घराच्या रद्दीमध्ये सापडले 9/11चे यापूर्वी न पाहिलेले फोटो

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles
एका संग्राहकाने घराच्या 'क्लिअरन्स सेल'मध्ये विकत घेतलेल्या सीडीजमध्ये त्याला ग्राऊंड झिरोचे तब्बल 2400 फोटो सापडले आहेत. 2001मध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या 9/11च्या हल्ल्यांनंतरचे हे फोटो आहेत.
वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कोसळलेल्या टॉवर्सचा ढिगारा साफ करण्यासाठी मदत करणाऱ्या एका कामगाराने हे फोटो क्लिक केलेले आहेत. पण या व्यक्तीची नेमकी ओळख आतापर्यंत पटू शकलेली नाही.
या सीडीजची दुर्दशा झाली होती पण त्याला डेटा मिळवणं अखेरीस शक्य झालं.
या संग्राहकाने हे सगळे फोटो फ्लिकरवर अपलोड केले आहेत.
या डिजिटल अल्बममध्ये ग्राऊंड झिरोचे प्रत्यक्ष घटनास्थळावरून काढलेले फोटो आहेत आणि उंचीवरून काढलेले फोटोही आहेत. याशिवाय ढिगारा साफ करणारे कामगार, या टॉवर्सच्या आजूबाजूच्या इमारतींमध्ये आतमधून झालेली नासधूस याचेही फोटो आहेत.
हायजॅक करण्यात आलेल्या 4 विमानांपैकी दोन वर्ल्ड ट्रेड सेंटरला धडकली, एक पेंटागॉनजवळ तर एक पेन्सलव्हेनियामधल्या शेतात कोसळलं. यामध्ये जवळपास 3000 जणांचा मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles
"सेलदरम्यान सहसा या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. आम्ही जर या सीडीज घेतल्या नसत्या तर त्या कचऱ्यात टाकून देण्यात आल्या असत्या, "डॉ. जोनाथन बर्गेस सांगतात. त्यांचा सहकारी जेसन स्कॉटने या सेलमधून सीडीज विकत घेतल्या होत्या."

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles
"या सीडीज मधून डेटा मिळवता आला, हेच आश्चर्यकारक आहे. त्या काळच्या सीडीज आता खूपच खराब झालेल्या असतात. "
यातले काही फोटो रिकव्हर करण्यासाठी त्यांनी 'सीडी रिकव्हरी सर्व्हिस'ची मदत घेतली.

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles
पण या फोटोग्राफरला किंवा त्याच्या नातेवाईकांना शोधून काढण्यात आपल्याला किंवा स्कॉट यांना यश आलं नसल्याचं डॉ. बर्गेस सांगतात.

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles
9/11च्या नंतरच्या हाहाःकारादरम्यान ज्यांनी काम केलं त्या सर्वांना नंतर व्याधींनी ग्रासलं. 'सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अॅंड प्रिव्हेंशननुसार (सीडीसी) तब्बल 4 लाख लोक हे विषारी गोष्टींच्या संपर्कात आले किंवा त्यांना इजा झाली किंवा त्यांना या सर्व गोष्टींचा मानसिक त्रास झाला.

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles
हे सगळे फोटो शेअर करणं हे मानवतेच्या दृष्टीने योग्य असल्याचं डॉ बर्गेस म्हणतात. हे फोटो पाहून एखाद्या व्यक्तीला मानवतेसाठी काही काम करण्याची प्रेरणा मिळाली तर नक्कीच चांगली गोष्ट ठरेल असं बर्गेस म्हणतात.
फ्लिकरवरील त्यांच्या कलेक्शनमधले हे काही फोटो.

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles

फोटो स्रोत, Jason Scott/Textfiles
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








