वर्ल्ड कप LIVE: न्यूझीलंडचा थरारक विजय; टीम इंडियाचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं

पिचवर सध्या अर्धशतकवीर रवींद्र जडेजा आणि धोनी आहेत.

फोटो स्रोत, Twitter / ICC

अटीतटीच्या सेमी फायनलच्या लढतीत न्यूझीलंडने टीम इंडियावर 18 धावांनी थरारक विजय मिळवला. 5/3 तर 25/4 अशा स्थितीतून वाटचाल करणाऱ्या टीम इंडियाच्या आशा रवींद्र जडेजाने पल्लवित केल्या. जडेजा-धोनी जोडीने 116 धावांची भागीदारी केली. मात्र जडेजा आणि धोनी बाद होताच टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळल्या.

मार्टिन गप्तीलच्या अफलातून थ्रोच्या बळावर महेंद्रसिंग धोनीला रनआऊट करत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

सेमी फायनलच्या लढतीत न्यूझीलंडला नमवत अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला 240 धावांची आवश्यकता आहे. 5 बाद 3 अशा स्थितीतून टीम इंडियाने संघर्ष करत आतापर्यंत 150चा टप्पा 6 विकेट गमावून ओलांडला आहे. रवींद्र जडेजाने 59 चेंडूत 77 धावांची खेळी करत टीम इंडियाचा विजय दृष्टिक्षेपात आणला. मात्र बोल्टच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.

त्यापूर्वी, पावसामुळे मंगळवारी खेळ थांबवण्यात आला होता. बुधवारी न्यूझीलंडने 46.2 ओव्हरमध्ये 211/5 वरून पुढे खेळायला सुरुवात केली आणि 28 धावांची भर घालत 8 बाद 239 असा स्कोर केला.

भारताने 240च्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या तीन फलंदाजांना एक-एक धावांवर गमावलं.

स्पर्धेत आतापर्यंत 647 धावा करणारा रोहित शर्मा मॉट हेन्रीच्या अचूक टप्प्यावरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर ट्रेंट बोल्टच्या इनस्विंग बॉलवर विराट कोहली एलबीडब्ल्यू झाला. कोहलीने रिव्ह्यू घेतला मात्र थर्ड अंपायरने मैदानातील अंपायरच्या बाजूने निर्णय घेतला.

नंतर सलामीवीर लोकेश राहुलही हेन्रीच्या बॉलवर बाद झाला. 21व्या चेंडूवर पहिली धाव घेणारा दिनेश कार्तिक जेम्स नीशामच्या अफलातून कॅचवर बाद झाला. त्याने 6 धावा केल्या.

अखेर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या जोडीने पाचव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. सँटनरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा ऋषभचा प्रयत्न फसला. कॉलिन डी ग्रँडहोमनं चांगला झेल टिपला. त्याने 56 चेंडूत 32 धावा केल्या.

ऋषभ पंत मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर बाद झाला. दुसरीकडे सँटनरच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्या बाद झाला. त्याने 32 धावांची खेळी केली.

भारत, न्यूझीलंड, वर्ल्ड कप2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महेंद्रसिंग धोनी

रवींद्र जडेजाने फिल्डिंगमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्याने रॉस टेलरला रनआऊट केलं तर टॉम लॅथमला सुरेख कॅच टिपला. मंगळवारी खेळ जिथे थांबला तिथूनच मॅचला सुरुवात झाली आहे.

रॉस टेलरने 74 तर केन विल्यमसनने 67 धावांची खेळी केली. भारतातर्फे भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता पण न्यूझीलंडने 158 चेंडू निर्धाव खेळून काढले.

पावसाचा जोर कायम असल्याने अनेक शक्यता चर्चिल्या जात होत्या. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्याने अंपायर्सनी मंगळवारी खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

आज काय होणार?

जर आजही पाऊस पडला ओव्हर कमी होऊन आणि न्यूझीलंड पुढे बॅटिंग करू शकला नाही तर त्याल डकवर्थ लुईस नियमांच्या आधारावर भारताचं लक्ष्य निर्धारित होईल.

डकवर्थ लुईस नियमाचा आधार घ्यायचा झाल्यास भारताला 20 ओव्हरमध्ये 148 रन्स कराव्या लागतील. 25 ओव्हरमध्ये हे टार्गेट 172 रन, 30 ओव्हरमध्ये 192., 35 ओव्हरमध्ये 209 आणि 40 ओव्हरमध्ये 223 असेल. तर 46 ओव्हरमध्ये 237 रन्स भारताला कराव्या लागतील.

आज खेळ रद्द करावा लागला तर...

आज पावसामुळे खेळ रद्द करावा लागला तर प्राथमिक फेरीत गुणतालिकेत सर्वाधिक गुण असणाऱ्या संघाला विजेता घोषित केलं जाईल. प्राथमिक फेरीअखेर टीम इंडियाचे 15 तर न्यूझीलंडचे 11 गुण झाले आहेत. पावसाचा जोर कायम राहिला आणि मॅच रद्दच झाली तर टीम इंडियाला विजयी घोषित करण्यात येईल.

दरम्यान आतापर्यंतच्या डावात कर्णधार विल्यमसनने संयमी आणि चिवट अर्धशतकी खेळी केली. अर्धशतकानंतर रनरेट वाढवण्यासाठी आक्रमक झालेल्या केनला युझवेंद्र चहलने बाद केलं. त्याने 6 चौकारांसह 67 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

टेलर आणि विल्यमसन यांनी चांगली भागीदारी केली

फोटो स्रोत, Twitter / @CricketWorldCup

फोटो कॅप्शन, टेलर आणि विल्यमसन यांनी चांगली भागीदारी केली

बुमराहने भन्नाट फॉर्म कायम राखत मार्टिन गप्तीलला माघारी धाडलं. टप्पा पडून ऑफस्टंपवर मारा करणाऱ्या बुमराहच्या चेंडूवर गप्तीलने कोहलीने सुरेख कॅच घेतला. गप्तीलने एका धावेची भर घातली.

गप्तील बाद झाल्यानंतर केन विल्यमसन आणि हेन्री निकोल्स यांनी सावधपणे खेळ करत डाव सावरला. पॉवरप्लेच्या 10 ओव्हरमध्ये न्यूझीलंडने फक्त 27 धावा केल्या.

टीम इंडिया

फोटो स्रोत, Twitter / @cricketworldcup

दरम्यान रवींद्र जडेजाने हेन्री निकोल्सला बाद करत ही जोडी फोडली. निकोल्सने 51 चेंडूत 28 धावा केल्या.

टीम इंडियात बदल

टीम इंडियाने या मॅचसाठी कुलदीप यादवऐवजी युझवेंद्र चहलचा समावेश केला आहे. दरम्यान भुवनेश्वर कुमारऐवजी मोहम्मद शमीचा समावेश होईल अशी चिन्हं होती मात्र टीम इंडियाने भुवनेश्वरवरच विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने टीम साऊदीऐवजी लॉकी फर्ग्युसनचा समावेश केला.

चौथ्या ओव्हरनंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला. उपचारांसाठी हार्दिक पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडिया पाच गोलंदाजांसह खेळत असल्याने हार्दिक फिट असणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

प्राथमिक फेरीअखेर भारतीय संघ गुणतालिकेत 15 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारताने 9 पैकी 7 सामने जिंकले असून, इंग्लंडविरुद्धचा सामना त्यांनी गमावला होता तर न्यूझीलंडविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली होती.

दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत 11 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. न्यूझीलंडने 9 पैकी 5 सामने जिंकले असून 3 सामने गमावले आहेत.

भारत, न्यूझीलंड, वर्ल्ड कप2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किवींचा संघ

आजवर या दोन संघांत 8 वर्ल्ड कप सामने झाले असून, न्यूझीलंडने 4 तर भारतीय संघाने 3 सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द झाला होता.

फायनलमध्येही पाऊस आला तर

फायनलमध्ये पाऊस आला तर काय हा प्रश्नही इथे महत्त्वाचा आहे. कारण त्यापुढे कोणतीच फेरी नाही. जर फायनलमध्ये पाऊस आला तर दोन्ही संघांना विजेता घोषित केलं जाईल. ही परिस्थिती आतापर्यंत कधीही उपस्थित झालेली नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)