न्यूझीलंड : मशिदींवरील हल्ला एकाच व्यक्तीने घडवला?

फोटो स्रोत, Getty Images
न्यूझीलंडमध्ये ख्राइस्टचर्च इथल्या 2 मशिदीतील हल्ला एकाच व्यक्तीने घडवला असू शकतो, असा पोलिसांचा कयास आहे. शुक्रवारी झालेल्या या गोळीबारात 50 लोकांचा बळी गेला होता.
या संशयित हल्लेखोराचं नाव ब्रेन्टन टरांट (28) असं आहे. तो ऑस्ट्रेलियातील असून गौर वर्णियांना उच्च मानणारा आहे.
या प्रकरणात आणखी 3 जणांना अटक केली असून त्यांचा यात सहभाग नसावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पण याबद्दल आताच काही निष्कर्ष काढता येणार नाही, असं पोलीस आयुक्त माईक बुश यांनी म्हटलं आहे.
हल्ल्यातील 2 जखमींची प्रकृती गंभीर आहे.
अल नूर आणि लिनवूड मशिदीतील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, असं बुश म्हणाले. ही प्रक्रिया संवेदनशील आहे, असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी यापूर्वी देशात बंदूक बाळगण्याच्या कायद्यात बदल केला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.
हा हल्ला अतिशय सुनियोजित पद्धतीने करण्यात आला होता. हल्लेखोराजवळ शस्त्रांचा परवाना होता. हल्ल्यात पाच बंदुकांचा वापर करण्यात आला.
त्याचवेळी शस्त्रांसकट एका व्यक्तीला अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीला सोडून देण्यात आलं आहे. ही व्यक्ती पोलिसांना मदत करू इच्छित होती असं तपासाअंती लक्षात आलं आहे.
'आमचं शहर बदललं आहे'
क्राईस्टचर्च च्या महापौर लिएन डायझील यांच्या मते मशिदीवर झालेल्या हल्ल्यामुळे शहराचा संपूर्ण चेहरामोहराच बदलला आहे.
शहरातील सगळे झेंडे अर्ध्यावर उतरवले जातील. तसंच शहरात होणाऱ्या खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितांवर ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिथून जवळच असलेल्या बॉटनिकल गार्डनची भिंत श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित केली जात आहे.
जगभरातून श्रद्धांजली

फोटो स्रोत, PA

फोटो स्रोत, Reuters

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, EPA
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








