कराची विमान अपघात: पाकिस्तान अपघातात वाचलेले मोहम्मद झुबैर - मला समोर फक्त आग दिसत होती

विमान

फोटो स्रोत, EPA

"कुणालाच माहिती नव्हतं की विमान क्रॅश होणार आहे. सगळंकाही सुरळीत चाललं होतं," मोहम्मद झुबैर सांगत होते. "मी माझा सीटबेल्ट काढला आणि मला प्रकाश दिसला - मी त्याच दिशेने गेलो. मला तिथून वाचून निघण्यासाठी साधारण 10 फूट उंचीवरून उडी घ्यायची होती," झुबैर म्हणाले.

पाकिस्तानच्या कराचीमध्ये शुक्रवारी झालेल्या प्रवासी विमान अपघातात बचावलेल्या दोन जणांपैकी ते एक आहेत. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

लाहोरहून कराचीसाठी निघालेल्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या (PIA) या विमानात 91 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर असे एकूण 99 लोक होते.

दुपारी एक वाजता लाहोरहून हे विमान कराचीच्या दिशेनं झेपावलं. मात्र, कराची विमानतळावर उतरण्याआधीच विमानतळापासून अगदी जवळच असलेल्या जिना गार्डन या रहिवाशी भागात कोसळलं.

या अपघातानंतर मोहम्मद झुबैर बेशुद्ध पडले. "मी शुद्धीवर आलो तेव्हा मला फक्त कोलांच्या किंकाल्या ऐकू येत होत्या. मुलांच्या, मोठ्या लोकांच्या... मला समोर फक्त आग दिसत होती. मला लोक दिसतच नव्हते... फक्त त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या," ते सांगत होते.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

आतापर्यंत यात 97 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. या अपघाताची दृश्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. विमान कोसळताना इंजिनाला आग लागलेली नसल्याचं बीबीसी ऊर्दूचे जीशान हैदर यांनी म्हटलं आहे. विमान कोसळल्यानंतर कराचीच्या त्या भागाला धूर, धूळ, आगीने वेढलं.

कसा झाला अपघात?

PK8303 नावाचं हे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचं (PIA) विमान होतं. दुपारी एक वाजता लाहोरहून हे विमान कराचीच्या दिशेनं झेपावलं. मात्र, कराची विमानतळावर उतरण्याआधीच विमानतळापासून अगदी जवळच असलेल्या जिना गार्डन या रहिवाशी भागात कोसळलं.

कराची एअरपोर्टच्या आधी म्हणजेच 3.2 किलोमीटर अंतरावर हे विमान जिन्ना गार्डन मॉडेल कॉलनीत कोसळलं. अपघातापूर्वी वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याचं कळवलं होतं. वैमानिक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर यांच्यातील संभाषणाची क्लिप उपलब्ध असल्याचं पाकिस्तानमधील न्यूजचॅनेल दुनिया न्यूजने म्हटलं आहे.

पाकिस्तानात प्रवासी विमान कोसळलं

विमान कोसळल्यानं या भागातील काही घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक गाड्यांनाही आग लागली. मात्र हे विमान क्रॅश का झालं, हे अद्याप स्पष्ट नाही.

मात्र एका नागरी उड्डाण अधिकाऱ्याच्या मते, विमानाची चाकं लँडिंगच्या वेळी बाहेर निघाली नव्हती. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या काही फोटोंमध्येही विमानाची चाकं दिसत नाहीय आणि दोन्ही इंजिनला बाहेरून गंभीर नुकसान झालं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

हे रेकॉर्डिंग मॉनिटरिंग वेबसाईट liveatc.net या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलं आहे. वैमानिकाचे शब्द ऐकू येतात- "विमानाची दोन्ही इंजिनं बंद पडली आहेत, मे डे! मे डे!"

बीबीसी ऊर्दूचे प्रतिनिधी रियाज सुहैल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान कोसळण्याच्या मिनिटभर आधी विमान आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर यांचा संबंध तुटला. त्यानंतर सगळीकडे धूर पसरला. त्यानंतर विमान कोसळल्याची बातमी सगळीकडे पसरली.

काही प्रत्यक्षदर्शींनी या दुर्घटनेचे व्हीडिओ शूट केले. त्यानुसार, घटनास्थळावरील गाड्यांनाही आग लागलेली दिसून येतेय. तसंच, या अपघातानंतर घटनास्थळावर धुराचे लोट दिसले.

सर्वत्र हळहळ

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या अपघातानंतर दुःख व्यक्त केले आहे. बचावकार्य सुरू असल्याचे सांगून या अपघाताची तात्काळ चौकशी करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

सध्या या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, विमानातील ब्लॅक बॉक्स मधले रेकॉर्डिंग मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कराची पाकिस्तानचं व्यापारकेंद्र मानलं जातं. येथील जिना इंटरनॅशल एअरपोर्ट पाकिस्तानातील सर्वात व्यग्र विमानतळ मानलं जातं.

कराची विमान अपघात

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, कराची विमान अपघात

कोरोना व्हायरसमुळं लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन उठवल्यानंतर पाकिस्तानात हवाई वाहतूक सुरू करण्यात आली होती.

पाकिस्तानी सैन्याकडून बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेण्यात आलीय.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी आर्मीचे हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी घटनास्थळी गेले आहेत. अर्बन सर्च अँड रेस्क्यू टीमही घटनास्थळाकडे पाठवण्यात आल्यात.

पाकिस्तानातील तिसरी मोठी दुर्घटना

हवाई दुर्घटनेची आकडेवारी गोळा करणारी संस्था एअरक्राफ्ट क्रॅश रेकॉर्ड ऑफिसच्या माहितीनुसार, पाकिस्तानात आतापर्यंत 80 हून अधिक विमान दुर्घटना घडल्यात. या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत तीन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय.

कराची विमान अपघात

पाकिस्तानात सर्वात मोठा विमान अपघात इस्लामाबादजवळ 28 जुलै 2010 रोजी झाला होता. या अपघातात 152 जणांचा मृत्यू झाला होता.

20 एप्रिल 2012 रोजीही इस्लामाबादमध्येच अपघात झाला होता. त्यात 127 जणांचा मृत्यू झाला होता.

या दोन घटनांनंतर सर्वात मोठा अपघात आज कराचीत झालेला अपघात मानला जातोय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)