पॉर्नः OnlyFans ची अल्पवयीनांच्या सेक्स कंटेंटवर बंदी, बीबीसीच्या बातमीनंतर केली कारवाई

ओनलीफॅन्स

फोटो स्रोत, onlyfans

सेक्स व्हीडिओ, फोटोसाठी ओळखल्या जाणाऱ्या OnlyFans साईटला बीबीसीच्या बातमीचा चांगलाच दणका बसला आहे.

बीबीसीच्या बातमीनंतर OnlyFans कंपनीला आपल्या साईटवरील अल्पवयीन मुलांशी संबंधित सर्व अश्लील मजकूर हटवावा लागणार आहे.

OnlyFans कंपनीसंदर्भात बीबीसीने काही दिवसांपूर्वी एक बातमी केली होती. यामध्ये बीबीसीने अल्पवयीन खातेदारांच्या OnlyFans अकाऊंटकडे लक्ष वेधण्यात आलं होतं. यानंतर काही दिवसांनीच OnlyFans कंपनीने वरील निर्णय घेतला.

त्यामुळे येत्या 1 ऑक्टोबरपासून साईटवरील अल्पवयीन मुलांचा समावेश असलेले सर्व प्रकारचे अश्लील फोटो, व्हीडिओ आणि ते पोस्ट करणारे सर्व अकाऊंट ब्लॉक करण्यात येतील, अशी घोषणा OnlyFans ने केली आहे.

साईट वापरकर्त्यांना यापुढेही नग्न साहित्य साईटवर पोस्ट करता येईल. पण त्यासाठी OnlyFans च्या नियमावलीच्या अधीन राहूनच त्यांना या सर्व गोष्टी कराव्या लागतील.

म्हणजेच अल्पवयीन मुलांशी संबंधित कंटेंट आपल्या अकाऊंटवरून पोस्ट केल्यास त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

बँकिंग पार्टनर्सच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं OnlyFans ने म्हटलं आहे.

OnlyFans ही एक लंडन-स्थित सोशल मीडिया कंपनी आहे. यामध्ये खातेदार आपले नग्न फोटो किंवा व्हीडिओ पोस्ट करू शकतात. त्याबाबत ते आपल्या सबस्क्रायबर्सकडून मासिक फी अथवा टीप स्वरुपात पैसे घेऊ शकतात.

ओठ

फोटो स्रोत, iStock

याव्यतिरिक्त खातेदार याठिकाणी कुकिंगपासून ते व्यायामापर्यंत कोणताही मजकूर टाकत असतात. पण प्रामुख्याने ही साईट पॉर्नोग्राफिक कंटेटसाठीच ओळखली जाते.

या सर्व गोष्टीचं व्यवस्थापन करणारी OnlyFans कंपनी आपल्या खातेदारांना मिळणाऱ्या रकमेतील 20 टक्के वाटा घेते, तर 80 टक्के रक्कम संबंधित खातेदाराला देण्यात येते.

कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात OnlyFans कंपनीची उलाढाल खूपच वाढल्याचं दिसून आलं होतं. सध्या या साईटचे 1 कोटी 30 लाख वापरकर्ते असल्याचा कंपनीचा दावा आहे.

लोकांनी आमच्या प्लॅटफॉर्मचा दीर्घकालीन वापर करावा, क्रिएटर्स आणि चाहते यांच्यात सूसुत्रता आणण्यासाठी आम्हाला साईटवरील कंटेटसंबंधित नियमावली विकसित करावी लागेल, असं OnlyFansने एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून म्हटलं.

OnlyFans कंपनीची स्थापना 2016 मध्ये टिम स्टॉकी यांनी केली. काही दिवसांतच ही साईट लोकप्रिय झाली. पण नंतर या साईटवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कृत्य होत असल्याचं बीबीसीच्या निदर्शनास आलं.

अल्पवयीन मुलंही खोटं वय सांगून OnlyFansवर आपलं खातं उघडत होते. त्यांना हजारो-लाखो सबस्क्रायबर्स मिळायचे.

ही एक प्रकारे लहान मुलांची पॉर्नोग्राफीच असल्यामुळे बीबीसीने हा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर OnlyFans कंपनीवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठू लागली होती.

OnlyFansच्या जुन्या नियमांनुसार, बेकायदेशीर कंटेंटबाबत तक्रार मिळल्यानंतर संबंधित कंटेट हटवण्यात येतो. पण ते पोस्ट करणाऱ्या खातेदाराला केवळ त्यासाठी काही वेळा इशारा दिला जातो.

तज्ज्ञांच्या मते, यामधून OnlyFans ची बेकायदेशीर कंटेट पोस्ट करणाऱ्या खातेदारांप्रती असलेली मवाळ भूमिका दिसून येते.

या सर्व मुद्द्यांवर बीबीसी न्यूजने OnlyFans कंपनीकडे संपर्क साधला. बेकायदेशीर कंटेंट आणि ते पोस्ट करणाऱ्या खात्यांची हाताळणी यांबाबत OnlysFansची भूमिका काय आहे, असा स्पष्ट सवाल कंपनीला करण्यात आला.

बीबीसीने विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना OnlyFansने म्हटलं, OnlyFans आपल्या नियमावलीचं उल्लंघन कधीच सहन करणार नाही. वय पडताळणीसंदर्भातील सर्व मानकांचं पालन कंपनीकडून केलं जातं.

गेल्या जून महिन्यातही बीबीसीला OnlyFans साईटवर अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हीडिओ आढळून आले. हे कृत्य बेकायदेशीर असूनही अनेक खातेदार लहान मुलांशी संबंधित पॉर्नोग्राफिक कंटेंट शेअर करत होते.

बीबीसीच्या बातमीनंतर इंग्लंडच्या बालक आयुक्तांनी याची दखल घेतली. अल्पवयीन मुलांनी ही साईट वापरता येऊ नये यासाठी कंपनीने कठोर अशी तरतूद करणं गरजेचं आहे, असं म्हणत आयुक्तांनी OnlysFans ला खडसावलं.

त्याला प्रतिक्रिया देताना, तक्रार दाखल झालेले अकाऊंट्स बंद करण्यात आलेले आहेत. त्याच्या अॅक्टिव्ह सबस्क्रायबर्सचे पैसेही परत करण्यात आले आहेत, असं स्पष्टीकरण OnlyFans कंपनीने आयुक्तांकडे दिलं होतं.

त्यानंतर जुलै महिन्यात, कंपनीने याबाबत एक अहवाल दिला. त्यामध्ये लहान मुलांचं बिभत्स चित्रण असलेले 15 OnlyFans खाती कंपनीकडून बंद करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली होती. त्यानंतर आता कंपनीकडून वरील घोषणा करण्यात आली आहे.

त्यामुळे येत्या 1 ऑक्टोबरपासून अल्पवयीनांसंदर्भात सेक्स कंटेट पोस्ट करणाऱ्या खात्यांवर तत्काळ कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)