थेरेसा मे यांच्यानंतर कोण? ब्रिटनचा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ही 5 नावं

ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून तोडगा काढू न शकल्याने ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी 7 जूनरोजी पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे.
2016 मध्ये घेण्यात आलेल्या जनमत चाचणीच्या निकालांचा सन्मान करण्यासाठी राजीनामा देत असल्याचं मे यांनी म्हटलं होतं. ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण करू न शकल्याचं अतीव दु:ख झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
नवीन पंतप्रधानांनी ब्रेक्झिट प्रक्रियेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं देशाच्या हिताचं आहे, असं त्या म्हणाल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
नवीन पंतप्रधान नियुक्त होईपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान असतील. त्यामुळे मे यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी दावेदार कोण, यासाठी वेगवेगळी नावं पुढे येत आहेत.
पण हे पद जितकं प्रतिष्ठेचं आहे, तितकंच डोकेदुखीचंही ठरू शकतं, हे 2016मध्ये झालेल्या ब्रेक्झिट सार्वमतानंतर स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनेक चर्चा रंगू लागल्या आहे.
ब्रिटनचे बारा खासदार पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहेत. यापैकी पाच नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत - परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, माजी परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन, आरोग्य मंत्री मॅट हॅनॉक, रोरी स्टुअर्ट आणि एस्टर मॅके.
पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर इतर खासदारांची सहमती मिळवण्यासाठी आणखी कसोशीने प्रयत्न करावे लागतील, असं मॅट हॅनॉक यांनी म्हटलं आहे.

थेरेसा मे यांच्या राजीनाम्यासह सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात यावी, अशी मागणी विरोधी लेबर (मजूर) पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्यासह अन्य नेत्यांनी केली आहे.
तातडीने सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येऊ नयेत, असं हॅनॉक यांनी आपली उमेदवारी जाहीर करताना म्हटलं आहे. "सार्वत्रिक निवडणुका घेऊन ब्रेक्झिटचा प्रश्न सुटणार नाही, उलट निवडणुका घेणं ब्रिटनसाठी भयावह असेल. विद्यमान खासदारांशी चर्चा करून ब्रेक्झिटप्रश्नी तोडगा काढू," असं हॅनॉक यांनी सांगितलं.
'बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वामध्ये काम करणार नाही'
"ब्रेक्झिटप्रश्नी बोरिस जॉन्सन यांची भूमिका योग्य नाही, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काम करणार नाही," असं रोरी स्टुअर्ट यांनी स्पष्ट केलं आहे. सर्व नेते, खासदार आणि मंत्री यांनी ब्रेक्झिटप्रश्नी खरं बोलण्याची आवश्यकता आहे, असं स्टुअर्ट यांचं मत आहे.

फोटो स्रोत, AFP
स्टुअर्ट पुढे म्हणाले, "असं बोलताना मला कसंतरीच वाटतंय, परंतु बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वात मी काम करणार नाही. बोरिस यांच्या भूमिका अनेकदा पटणाऱ्या नसतात. काही दिवसांपूर्वीच मी त्यांच्याशी चर्चा केली होती, त्यावेळी ते म्हणाले होते की कोणत्याही कराराविना युरोपियन युनियनमधून बाहेर पडू. मात्र आता ते याच्या अगदी उलट बोलत आहेत. त्यांचं अलीकडचं वक्तव्य तर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला धुळीस मिळवून देईल.
बोरिस जॉन्सन यांनी 2016 मध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याविषयीच्या सार्वमतावेळी LEAVE गट अर्थात युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या चळवळीचं नेतृत्व केलं होतं.
सत्ता हातात आल्यानंतर ऑक्टोबरमध्ये करारवर स्वाक्षरी करत किंवा कराराविना युरोपियन युनियनमधून बाहेर पडू, असं जॉन्सन यांनी म्हटलं आहे.
ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण करणं युरोपियन युनियनचं प्राधान्य आहे, असं युरोपियन कमिशन जो क्लॉ यंकर यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








