मुस्लीम धर्मीय फ्रान्स आणि मॅक्रॉन यांच्यावर का चिडले आहेत?

EPA

फोटो स्रोत, EPA

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात आता भारतातदेखील निदर्शनं होत आहेत. भोपाळ आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये मॅक्रॉन यांच्या वक्तव्याचा आणि भूमिकेचा निषेध करण्यात येत आहे.

मुंबईतल्या भेंडी बाजार परिसरातल्या रस्त्यांवर इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पोस्टर्स विरोध म्हणून लावण्यात आले होते. पादचाऱ्यांच्या पायाखाली येतील अशा पद्धतीने ते लावण्यात आले होते. याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी हे पोस्टर्स काढून टाकले.

दुसरीकडे समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी माफी मागावी असं म्हटलंय. तसंच भारतानं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या भूमिकेला दिलेल्या पाठिंब्याचासुद्धा त्यांनी निषेध केला आहे.

इस्लाम कुणाच्याही हत्येला पाठिंबा देत नाही, फ्रान्समध्ये झालेल्या हत्यांचासुद्धा निषेध करत असल्याचं आझमी यांनी म्हटलंय.

European Photopress Agency

फोटो स्रोत, European Photopress Agency

पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम मुस्लिमांच्या विरोधात उभे राहतात, पण या देशात गंगा-जमुना तेहजिब चालते अशी टीकासुद्धा आझमी यांनी केली आहे.

तिकडे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मुस्लिमांनी एकत्र येत याविरोधात निदर्शनं केली. भोपाळच्या इकबाल मैदानात मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येत फ्रान्स आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याविरोधात निदर्शनं आणि घोषणाबाजी केली.

त्यावेळी फ्रान्सचा झेंडा आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे फोटो जाळण्यात आले.

नेमकं प्रकरण काय?

फ्रान्समधल्या इतिहास शिक्षकाच्या हत्येचं प्रकरण गाजत असतानचा गुरुवारी (29 ऑक्टोबर) फ्रान्सच्या नीस शहरात चाकू हल्ला झाला. यामध्ये तीन जणांचा बळी गेला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पहिल्या हल्ल्यानंतर इस्लामी कट्टरतावाद्यांविषयी कठोर भूमिका घेतलेली आहे.

इस्लाम

फोटो स्रोत, AHMAD GHARABLI

या सगळ्याला सुरुवात झाली फ्रान्समधल्या एका हत्येपासून. शार्ली हेब्दो मासिकाने 2015मध्ये मोहम्मद पैगंबरांवरचं कार्टून प्रसिद्ध केल्यानंतर या मासिकाच्या ऑफिसवर हल्ला झाला होता. हेच व्यंगचित्र वर्गामध्ये दाखवणाऱ्या सॅम्युअल पॅटी या शिक्षकाची 16 ऑक्टोबरला गळा चिरून हत्या करण्यात आली.

"आपण अशा प्रकारच्या कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, शिक्षकाची हत्या म्हणजे इस्लामी अतिरेक्यांचा हल्ला असल्याचं" फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या शिक्षकाला श्रद्धांजली वाहताना म्हटलं होतं.

यानंतर फ्रेंच सरकारने इस्लामी कट्टरपंथियांच्या विरोधात मोहीम सुरू करत छापे टाकले.

मॅक्रॉन यांच्या विधानानंतर मुस्लिमबहुल देशांमध्ये याविरोधातल्या प्रतिक्रिया उमटल्या.

मुस्लिम देशांतून निषेध

फ्रेंच उत्पादनांवर बहिष्कार टाकावा अशी मागणी करत कुवेत, जॉर्डन आणि कतारच्या काही दुकानांमधून फ्रेंच उत्पादनं काढून टाकण्यात आलेली आहेत.

इस्लाम

फोटो स्रोत, Reuters

तर फ्रान्समध्ये तयार झालेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा असं आवाहन तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचप तैय्यब अर्दोआन यांनी त्यांच्या जाहीर भाषणातून केलंय.

आर्दोआन यांनी प्रखर भूमिका घेण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे फ्रान्समधल्या शार्ली एब्दो मासिकाने अर्दोआन यांची थट्टा करणारं एक कार्टून छापलं, ज्यामध्ये ते फ्रान्सवर कायदेशीर आणि धोरणात्मक कारवाई करण्याची धमकी देताना दिसतात.

अर्दोआन

फोटो स्रोत, EPA

आपल्या भाषणामध्ये अर्दोआन म्हणाले, "दुसऱ्या महायुद्धाच्या आधी युरोपात ज्याप्रमाणे ज्यूंची हत्या करण्यात आली होती, तशाच प्रकारची वागणूक आता मुस्लिमांविरोधात होतेय. युरोपातल्या नेत्यांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना त्यांनी सुरू केलेली मुस्लिमांबद्दलचा असंतोष निर्माण करण्याची मोहीम थांबवण्यास सांगावं. इस्लामबद्दल अशी भूमिका घेणाऱ्या मॅक्राँ यांनी स्वतःची मानसिक स्थिती तपासून घेण्याची गरज आहे."

याचा निषेध करत फ्रान्सने तुर्कीतल्या आपल्या राजदूतांना परत बोलवून घेतलं. "आम्ही हार मानणार नाही, असंतोष पसरवणारी वक्तव्य स्वीकारली जाणार नाहीत. कायमच मानवता आणि जागतिक मूल्यांची बाजू घेऊ", असं मॅक्रॉन यांनी ट्वीट केलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

युरोपातल्या अनेक देशांच्या सरकारांनी फ्रान्सला पाठिंबा देत अर्दोआन यांच्या विधानाचा निषेध केलाय.

भारतानेही फ्रान्सला पाठिंबा दिलाय. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर ज्या शब्दांत टीका करण्यात आली, त्याचा आपण निषेध करत असल्याचं भारताने म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

इस्लामी आंदोलन बांगलादेश, या बांगलादेशातल्या सगळ्यांत मोठ्या इस्लामी पक्षाने आयोजित केलेल्या मोर्चात 40,000 जण सहभागी झाल्याचं सांगण्यात येतंय...

फ्रेंच वस्तूंवर बहिष्कार घालण्यात यावा, फ्रान्ससोबतचे संबंध तोडून टाकण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात यावी.

जगभरातल्या अनेक इस्लामिक देशांमध्ये असेच मोर्चे झालेले आहेत वा या देशांनी फ्रान्सविरोधात प्रखर भूमिका घेतलीय.

इराक, लिबिया आणि सीरियामध्येही फ्रान्सच्या विरोधात निदर्शनं झाली.

इराणच्या संसदेमध्ये फ्रान्समधल्या घडामोडींविषयी चर्चा झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पैगंबर मोहम्मदांचा अपमान होत असल्याचं मत संसदेत मांडण्यात आलं.

व्हीडिओ कॅप्शन, मुस्लीम राष्ट्र फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर का चिडलेत? #सोपीगोष्ट 198

फ्रान्समधून आपल्या राजदूतांना परत बोलवून घेण्यात यावं, यासाठी पाकिस्तानी संसदेने प्रस्ताव पारित केला....पण फ्रान्समध्ये पाकिस्तानचा राजदूतच नसल्याचं नंतर त्यांच्या लक्षात आलं.

त्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी एक ट्वीट केलं होतं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे जगातल्या 'इस्लामोफिबाया'ला प्रोत्साहन देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

पश्चिमेतल्या देशांमध्ये वाढणारा हा इस्लामोफोबिया रोखण्यासाठी सर्व मुस्लिम देशांतल्या नेत्यांनी एकत्र यावं, असं आवाहन करणारं पत्र इमरान खान यांनी लिहीलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

फ्रान्स - तुर्की संबंध

पण फ्रान्स आणि तुर्कीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. तुर्कस्थानाला युरोपियन युनियनमध्ये घ्यायला फ्रान्सचा विरोध आहे. सोबतच भूमध्य समुद्रामध्ये तुर्कस्थानाने तेल आणि गॅसचे साठे शोधायलाही फ्रान्सचा विरोध आहे. लिबियामध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धात फ्रान्स आणि तुर्की यांनी परस्परविरोधी भूमिका घेतलेली आहे.

फ्रान्समध्ये हल्ल्याचं प्रमाण वाढल्यानंत स्थानिकांमधला रोषही वाढतोय. इतिहास शिक्षक सॅम्युएल पॅटी यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हजारो फ्रेंच नागरिक रस्त्यांवर उतरले होते.

पण या असंतोषामागे आर्थिक कारणंही असल्याचं आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ प्रा. शैलेंद्र देवळाणकर सांगतात. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "फ्रान्समध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांविरुद्धचा जो वाढता रोष आहे, तो काही नवीन नाही. याप्रकारचा संघर्ष फ्रान्समध्ये यापूर्वीही होता. ज्या ज्या वेळेला फ्रान्स आर्थिक समस्येच्या गर्तेमधून गेलेला आहे, त्या त्या वेळेला अशा स्वरूपाचे वाद उफाळून बाहेर आले आहेत. 2008ला ज्यावेळी संपूर्ण युरोपात आर्थिक मंदीचं वातावरण होतं, त्यावेळी देखील फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला ज्या पद्धतीचे झटके बसले होते, त्यानंतरही फ्रान्सची जनता आणि अल्पसंख्याक मुस्लिम यांच्यातला हा वाद उफाळून आला होता.

"आता कोरोनामुळे फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला कमालीचा फटका बसलेला असताना अशा स्वरूपाचे संघर्ष पुन्हा एकदा बाहेर येताना आपल्याला दिसतात. हा राग प्रामुख्याने मुस्लिमांबद्दल असण्यापेक्षा तो राग जे आखातातून फ्रान्समध्ये आलेले निर्वासित आहेत, ज्यांच्यामुळे स्थानिकांच्या रोजगारावर हल्ले झालेले आहेत त्यांच्या विरोधातला हा वाद प्रामुख्याने आहे. म्हणून याची आर्थिक बाजू फार महत्त्वाची आहे," प्रा. देवळाणकर सांगतात.

फ्रान्सवर बहिष्काराचा काय परिणाम होईल?

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार पश्चिम युरोपाताल्या देशांमध्ये फ्रान्समध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे. फ्रान्समध्ये जवळपास 50 लाख मुस्लिम लोकसंख्या आहे. जे देश फ्रेंच वस्तूंवर बहिष्कार घालायचं म्हणताहेत, त्यांना फ्रान्सकडून विमान आणि विमानविषयक सामान, वाहन उद्योगाशी संबंधित भाग, कृषी उत्पादनं -त्यातही मोठ्या प्रमाणात गहू निर्यात आणि फॅशन - लक्झरी वस्तूंची निर्यात होते.

त्यामुळे जर मुस्लिम देशांनी खरंच फ्रेंच वस्तूंवर बहिष्कार टाकला, तर फ्रान्सच्या या क्षेत्रांवर त्याचा परिणाम होईल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)