प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल यांच्या घरी लेकीचं आगमन

फोटो स्रोत, Reuters
द ड्यूक आणि द डचेस ऑफ ससेक्स यांना कन्यारत्न झालं आहे. 'लिलीबेट डायना माऊँटबॅटन विंडसर' असं या चिमुरडीचं नाव असून तिचा जन्म शुक्रवारी कॅलिफोर्नियातल्या सँटा बार्बरामधील हॉस्पिटलमध्ये झाला.
बाळ आणि बाळाची आई अर्थात मेगन मर्कल दोघींचीही प्रकृती चांगली आहे असं पत्रकात म्हटलं आहे.
शाही राजघराण्याच्या परंपरेनुसार राणीच्या पणतीचं नाव लिलीबेट असं ठेवण्यात येतं. त्यानुसार आम्ही आमच्या मुलीचं नाव ठेवलं आहे असं प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल यांनी सांगितलं.
आजीच्या स्मृतीप्रीत्यर्थ तिच्या नावात डायना असेल असंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
लिलीबेटचा जन्म शुक्रवारी सकाळी 11.40वाजता झाला. तिचं वजन सात किलो असून तिची तब्येत स्थिर असून ती आता घरी आहे.
राणीचं हे अकरावं नातवंडं असून, राजघराण्याची ती आठवी वारसदार आहे.
"4 जून रोजी आमच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचं आगमन झालं. आम्ही कल्पना केली होती त्यापेक्षा ती अधिकच सुंदर आहे. जगभरातून आमच्यासाठी आलेल्या शुभेच्छांबद्दल ऋणी आहोत. तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी अतिशय मोलाचा आहे. आमच्या कुटुंबासाठी हा अतिशय हृदय क्षण आहे", असं या जोडप्याच्या आर्चवेल या वेबसाईटवर म्हटलं आहे.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल यांचं मे 2018 मध्ये लग्न झालं. विंडसर कॅस्टल इथे हा लग्नसोहळा झाला होता. वर्षभरात त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव आर्ची हॅरिसन माऊंटबॅटन-विंडसर असं आहे.
मार्च 2020 मध्ये प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल यांनी राजघराण्यातील भूमिकेचा त्याग केला होता. हे दोघे अमेरिकेत कॅलिफोर्निया इथे राहत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








