इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणतात, 'मुस्लिमांच्या भावना समजू शकतो पण...'

फोटो स्रोत, LUDOVIC MARIN
मुस्लिमांच्या भावना आपण समजू शकतो, पण कट्टर इस्लाम सर्वांसाठी धोका आहे, असं वक्तव्य फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलं आहे.
अल जजीरा या वृत्तवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीत मॅक्रॉन यांनी हे वक्तव्य केलं.
मोहम्मद पैगंबर यांचं कार्टून दाखवणं, त्यानंतर झालेल्या हत्या, त्यावरचं मॅक्रॉन यांचं वक्तव्य आणि मुस्लीम देशांकडून होत असलेला निषेध या संपूर्ण प्रकरणावर इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली.

फोटो स्रोत, Twitter
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले, "मोहम्मद पैगंबर यांचं कार्टून दाखवल्यानंतर धक्का बसला आहे, अशा मुस्लिमांच्या भावना मी समजू शकतो. पण, मी ज्या कट्टर इस्लामविरोधात लढण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा धोका विशेष करून मुस्लिमांनाच आहे."
मी या भावना समजू शकतो. त्यांचा मी आदरही करतो. पण तुम्ही आता माझी भूमिका समजून घ्या. मला या भूमिकेत राहून शांतता प्रस्थापित करणं आणि अधिकारांचं संरक्षण करणं अशी दोन कामं करायची आहेत."
आपल्या देशातील बोलणं, लिहिणं, विचार व्यक्त करणं आणि चित्रित करण्याच्या स्वातंत्र्याचं संरक्षण मी नेहमीत करत राहीन, असंही मॅक्रॉन म्हणाले.
काय आहे प्रकरण?

फोटो स्रोत, AHMAD GHARABLI
पैगंबर मोहम्मद यांचं कार्टून दाखवणाऱ्या फ्रान्सच्या एका शिक्षकाच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वक्तव्यांनी अनेक मुस्लीम देशांची नाराजी ओढवली आहे.
मॅक्रॉन यांनी आपल्या वक्तव्यात 'कट्टरवादी इस्लाम'वर टीका केली होती आणि शिक्षकाची हत्या म्हणजे 'इस्लामिक दहशतवादी हल्ला' असं म्हटलं होतं.
त्यानंतर अनेक अरब देशांनी फ्रान्सच्या उत्पादनांचा बहिष्कार सुरू केला आहे. कुवेत, जॉर्डन आणि कतारमधील काही दुकानांमधून फ्रान्समधील उत्पादनं हटवण्यात आली आहे. लिबिया, सीरिया आणि गाझा पट्टीत फ्रान्सच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत.
यावर फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, बहिष्काराच्या गोष्टी अल्पसंख्याक समुदायातील कट्टर गटच करू शकतो.
पैगंबर मोहम्मद यांचं वादग्रस्त कार्टून वर्गात दाखवल्याप्रकरणी एका शिक्षकाची हत्या झाल्यानंतर मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद सुरू झाला आहे.
एका विशेष समुदायाच्या भावनेचा विचार करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता येऊ शकत नाही, असं म्हणत मॅक्रॉन यांनी स्वत:चा बचाव केला आहे.
यामुळे धर्मनिरपेक्ष फ्रान्सची एकता कमी होते, असंही त्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, OZAN KOSE
मॅक्रॉन यांनी या शिक्षकाच्या हत्येपूर्वी फ्रान्समध्ये इस्लामिक कट्टरतावाद मोडून काढण्यासाठी कठोर कायदे बनवण्याची घोषणा केली होती.
"मला भीती वाटते की फ्रान्समधील जवळपास 60 लाख मुस्लीम लोकसंख्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळी पडू शकते," असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच इस्लाम म्हणजे असा धर्म जो संकटात आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.
मॅक्रॉन यांच्या वक्तव्यावर मोठी टीका झाली आहे. टर्की आणि पाकिस्ताननं मॅक्रॉन यांच्यावर आरोप केला आहे की, ते श्रद्धेच्या स्वतंत्रतेचा सन्मान करत नाहीत. तसंच फ्रान्सच्या मुस्लिमांना एका बाजूला ढकलत आहेत.
रविवारी (25 ऑक्टोबर) टर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप अर्दोआन यांनी मॅक्रॉन यांना 'मानसिक उपचार' करण्याचा सल्ला दिला आहे.
अर्दोआन यांच्या या टीकेनंतर फ्रान्सने टर्कीमधील आपल्या राजदुताला परत बोलावलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
बहिष्कारचं स्वरूप किती मोठं?
रविवारी जॉर्डन, कतार आणि कुवैतमधल्या काही सुपरमार्केटमधून फ्रान्सचं सामान हटवण्यात आलं. उदा. फ्रान्समधील सौंदर्य प्रसाधनं दुकानांमध्ये दिसली नाहीत.
कुवेतमधील एका मोठ्या कंपनीनं फ्रान्सच्या उत्पादनांचा बहिष्कार करण्याचा आदेश दिला होता.
ग्राहक समितीच्या अशासकीय संघानं म्हटलं की, "त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वारंवार करण्यात आलेल्या अपमानाला उत्तर म्हणून असे निर्देश जारी केले आहेत."
एका निवेदनात फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, "बहिष्काराची चर्चा अल्पसंख्याक समाजातील एक कट्टर गट करत आहे आणि त्यांनी तत्काळ बहिष्कार मागे घ्यायला हवा."
सौदी अरेबियातही सोशल मीडियाच्या माध्यमातून बहिष्काराचं आवाहन करण्यात आलं आहे.
अरब जगतातली सगळ्यांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या सौदी अरेबियात फ्रान्सची सुपरमार्केट चेन कॅरेफोरवर बहिष्कार करण्यासंबंधीचा हॅशटॅग दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत होता.
यादरम्यान लिबिया, गाझा आणि उत्तर सिरियातही फ्रान्सविरोधात निदर्शनं झाली. या भागांमध्ये टर्कीच्या पाठिंब्यानं मिलिशियाचं नियंत्रण आहे.
पाकिस्ताननं काय म्हटलं?
टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी एका भाषणादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता की, "मॅक्रॉन नावाच्या व्यक्तीला इस्लाम आणि मुस्लिसांविषयी काय समस्या आहे?"
तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मॅक्रॉन यांच्यावर आरोप केला आहे की, मॅक्रॉन इस्लामविषयी कोणतंही स्पष्ट ज्ञान नसल्यामुळे इस्लामवर टीका करत आहेत.

फोटो स्रोत, @PTIOFFICIAL
त्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं, "मॅक्रॉन यांनी युरोप आणि जगभरातल्या लाखो मुस्लिमांच्या भावनेवर हल्ला केला आहे आणि त्यांना त्रास दिला आहे."
इम्रान खान यांनी रविवारी (25 ऑक्टोबर) फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इस्लाम विरोधी माहिती हटवण्याचं आवाहन केलं आहे.
इम्रान यांनी झकरबर्ग यांना म्हटलं, "फेसबुकवरील वाढत्या इस्लामोफोबियाकडे मी तुमचं ध्यान आकर्षित करू इच्छित आहे. यामुळे जगभरात भेदभाव आणि हिंसा पसरत चालली आहे."
रविवारी इम्रान खान यानी ट्वीट करत म्हटलं, "या काळात मॅक्रॉन यांनी संवेदनशीलपणे प्रश्न हाताळायला हवेत. त्यांनी समाजात फूट पाडण्याचं, समाजाला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे कट्टरपणा अधिकच वाढेल."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"हिंसा करणारे दहशतवादी मग ते मुस्लीम असो की गोरे असो की नाझी विचारधारेचे असो. त्यांच्यावर टीका करण्याऐवजी मॅक्रॉन यांनी इस्लामवर हल्ला करत इस्लामोफ़ोबियाला वाढवत नेण्याचा मार्ग निवडला," असंही खान यांनी म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
मॅक्रॉन यांनी ट्वीट करत म्हटलंय की, आम्ही कधीच पराभव स्वीकारणार नाही.
ते म्हणाले, "शांततेमध्ये विश्वास असणाऱ्या सर्व मतभेदांचा आम्ही सन्मान करतो. पण भेदभाव पसवणाऱ्या भाषणांना आम्ही स्वीकारत नाही. आम्ही नेहमी मानवी मूल्य आणि प्रतिष्ठेसाठी लढत राहू."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
मॅक्रॉन यांच्या या ट्वीटकडे सारवासारव म्हणूनही पाहिलं जात आहे. त्यांनी इंग्रजीसोबतच अरबी भाषेतही हे ट्वीट केलं आहे.
यापूर्वी त्यांनी फ्रेंच भाषेत अनेक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी लिहिलं होतं, "आमचा इतिहास अत्याचार आणि कट्टरवादाविरोधात संघर्ष करण्याचा आहे. आम्ही तो सुरू ठेवू."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








