑफिसमध्ये जाण्यासासाठी ती उत्सुक आहे जेणेकरून ती चांगलं काम करुन शकेल.

फोटो स्रोत, Getty Images
रिटेलमधील तिच्या भूतकाळातील अनुभवाचा उल्लेख करताना ती म्हणते, "मला अशी नोकरी कधीच मिळाली नाही जिथे मी ऑनलाइन किंवा ईमेलच्या माध्यमातून लोकांशी बोलत आहे.
ती पुढे म्हणते, "मी ऑफिसमध्ये असताना अधिक उत्पादक काम करू शकते कारण कार्यालयात व्यावसायिक वातावरण असते आणि तुम्हाला लोकांना भेटायला मिळतं."
दूरस्थपणे काम केल्यानंतर तिला अलीकडेच पहिल्यांदा आपल्या सहकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटायला मिळालं.
"आम्ही अलीकडेच टीम ड्रिंक्स प्यायलो आणि शेवटी मला सर्वांना भेटायला मिळालं. हे खरंच छान होतं, मला प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटायला मिळालं आणि त्यांचा ईमेल काय आहे यापेक्षा ते कोण आहेत हे जाणून घेण्याची संधी मिळाली."
अजूनही काही दिवस घरातून काम करण्याच्या संधीचा वापर करेल असंही ती म्हणाली.
सर्वेक्षण केलेल्यांपैकी 60% पेक्षा जास्त लोकांना वाटले की, समोरासमोर संपर्क किंवा वैयक्तिक न भेटल्याने तरुण वर्गाला प्रगती करण्यासाठी संघर्ष करावा लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
तज्ज्ञांनी नमूद केल्याप्रमाणे, विशेषत: 25 वर्षांखालील तरुणांना नोकऱ्या गमावल्यामुळे किंवा साथीच्या रोगाच्या सुरुवातीला कामाचे तास कमी झाल्याचा मोठा फटका बसला.
बीबीसीच्या बेस्पोक संशोधनावरून असे दिसून येते की साथीच्या रोगामुळे काही विषमता वाढू शकतात, तर काही सुधारल्या असाव्यात.
सर्वेक्षण केलेल्या निम्म्या कामगारांना असं वाटतं की, महिला कर्मचाऱ्यांना मात्र घरुन काम करण्याची संधी मिळाल्याने चालना मिळू शकते, बालसंगोपनाची कामं सोयीची ठरत असल्याने ते कमी अडथळा ठरतील.
'हे न्यू नॉर्मल आहे'
टनी हॉवर्ड एक उत्साही गृह-कर्मचारी आहे जो मँचेस्टरमधील एका मोठ्या संरक्षण कंपनीत काम करतो. महागडी कॉफी शॉप्स टाळण्यापासून ते प्रवासाचा वेळ कमी करण्यापर्यंत त्याला गेल्या 16 महिन्यांपासून ऑनलाईन लॉग इन करण्याचे मोठे फायदे मिळाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
"माझे आरोग्य एवढं कधीही चांगलं नव्हतं. मी आता दिवसाला 92 मैल प्रवास करत नाही आणि मी अधिक काम करू शकतोय," असं तो म्हणला.
तो स्थानिक दुकानांमधून खरेदी करत असल्याने पैसे वाचतात असंही सांगतो. पण कंपनीत नवीन रुजू होणाऱ्यांची चिंता वाटते, "सप्टेंबरमध्ये आमच्याकडे 17 वर्षांचे शिकाऊ उमेदवार येणार आहेत. जे कधीही साइटवर गेले नाहीत." असंही तो म्हणाला.
"मी 57 वर्षांचा आहे, आमच्यासाठी घरुन काम करणं ही उत्तम संधी आहे पण तरुण कर्मचारी ज्यांनी नुकतीच कामाला सुरूवात केलीय त्यांना कामाच्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव गरजेचा आहे." असं असलं तरी कोरोना काळात कार्यालय पुनर्मापन करतील. काहीतरी नवीन करण्याऐवजी हेच न्यू नॉर्मल आहे असं तो सांगतो.
गोंधळलेली परिस्थिती
हायब्रिड आणि रिमोट वर्किंगची मागणी करणाऱ्या उमेदवारांच्या अपेक्षा आणि कमीतकमी काही काळ लोकांना ऑफिसमध्ये हवे असलेल्या कंपन्यांच्या अपेक्षांवर कृती करणं भरतीकर्त्यांना अवघड जात आहे.
केटी बार्ड भरतीचे सल्लागार काम वरा म्हणतात की, काही महिने खूप आव्हानात्मक आहेत. "पूर्वी असे होते की लोक त्यांच्या कामानुसार आपल्या आयुष्यातील गोष्टींशी तडजोड करत होते. पण कोव्हिड काळाने असं शिकवलं की आता त्यापद्धतीने काम होणार नाही."
"लोक संधी नाकारत आहेत कारण त्यांना ऑनलाईन काम देत नाहीत आणि त्याऐवजी ते घरी बसून योग्य संधी मिळण्याची ते प्रतिक्षा करतात,"
ती पुढे सांगते, "सध्या खूप गोंधळल्यासारखं वाटतंय. कर्मचारी एक प्रकारे सूचना मिळण्याची वाट पाहत आहेत, लोकांना ऑफिसमध्ये आणण्यासाठी आणि त्यासाठी काही रचना आखण्याची. परंतु कर्मचारी जे शोधत आहेत ते खूप वेगळे आहे. जिगसॉ खेळाप्रमाणे सर्व एकत्र बसत नाही तोपर्यंत हे काही काळ असेच असणार आहे."
परिस्थिती हळू हळू बदलेल
इंग्लंडमध्ये, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाव्हायरसचे निर्बंध कमी झाल्यामुळे उन्हाळ्यात "हळूहळू कामावर परत येण्याची" शिफारस केली. उर्वरित यूकेमध्ये, लोकांना अजूनही शक्य तेथे घरुन ऑनलाइन काम करण्याचा सल्ला दिला जात आहे. आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी दूरस्थपणे पूर्णवेळ काम करणे पुन्हा सामान्य होऊ शकते.
आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी खासदारांना सांगितले की, इंग्लंडमधील लोकांनी पुन्हा घरून काम करावे असा सल्ला देणे हा या हिवाळ्यात एनएचएसवर बराच दबाव आल्यास सरकारच्या आकस्मिक योजनांचा एक भाग असेल. इमर्जन्सीसाठी वैज्ञानिक सल्लागार गटाचे सदस्य प्रोफेसर अँड्र्यू हेवर्ड पुढे म्हणाले की, या धोरणामुळे "आपण अडचणीत आल्यास महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो".
त्यांनी 15 सप्टेंबरला बीबीसी रेडिओ 4 च्या टुडे कार्यक्रमात सांगितले: "विषाणूचा प्रसार कमी करण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी मार्ग म्हणजे इतर लोकांच्या संपर्कात न येणे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








