कोरोना आरोग्य : गांजा ओढणे हा खरंच कोव्हिड-19 वरचा उपचार आहे का? - रिअॅलिटी चेक

रशियन खासदार

फोटो स्रोत, STATE MEDIA @RUSSIA

फोटो कॅप्शन, बिल्ला लावलेले रशियन खासदार
    • Author, जॅक गुडमॅन आणि फ्लोरा कार्मायकल
    • Role, बीबीसी रिअॅलिटी चेक टीम

कोरोना व्हायरसच्या या संकटामध्ये जो तो नवी माहिती घेऊन सोशल मीडियावर टाकत आहे. मात्र सोशल मीडियावर येणाऱ्या या माहितीमध्ये किती तथ्य असतं? याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला आहे.

फसवे 'व्हायरस ब्लॉकरबॅज'

कोरोना व्हायरसपासून रक्षण होईल असे सांगून जगभरात काही बिल्ले विकले जात आहेत. याला 'व्हायरस ब्लॉकर बिल्ले' म्हटलं जात आहे.

रशियाच्या बाजारात असे बिल्ले बेधडक विकले जात आहेत. यातील काही बिल्ल्यांवर पांढरा क्रॉस काढण्यात आलेला आहे. कोरोनाला रोखतील असं सांगून हे बिल्ले विकण्यात येत आहेत. काही खासदारांनीही हा बिल्ला लावल्याचे दिसून आले.

अमेरिकेच्या फेडरल ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने याबाबत एक धोक्याची सूचना दिली आहे. या बिल्ल्यातून एक प्रकारचा ब्लीचिंग पदार्थ (क्लोरिन डायऑक्साइड) बाहेर पडतो, तो हानिकारक असतो. या बिल्ल्यासंदर्भात केले जाणारे दावे खोटे असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

रशियातील खासदार आंद्रे स्विंस्तोव यांना हा बिल्ला का लावला आहे असं बीबीसीनं विचारलं. 'या बिल्ल्याचा फायदा होतो की नाही हे माहिती नाही, पण आपण अजूनपर्यंत तरी आजारी पडलेलो नाही,' असं स्विंस्तोव यांनी सांगितलं.

कोरोना
लाईन

त्यांनी म्हटलं, "मी आल्याचा तुकडा चघळतो. मी सी व्हिटॅमिन घेतो. इंटरनेटवर जे विचित्र सल्ले मिळतात, ते सर्व पाळतो. न जाणो त्यामुळे खरंच काही फायदा होत असेल."

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे प्रवक्ते दमित्री पेस्कोव्हसुद्धा हा बिल्ला वापरत असल्याचं दिसलं आलं होतं. त्यांना कोरोना व्हायरसची लागण होऊन आता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं त्यांनी गेल्या आठवड्यात मान्य केलं.

नॉटिंगहॅम विद्यापीठाचे असोसिएट प्रोफेसर आणि बायोकेमिस्ट डॉ. वेन कार्टर म्हणतात, "शिंकल्यावर, खोकल्यावर थुंकीतून जे द्रवकण बाहेर पडतात त्याने कोरोना व्हायरस पसरतो. त्यामुळे असे बिल्ले उपयोगी नाहीत."

कोरोनावर गांजाचा उतारा?

गांजामुळे कोव्हिड-19 वर उपचार करता येईल, असं सांगणारे अनेक लेख सोशल मीडियावर हजारो लोकांनी शेअर केले आहेत. त्यापैकी अनेक लेखांची शीर्षक भ्रामक आणि दिशाभूल करणारे आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गांजाचा खरंच काही फायदा होऊ शकतो का हे पाहाण्यासाठी कॅनडा, इस्रायल, ब्रिटनमध्ये चाचपणी सुरू आहे हे नक्की आहे. औषधी गांजाचा वापर करुन संक्रमणाचा काळ कमी करण्यास मदत मिळाली आहे आणि सायटोकाइन स्टॉर्ममध्येही फायदा होऊ शकतो. साटोकाइन स्टॉर्म कोव्हिड-19 च्या गंभीर रुग्णांमध्ये दिसून येणारी स्थिती आहे.

अर्थात ही चाचपणी अत्यंत सुरुवातीच्या टप्प्यात आहे त्यामुळेच त्यातून कोणताही निष्कर्ष आताच काढणे योग्य ठरणार नाही.

गांजा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गांजा

फेसबुकने एका लेखावर कॅनडात सुरू असलेल्या अभ्यासाचा अंशतः रुपात चुकीची माहिती देऊन हवाला दिल्याचा ठपका ठेवला आहे. 'पॉलिटी फॅक्ट' नावाच्या एका वेबसाईटने कोरोना व्हायरसचा प्रसार यामुळे रोखू शकतं असं म्हणणं 'जरा जास्त'च आहे असं म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये गांजाच्या औषधी उपयोगावर संशोधनाचे अनेक प्रयोग झाले आहेत. पण त्यातून वेगवेगळी अनुमानं निघाली आहेत, लोकांना या संशोधनात भरपूर रस आहे.

हा व्हायरस कसा तयार झाला?

चीनमध्ये कोरोना व्हायरस पहिल्यांदा दिसला म्हणून तो चीनमध्येच तयार झाला असं होत नाही असं चीनच्या सरकारी माध्यमांनी नुकतंच म्हटलं आहे.

या व्हीडिओत इटलीतील एका शास्त्रज्ञाचा उल्लेख करण्यात आला आहे. या शास्त्रज्ञाने अमेरिकन रेडिओ वाहिनीला एक मुलाखत दिली होती. इटलीच्या उत्तर भागात नोव्हेंबर महिन्यात न्यूमोनियाचे विचित्र प्रकार दिसून आले होते. त्यामुळे हा व्हायरस आधीपासूनच इटलीत पसरलेला असेल, असं या व्हीडिओत म्हटलं होतं.

बीबीसीचे चीनी माध्यमांचे विश्लेषण करणारे कॅरी एलन सांगतात, कोरोना व्हायरस चीनमध्ये तयार झालाच नाही या दाव्याला पाठबळ देणाऱ्या बातम्यांना मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रोत्साहन देण्यात येत आहे.

लाईन

लाईन

हा व्हायरस कोठे तयार झाला याबद्दल अजून कोणताही शास्त्रीय आधार नाही. कोरोना विषाणूच्या स्रोताचा शोध घेण्यासाठी त्याची जनुकीय संरचना शोधण्याची गरज आहे. काळानुरुप त्यानं आपलं रुप कसं बदललं हे तपासायला हवं.

बाजेल विद्यापीठातील साथीच्या रोगाचे तज्ज्ञ डॉ. एमा हॉडक्राफ्ट सांगतात, की युरोप आणि अमेरिकेत मिळालेल्या या विषाणूच्या नमुन्यांवरुन तो चीनमधूनच आला हे स्पष्ट होतं. परंतु चीनमध्ये या विषाणूनं अनेकवेळा आपलं रुप बदललं आहे.

त्या सांगतात, "हा व्हायरस चीनच्या ऐवजी इतरत्र तयार झाला या दाव्याला काहीही शास्त्रीय आधार सापडलेला नाही."

येमेन

फोटो स्रोत, AFP

कोव्हिड रुग्णांच्या सामूहिक हत्येबद्दल केला जाणारा दावा

हुती बंडखोरांनी कोव्हिड-19 रुग्णांची सामूहिक हत्या केल्याचे एक ट्वीट येमेनचे माहिती प्रसारण मंत्री मुअम्मर अल- एरयानी यांनी केले होते. योग्यप्रकारे उपचार करण्याऐवजी त्यांची हत्या होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. परंतु अशी हत्या केली नसल्याचं हुती बंडखोरांनी म्हटलं आहे.

या हत्या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी सरकारी प्रवक्त्यांनं केली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)