Roger Federer : रॉजर फेडररचा निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम, स्टानिस्लास वावरिंका 59 मिनिटांमध्ये केला पराभव

रॉजर फेडरर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉजर फेडरर शंभराव्या जेतेपदासह

Indian Wells स्पर्धेत रॉजर फेडररने स्टानिस्लास वावरिंकाचा 6-3,6-4 असा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला आणि निवृत्तीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. फेडररला हा विजय मिळवायला फक्त 59 मिनिटं लागली.

गेले काही दिवस अजूनमधून फेडररच्या निवृत्तीची चर्चा होत आहे. पण आपल्यामध्ये अजून टेनिस बाकी असल्याची चुणूक त्यानं दाखवून दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच दुबई टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत फेडररने स्टेफानोस सिटसिपासवर 6-4, 6-4, असा विजय मिळवत शंभराव्या जेतेपदाला गवसणी घातली होती.

100 जेतेपदांचा बादशाह

20 ग्रँड स्लॅम जेतेपदं नावावर असणारा फेडरर एकूण शंभर जेतेपदं पटकावणारा दुसरा खेळाडू ठरला. याआधी जिमी कॉनर्स यांनी हा विक्रम रचला होता. त्यांच्या नावावर 109 जेतेपदं आहेत.

वर्षाच्या सुरुवातीलाच होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सिटसिपासनेच फेडररला नमवण्याची किमया केली होती. फेडररने विक्रमी जेतेपद पटकावताना दोन महिन्यांपूर्वीच्या पराभवाची परतफेड केली.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घरच्या मैदानावर बेसेल इथं 99वं जेतेपद पटकावलं होतं. शंभराव्या दुर्मिळ जेतेपदासाठी फेडररला बराच काळ प्रतीक्षा करावी लागली.

''मी पहिलं जेतेपद जिंकलं तेव्हा स्टेफानोसचा जन्मही झाला की नाही ठाऊक नाही. नव्या दमदार उदयोन्मुख खेळाडूंविरुद्धही खेळण्याची संधी मिळणं महत्त्वाचं आहे. पीट सॅम्प्रस, आंद्रे आगासी अशा दिग्गजांबरोबर खेळता आलं हा माझ्यासाठी सन्मान आहे. स्टेफानोसचं भविष्य उज्वल आहे. टेनिसचं भवितव्य नैपुण्यवान खेळाडूंच्या हाती आहे'', असं फेडररने शंभराव्या विजयानंतर बोलताना सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

अशी मारली त्याने 100व्या जेतेपदापर्यंत मजल

अशी मारली त्याने 100व्या जेतेपदापर्यंत मजल

19 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत फेडररने ग्रास, हार्ड तसंच क्ले अशा विभिन्न स्वरुपाच्या कोर्ट्सवर आपलं नैपुण्य सिद्ध केलं. जगभरातील 30 शहरं आणि 19 देशांमध्ये फेडररने ही जेतेपदं जिंकली आहेत.

ग्लोबल सम्राट

4 फेब्रुवारी 2001 रोजी मिलान इन्डोअर स्पर्धेत फेडररने कारकीर्दीतलं पहिलंवहिलं जेतेपद पटकावलं होतं. त्यावेळी तो 19 वर्षांचा होता.

त्यावेळी बीबीसी स्पोर्ट्स वेबसाईटने या जेतेपदाची बातमी दिली होती. फेडरर हा उदयोन्मुख गुणवान टेनिसपटू

आहे असं त्याचं वर्णन करण्यात आलं होतं. जागतिक क्रमवारीत अव्वल 15 मध्ये येण्याचं उद्दिष्ट असल्याचं फेडररने त्यावेळी सांगितलं होतं.

तेव्हापासून 30 विविध स्पर्धा आणि चार विविध खंडात मिळून फेडररनं हा विक्रम प्रस्थापित केला आहे.

घरच्या मैदानावर बेसेल आणि जर्मनीतील हाल या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धा फेडररच्या आवडीच्या आहेत. या दोन्ही ठिकाणी फेडररने प्रत्येकी 9 जेतेपदं जिंकली आहेत.

ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी विम्बल्डन ही फेडररची आवडती स्पर्धा. विम्बल्डन स्पर्धेची आठ जेतेपदं फेडररच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलियन ओपनची सहा आणि अमेरिकन ओपनची पाच तर फ्रेंच ओपनचं एक जेतेपद फेडररनं पटकावलं आहे.

फेडररच्या शंभर जेतेपदांपैकी 50 जेतेपदं युरोप खंडात, 24 उत्तर अमेरिकेत, 18 आशिया तर 8 ऑस्ट्रेलिया खंडात मिळवली आहेत.

फेडरर विक्रमपट

  • 30 शहरं
  • 548 मॅचेस
  • 83,302 गुण
  • 46,508 गुणांची कमाई
  • 4,378 बिनतोड सर्व्हिस
  • 52,152 मिनिटं कोर्टवर

दिग्गजांशी तुलना

या जेतेपदासह जिमी कॉनर्स यांच्या 109 जेतेपदांच्या दिशेने फेडररने दमदार पाऊल टाकले. जिमी कॉनर्स यांनी 1972 ते 1989 या कालावधीत एवढ्या प्रचंड जेतेपदांची कमाई केली होती.

सर्वाधिक जेतेपदांच्या यादीत कॉनर्स आणि फेडररनंतर इव्हान लेंडल (94), राफेल नदाल (80), जॉन मॅकेन्रो (77) ही दिग्गज मंडळी आहेत.

15 ग्रँड स्लॅम जेतेपदं नावावर असणारा नोव्हाक जोकोव्हिचच्या नावावर 73 जेतेपदं आहेत. अँडी मरेच्या नावावर 45 जेतेपदं आहेत.

100 जेतेपदांपैकी फेडररची 20 जेतेपदं ग्रँड स्लॅम स्पर्धांची आहेत. हा एक सार्वकालीन विक्रम आहे.

सर्वाधिक जेतेपदांच्या यादीत फेडरर अजूनही कॉनर्स यांच्या थोडा मागे आहे पण ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या बाबत फेडररने कॉनर्स यांच्यावर सरशी साधली आहे.

फेडररने एटीपी फायनल्स स्पर्धेची सहा जेतेपदं पटकावली आहेत. दर वर्षाच्या शेवटी जागतिक क्रमवारीत अव्वल आठ खेळाडूंमध्ये ही स्पर्धा होते. या स्पर्धेची सर्वाधिक जेतेपदं फेडररच्या नावावर आहेत.

फेडररच्या अन्य जेतेपदांचं वर्गीकरण एटीपी मास्टर्स 1000, एटीपी 500 आणि एटीपी 250 अशी आहेत.

फेडररने 1000 मास्टर्स स्पर्धांची 27 जेतेपदं पटकावली आहेत. एटीपी 500 स्पर्धांची 22 तर एटीपी 250 स्पर्धांची 25 जेतेपदं फेडररने जिंकली आहेत.

कोणाशी मुकाबला?

फेडररने जेतेपदावर नाव कोरताना 50 खेळाडूंना नमवण्याची किमया केली आहे.

अंतिम लढतीत फेडरनने राफेल नदालला सर्वाधिक 10 वेळा हरवलं आहे. अँडी रॉडिकला 7 वेळा तर नोव्हाक जोकोव्हिचला 6 वेळा नमवून फेडररने जेतेपदावर नाव कोरलं आहे.

फेडररने जेतेपदं पटकावताना 52,152 मिनिटं वेळ कोर्टवर व्यतीत केला आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर फेडररने जेतपदांसाठी 869 तास म्हणजेच 36 दिवस व्यतीत केले आहेत.

कोणतं वर्ष सगळ्यात यशस्वी?

फेडररसाठी जेतेपदांच्या दृष्टीने 2006 वर्ष सगळ्यात यशस्वी ठरलं होतं. यावर्षी त्याने तब्बल 12 जेतेपदांवर नाव कोरलं होतं.

दुखापतीमुळे 2016 वर्ष फेडररसाठी खूपच वेदनादायी ठरलं होतं. या वर्षी फेडररला जेतेपदांनी हुलकावणी दिली. त्या वर्षी प्रदीर्घ काळ त्याला खेळताही आलं नाही. सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर 2017 मध्ये फेडरर कोर्टवर परतला. नव्या ऊर्जेसह खेळणाऱ्या फेडररने 7 जेतेपदांवर नाव कोरलं. विम्बल्डन स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा सगळ्यात जास्त वयाचा खेळाडू ठरला.

फेडररने 2004 मध्ये पहिल्यांदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. जागतिक क्रमवारीत फेडरर 310 आठवडे होता. हाही एक विक्रम आहे.

कोणतं कोर्ट आवडतं?

शंभर जेतेपदांपैकी फेडररने हार्ड कोर्टवर 69 जेतेपदं पटकावली आहेत. ग्रासवर 18, क्ले कोर्टवर 11 तर कारपेटवर 2 जेतेपदं पटकावली आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)