Mental Health: कंपन्या कर्मचाऱ्यांना आनंदी आणि निरोगी राहण्यास मदत करू शकतात का?

फोटो स्रोत, Alamy
अधिकाधिक कंपन्या आता कर्मचाऱ्यांना मानसिक आणि आरोग्यांशी संबंधित सेवा देत आहेत. पण, कर्मचाऱ्यांना हेच हवे आहे का? आणि ही बाब कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात मदत करू शकते का?
31 वर्षीय एलिझा या 6 वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेतील एका मोठ्या गुंतवणूक कंपनीत कामासाठी गेल्या, तेव्हा कामाच्या ठिकाणी आम्ही आमच्या भावनांबद्दल बोलू शकत नव्हतो, असं वातावरण असल्याचं त्या सांगतात. नोकरीच्या सुरक्षेस्तव एलिझा यांनी त्यांचं आडनाव गुपित ठेवलं आहे.
"हा पैशांचा खेळ आहे. इथं फक्त आकडे, आकडे आणि आकडेच पाहिले जातात. तिथं भरपाई करून देण्याची संस्कृती नव्हती. अनेक वर्षं काम केल्यानंतर मला हे जाणवलं," असं एलिझा सांगतात.
या कंपनीत जीम किंवा हॅपी अवर्स सारखे लाभ मिळत असले तरी लोकांच्या आयुष्याची आम्हाला काळजी आहे, असं वातावरण तिथं कधीच नव्हतं, असंही त्या सांगतात.
पण, दोन-तीन वर्षांपूर्वी गोष्टी बदलायला लागल्याचं एलिझा यांच्या लक्षात आलं.
"स्वत:ची काळजी कशी घ्यावी, झोपेचं व्यवस्थापन कसं करावं, अशा प्रकारच्या कार्यशाळा आणि वर्ग आयोजित कंपनीनं सुरू केलं. यातून कंपनी मानसिक आरोग्याबद्दल बोलण्यासाठी एक व्यासपीठ तयार करत होती," असं एलिझा सांगतात.
कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या भावनिक स्थिरतेला आधार देण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चालली आहे, असं तज्ञांचं म्हणणं आहे. मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज ही कोरोना साथीच्या आधीपासून सुरू झाली असली, तरी गेल्या काही वर्षांतल्या आवाहनांमुळे कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य का चिंतेचा विषय ठरला आहे.
सॅन फ्रान्सिस्को स्थित प्रशिक्षण संस्था माइंड शेअर पार्टनर्सच्या सीईओ केली ग्रीनवुड म्हणतात, "कोरोना साथीच्या आधीपासून कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य याविषयी चर्चा करण्यास सुरुवात झाली. पण, मला वाटतं साथीच्या आजारामुळे आणि त्यापासूनच्या आव्हानांमधून लोकांना पाठिंबा देण्याची नितांत गरज आहे."
पण, ही एक मोठी प्रक्रिया आहे. कर्मचाऱ्यांना नवीन सेवांचा लाभ मिळत आहे आणि त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारत आहे, असं समजण्याइतकं सरळ हे प्रकरण नाहीये. हे कार्यक्रम कंपन्यांमध्ये होत असले, तरी वास्तविकता अशी आहे की कर्मचाऱ्यांच्या निरोगीपणाला संबोधित करणे अधिक क्लिष्ट आहे आणि अशा प्रकारचं समायोजन कर्मचाऱ्यांना सुरक्षित, निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी एखाद्या हिमनगाचं टोक असू शकतात.
नवीन लाभ, जुनी भीती?
अलीकडच्या वर्षांत कंपन्या आणि उद्योगांनी कर्मचाऱ्यांच्या पॅकेजेसमध्ये निरोगीपणा आणि मानसिक आरोग्य यांच्याशी संबंधित सेवा संसाधनं जोडण्यास सुरुवात केली आहे.
साथीच्या काळात या सेवा पुरवण्यात झपाट्यानं वाढ झाली आहे.

फोटो स्रोत, Alamy
कॉर्पोरेट वेलनेस प्रोग्राम डिझाईन करणारी कंपनी वेल्लेबलच्या 2021च्या एम्प्लॉय वेलनेस इंडस्ट्री ट्रेंड्स रिपोर्टनुसार, युनायटेड स्टेट्समधील 88% कंपन्या मानसिक आरोग्यामध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत. 80% पेक्षा जास्त कंपन्या ताण-व्यवस्थापन आणि लवचिकता यासंबंधीच्या संसाधनांवर अधिक खर्च करीत आहेत. तर सर्वेक्षण केलेल्या निम्म्याहून अधिक कंपन्या जागरुकता आणि ध्यानधारणेशी संबंधित कार्यक्रम घेत आहेत.
गेल्या काही वर्षांत या अशा कार्यक्रमांची लोकप्रियता वाढली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांनी यांची मागणी अधिक वाढली आहे. दु:ख, एकटेपणा, उत्पन्नातील तोटा आणि भीती या गोष्टी मानसिक आरोग्याच्या स्थितीला चालना देत आहेत. यात विशेष म्हणजे कर्मचारीही याकडे लक्ष देत आहेत.
कोरोना साथीमुळे अशाप्रकारचे कार्यक्रम करण्याची गरज कंपन्यांना वाटू लागली आहे. कारण आपण काहीच केलं नाही तर लोक अक्षरश: मरणार आहेत, असं एलिझा यांना कंपनीतील या वेगवेगळ्या कार्यक्रमाविषयी वाटतं.
त्या सांगतात, "गेल्या 6 वर्षांत झाले नाही, तितके बदल या एका वर्षात कंपनीच्या धोरणात अनुभवले आहेत. यात कंपनीनं मुलांची काळजी घेण्यासंबंधीचं धोरण समाविष्ट केलं आहे, सुट्ट्या वाढवून दिल्या आहेत."
पालक म्हणत होते की, 'मला घरून काम करणं शक्य नाही'. यावर कंपनीनं तत्परतेनं उत्तर दिलं की, 'आम्ही आता फायदे वाढवले आहेत. आता आम्ही घरात 80% बाल संगोपन करण्यासंदर्भात लाभ देत आहोत.'
कर्मचाऱ्यांची गरज कंपन्या ओळखत आहेत आणि त्यांच्या निरोगी आयुष्यासाठीचे कार्यक्रम आयोजित करत आहे. पण, याचा कर्मचारी लाभ घेतीलच याची काही शाश्वती नाही.
बर्याच कामाच्या ठिकाणी, वैयक्तिक आणि व्यावसायिक असा पारंपारिक मतभेद कायम राहतो आणि याविषयीचे गैरसमज अनेकांना त्यांचे सहकारी किंवा बॉस यांच्यापासून मानसिक आरोग्याची बाब लांब ठेवण्यास प्रवृत्त करतो.

फोटो स्रोत, Alamy
मानसिक आरोग्याविषयी सांगितलं तर नोकरी मिळणार नाही, अशी लोकांना भीती वाटते, असं यूकेमधील Accenture Research संस्थेच्या बार्बरा हार्वे सांगतात. त्यांच्या मते, "व्यवस्थापनाच्या माध्यमातून खासगी पद्धतीनं याविषयी उपचार घेतले, तरी ते कायमस्वरूपी गुपित राहणार नाहीत, अशीही लोकांची चिंता असते. तसंच सहकारी आणि बॉस उपस्थित असलेल्या यासंबंधीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास अनेकांना संकोच वाटतो."
32 वर्षीय लॉरा या एका स्टार्ट-अपसाठी काम करतात.
त्यांनी सांगितलं, "लोकांना बोलण्यासाठी एखादं व्यासपीठ असावं असं नेतृत्वाला वाटतं. पण, असं काही नसतं. लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर या गोष्टीवर बोलायचंच नसतं. जरी ते बोलणार असतील तरी ते कंपनीच्या वर्कशॉपमध्ये बोलणार नाहीत."
साध्या भाषेत सांगायचं तर कर्मचाऱ्यांना कॉर्पोरेट वेलनेस प्रोग्राम निवडण्याची इच्छा नसेल कारण ही संसाधने पूर्णपणे योग्य प्रकारची मदत करत नाहीत.
"मला मेडिटेशनवरील कार्यशाळा हव्या आहेत का, तर हो. पण, यामुळे कर्मचाऱ्यांना जे प्रत्यक्षात हवं आहे, ते मिळेल का, तर नाही, असं एलिझा सांगतात. "यामुळे कर्मचाऱ्यांना खरंच काय वाटतं, त्या बदल होतील का, तर नाही," असंही त्या म्हणतात.
पर्यावरणीय तडजोड
तरीही, हार्वे म्हणतात की कोणतीही मानसिक आरोग्य संसाधनं निव्वळ सकारात्मक असतात: "मी अॅप्स किंवा माइंडफुलनेस प्रोग्रामचा अपमान करणार नाही," असं त्या म्हणतात.
"कर्मचाऱ्यांना खरोखर काय आवश्यक आहे, तर असे उपाय आहेत जे त्यांच्या मानसिक आरोग्याच्या मदतीसाठी आवश्यक असलेल्या मूळ कारणांवर लक्ष केंद्रित करतील. कंपन्यांमधील हे कार्यक्रम चांगल्या हेतूने करण्यात येत आहे, पण पुरेसे चांगले नाहीयेत.
"तुम्ही जर कामाच्या ठिकाणी मदत करू शकेल, अशी संस्कृती तयार करू शकत नसाल तर तुम्ही प्रश्न सोडवत नाही आहात. तुम्ही केवळ त्यावर प्लास्टर लावत आहात. या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालायला हव्यात."
याचा अर्थ कामासाठी लवचिक तास आणि वेळापत्रक यांसारख्या सक्रिय धोरणांची स्थापना करणं तसंच व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यात संबंध निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करणं, असा होतो. तसंच कामाचा भार आणि कर्मचाऱ्यांना ते पूर्ण करण्यासाठी उपलब्ध संसाधनं यात संतुलन आहे की नाही याचं नियमित मूल्यांकन करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी तणाव, चिंता कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

फोटो स्रोत, Thinkstock
"आमच्याकडे मानसिक-आरोग्यावर चर्चा करण्यासाठी दिवस नियोजित आहेत, पण, हे सर्वकाही प्रतिक्रियाशील आहे, सक्रिय नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या मानसिक-आरोग्य दिवसाची ऑफर देता कारण तुम्ही एखाद्याचं मानसिक अवस्था पाहू शकता, पण यातून तुम्ही त्यांच्या कामाचा ताण हलका करत नाही, यामुळे तणाव आणखी वाढतो, "लॉरा म्हणतात.
"ही एक उदात्त सुरुवात आहे, पण जिथं आपलं तोंड आहे तिथंच खूप सारा पैसा ओतणं असा याचा अर्थ होतो. मला वाटतं की, मूलभूतपणे कामाचा ताण हलका करण्यापासून याची खरी सुरुवात होईल."
अलीकडील अभ्यासात, हार्वेच्या संशोधन पथकाला 6 निकष सापडले जे एखाद्या संस्थेतील वातावरण सपोर्टिव्ह बनवण्यास सहाय्य करतात. यात वर्क-लाईफ बॅलन्स, तसंच कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि तसंच आपली मानसिक स्थिती सहकारी किंवा बॉस यांच्याकडे व्यक्त करण्याचं वातावरण तयार करते.
"या प्रकारच्या सपोर्टिव्ह संस्थांमध्ये मानसिक आरोग्यविषयक समस्यांचे प्रमाण 40%ने कमी झाले आणि तेथील कर्मचाऱ्यांना रोजच्या कामाच्या ताणतणावांना तोंड देण्याची शक्यता जवळजवळ दुप्पट वाटली."
आणि ज्या कंपन्या सपोर्टिव्ह वर्क कल्चर तयार होण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहेत, तिथले कर्मचारीही कंपनीनं इतर वेलनेस प्रोग्राम्समध्ये जी काही गुंतवणूक केली, तिचा लाभ घेण्यास अधिक उत्सुक दिसतात.

फोटो स्रोत, Getty Images
अशाप्रकारच्या सपोर्टिव्ह वातावरणात लोकांना मानसिक आरोग्याविषयी बोलणं अधिक सोपं जातं. तसंच मदत आणि सल्ल्यासाठी कुणाकडे जायचं हेही माहिती असतं.
अशाप्रकारचे वेलनेस प्रोग्राम्स काही कर्मचाऱ्यांना चांगले वाटत असले तरी तज्ञांना मात्र यात अधिकची पावलं उचण्याची गरज वाटते.
कंपन्यांनी संरचनात्मक बदलं करणं गरजेचं आहे, असं त्यांना वाटतं. याचा खूप मोठा प्रभाव पडू शकतो. यामुळे केवळ मानसिक आरोग्यासाठी वाईट नसेलेलं कल्चर विकसित करणं एवढाच लाभ होणार नाही, तर प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या निरोगीपणासाठी प्रोत्साहन मिळत राहिल.
सर्वाधिक सपोर्टिव्ह अशा कामाच्या ठिकाणी 'संबंधित काम हे माझ्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं आहे, असं कर्मचाऱ्यानं म्हणण्याची शक्यता चारपट अधिक असते,' असं हार्वे सांगतात. कामातील बरंच काही आपल्या मानसिक स्थितीसाठी चांगलं असतं. काम हे आपल्याला विशिष्ट हेतू, सौहार्द, कनेक्शन आणि आपण काहीतरी साध्य करत असल्याची भावना देतं.
एलिझा याविषयी सहमत आहेत.
त्या म्हणतात, "कंपनीतील संसाधनं छान आहेत, पण बदल हेच यावरील एकमेव उत्तर आहे. तुम्हाला एवढेच करायचे आहे की तुमच्या कर्मचाऱ्यांना त्यांना काय हवे आहे, ते विचारायचं आहे. ते तुम्हाला म्हणतील, 'मला कमी तास काम करण्याची गरज आहे. बालसंगोपन आणि किराणा मालासाठी आणि माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला पुरेशी नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. माझे काम करण्यासाठी मला कामाच्या ठिकाणी अधिक संसाधनांची आवश्यकता आहे. जेव्हा मला वेळ लागेल तेव्हा मला सुरक्षित वाटले पाहिजे. मी मागे पडेल, अशी भीती मला वाटता कामा नये."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








