हॅरी-मेगन मर्कल यांच्या वंशद्वेषी टिप्पणीवर राजघराणं चिंतेत, शाही परिवारचं वक्तव्य

फोटो स्रोत, HANDOUT
प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल यांनी ब्रिटनच्या राजघराण्यावर वंशद्वेषाचा आरोप केल्यानंतर, ब्रिटिश राजघराण्याने पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
बकिंगहम पॅलेसकडून सांगण्यात आलंय "ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स यांनी राजघराण्यावर वंशद्वेषाचा केलेला आरोप चिंतेत टाकणारा आहे. या मुद्यावर कुटुंबात खासगी चर्चा केली जाईल."
प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्कल यांनी दोन दिवसापूर्वी अमेरिकेच्या टीव्ही प्रेझेंटर ऑप्रा विन्फ्रे यांना मुलाखत दिली होती. यात हॅरी-मर्कल यांनी ब्रिटीश राजघराण्यातील एका व्यक्तीने वंशद्वेषाची टिप्पणी केल्याचा आरोप केला होता.
हॅरी-मेगन यांच्या मुलाखतीनंतर बकिंगहम पॅलेसकडून ब्रिटनच्या महाराणीतर्फे एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं आहे.
"गेली काही वर्षं हॅरी-मेगन यांच्यासाठी किती आव्हानात्मक होती, हे ऐकून शाही कुटुंबाला खूप दुख: झालं," असं या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
या प्रसिद्धी पत्रकानुसार, "दोघांनी उपस्थित केलेले प्रश्न, खासकरून वंशद्वेषी टिप्पणी चिंताजनक आहे. काही लोकांनी काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने आठवत असतील. या गोष्टींना गांभीर्याने विचारात घेण्यात आलं आहे. राजघराण्यात या मुद्यावर खासगी चर्चा केली जाईल."
बकिंगहम पॅलेसकडून जारी करण्यात आलेल्या या प्रसिद्धी पत्रकात, ब्रिटिश राजघराणं हॅरी, मेगन आणि त्यांचा मुलगा आर्चीला सदैव प्रेम करत रहातील, असं सांगण्यात आलं आहे.
ओप्रा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत, हॅरी आणि मेगन यांनी "राजघराण्यातील एका व्यक्तीने त्यांच्या मुलाचा रंग किती काळा असेल" अशी विचारणा केल्याचं सांगितलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
मुलाखतीनंतर हॅरी यांनी वंशद्वेषी टिप्पणी, ब्रिटनच्या महाराणी आणि प्रिन्स फिलिप यांच्याकडून करण्यात आलेली नव्हती असा खुलासा केला होता.
अमेरिकन अभिनेत्री मेगन मर्केल ब्रिटिश राजघराण्यात 'मिक्स्ड रेस' च्या पहिल्या सदस्य आहेत.
मेगन आणि हॅरी यांच्या या मुलाखतीची मीडियात खूप चर्चा होत आहे. यानंतर बकिंघम पॅलेसवर वंशद्वेषी टिप्पणीबाबत उत्तर देण्यासाठी दबाव वाढत होता.
बकिंगहम पॅलेसकडून हे वक्तव्य जारी करण्याआधी, राजघराण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपात्कालीन बैठक झाली.
ओप्रा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत, हॅरी-मेगन यांनी राजघराण्यावर वंशद्वेष, मानसिक आरोग्य आणि मीडिया या विषयांवर विस्तृत चर्चा केली आहे.
मेगन यांच्यावर टिप्पणी, ब्रिटिश पत्रकाराला सोडावा लागला टीव्ही शो
ब्रिटीश पत्रकार आणि टीव्ही प्रेझेंटर पियर्स मॉर्गन यांना मेगन मर्केल यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यामुळे आयटीव्हीचा शो 'गुड मॉर्निंग ब्रिटन' सोडावा लागला आहे.
मॉर्गन 2015 पासून हा शो होस्ट करत होते.
पियर्स मॉर्गन यांनी ट्विट केलं होतं "मुलाखतीत मेगन मर्कल यांनी मानसिक आरोग्य आणि आत्महत्येच्या विचारांबाबत केलेल्या वक्तव्यांवर मला अजिबात विश्वास नाही."
मॉर्गन यांच्या या वक्तव्यानंतर आयटीव्हीला 41 हजार तक्रारी मिळाल्या होत्या.
आयटीव्हीचे प्रवक्ते म्हणाले, "आयटीव्हीसोबत चर्चा झाल्यानंतर मॉर्गन यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आयटीव्हीने त्यांचा निर्णय मान्य केलाय. याशिवाय आमच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही."
पियर्स मॉर्गन पहिल्यांदा वादात सापडलेले नाहीत. ट्वीट्स आणि वक्तव्यांवरून ते नेहमीच टीकेचे धनी ठरले आहेत.
हॅरी-मेगन यांनी मुलाखतीत काय म्हटलं होतं?
राजघराण्यासोबत राहाताना आलेल्या अनुभवांबद्दल बोलताना मेगन म्हणतात, "काही दिवस मला एकटं वाटत होतं. माझ्या जीवनात असं कधीच झालं नव्हतं. अनेक नियमांमध्ये बांधून ठेवण्यात आलं होतं. मित्रांसोबत लंचसाठी मी बाहेर जाऊ शकत नव्हते."
"मी हॅरीसोबत असताना एकटेपण अनुभवत नव्हते. पण, त्यांना काही कामासाठी बाहेर जायचं असेल तर, मी खूप एकटी असायचे. मला अनेक गोष्टी करण्याची परवानगी नव्हती. बहुदा यामुळेच एकटेपणा वाढत होता," असं त्या पुढे म्हणतात.
ओप्रा यांनी मेगन यांना त्यांनी उच्चारलेल्या 'अनसर्वाइवेबल' शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न विचारला.
याचं उत्तर देताना मेगन म्हणतात, "मला जिवंत रहायचं नव्हतं. मला हॅरीला या गोष्टी सांगण्यात संकोच होत होता. त्यांनी जीवनात बरंच काही हरवलं आहे. त्यामुळे हा भीतीदायक प्रश्न नेहमी माझ्या डोक्यात घर करून असायचा."
मेगन सांगतात, त्यांनी यासाठी 'संस्था'कडून मदतीची परवानगी मागितली. त्या एखाद्या ठिकाणी जाऊन मदत घेऊ शकतात का? त्यांची मागणी फेटाळून लावण्यात आली.
प्रिंन्स हॅरी म्हणाले, "माझं कुटुंब वंशद्वेषी टिप्पणीविरोधात उभं राहिलं नाही. याचं मला खूप दुख: झालंय."
हॅरी आणि मेगन यांनी त्यांचा मुलगा आर्चीला सुरक्षा आणि राजकुमार पदवी न मिळाल्याबद्दलही वक्तव्य केलं.

फोटो स्रोत, Reuters
मेगन म्हणतात, "मी गर्भवती असताना माझा मुलगा किंवा मुलीला प्रिन्स किंवा प्रिन्सेसची पदवी देण्याबद्दलचे नियम बदलले गेले. हा हक्क ते घेऊ शकत नाहीत. हा नियम आर्चीसाठी बदलला आहे असं ते म्हणाले. माझा प्रश्न आहे का?"
त्या सांगतात, "मी गर्भवती असताना, जन्म झाल्यानंतर त्याच्या त्वचेचा रंग किती काळा असेल. यावर चिंता व्यक्त केली जात होती. चर्चा करण्यात येत होती."
राजघराण्यापासून वेगळे उत्तर-अमेरिकेत राहतात हॅरी-मेगन
गेल्यावर्षी प्रिन्स हॅरी म्हणाले होते की, "मी आणि मेगन राजघराण्यातील वरिष्ठ सदस्यांच्या भूमिकेपेक्षा स्वत:ला वेगळं करत आहोत. ते स्वतला आर्थिकरित्या स्वतंत्र बनवण्यासाठी काम करणार आहेत."
ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्सच्या या निर्णयामुळे ब्रिटिश राजघराणं आश्चर्यचकित झालं होतं.
प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी ते ब्रिटन आणि उत्तर-अमेरिकेत रहातील असं वक्तव्य केलं होतं.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









