पाकिस्तानात IAFने केलेल्या कारवाईत भारताने 'जैश-ए-मोहम्मद'चा तळ खरंच नष्ट केला का? - ग्राउंड रिपोर्ट

पाकिस्तानी नागरिक

बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपापली बाजू मांडली.

26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा भागातील बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण तळाला लक्ष्य केल्याचं भारताने सांगितलं. या कारवाईत तिथे असलेल्या अनेक अतिरेक्यांना ठार केल्याचा दावा भारताने केला.

"या मोहिमेत मोठ्या संख्येने दहशतवादी, प्रशिक्षक, वरिष्ठ कमांडर आणि तिथे प्रशिक्षण घेणाऱ्या जिहादींना ठार करण्यात आलं," असं भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी हल्ला झाला त्या दिवशी सांगितलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

मात्र तिथे कुठलंच प्रशिक्षण शिबीर नव्हतं, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. "भारताने एका निर्मनुष्य ठिकाणी बाँब टाकले आणि पाकिस्तानी हवाई दलाने उत्तरादाखल केलेल्या कारवाईनंतर भारताच्या लढाऊ विमानांनी पळ काढला," असं पाकिस्तानने म्हटलं होतं.

असे दावे-प्रतिदावे सुरू होते, तेव्हा दोन्ही देशांमधील वृत्तसंस्था आपापल्या भूमिका मांडत होत्या. काही भारतीय चॅनल्सने तर पाकिस्तानात 300 अतिरेकी ठार झाल्याचंही म्हटलं.

काही बातम्या अशाही आल्या की बालाकोटमध्ये अतिरेक्यांसाठी सहा एकर जागेवर एक शिबीर उभारण्यात आलं होतं. तिथे अनेक सोयीसुविधा होत्या आणि कट्टरतावाद्यांना तिथे सर्व प्रकारचं प्रशिक्षण मिळायचं.

मात्र हे दाव्यांची सत्यता निष्पक्षपणे सिद्ध होऊ शकलेली नाही.

सैनिक

फोटो स्रोत, AFP

दुसरीकडे पाकिस्तानने आपल्या दाव्यांची सत्यता दाखवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मीडियाला बालाकोटमधल्या जाबामध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं.

बालाकोटमधल्या जाबा टॉप या ठिकाणी हल्ला भारतीय वायुदलाने हल्ला केला होता.

पाकिस्तानच्या सैन्याच्या देखरेखीत मीडियाला जाबाला नेण्यातही आलं. तिथल्या परिस्थितीविषयी केलेल्या रिपोर्टिंगचे सार वाचा -

बीबीसीचा ग्राउंड रिपोर्ट

भारतीय वायुदलाच्या हवाई कारवाईनंतर बीबीसीच्या सहर बलोच यादेखील बालाकोटला गेल्या. या हल्ल्यात जखमी झालेल्या नूरान शाह या स्थानिकाशी त्यांनी बातचीत केली.

शाह यांचं घर घटनास्थळाजवळच आहे. त्यांनी सांगितलं, "काल रात्री मी झोपलो होतो. तेव्हा कानठाळ्या बसवणाऱ्या आवाजाने मी उठलो. मी उठलो तेव्हा खूप मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यावर मी बाहेर पडायचा प्रयत्न केला. मला वाटलं, हे काहीतरी भयंकर आहे. मी दाराजवळ आलो तेव्हा तिसरा स्फोट झाला. ते ठिकाण 15 मीटर किंवा त्यापेक्षा जवळ असेल."

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

"दुसरा स्फोट झाला तेव्हा दरवाजे तुटले. तेव्हा मी, माझी मुलगी आणि माझी बायको आम्ही तिघं तिथंच बसलो. मी वाटलं, आता आम्ही तिघं मरणार. त्यानंतर खाली थोड्या अंतरावर चौथा स्फोट झाला. आम्ही तिथेच बसून राहिलो.

"थोड्या वेळाने आम्ही उठलो. बाहेर पडलो तर बघितलं की घराच्या भिंती, छप्पर यांना तडे गेले होते. अल्लाहने आम्हाला वाचवलं. माझ्या डोक्यावर थोडी दुखापत झाली आहे. पाय आणि कमरेवर थोड्या जखमा आहेत," असं त्यांनी सांगितलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

पाकिस्तानी सैन्याच्या येण्याने त्या भागातील रहदारीवर काय परिणाम झाला, याविषयी तिथल्या एका विद्यार्थ्याने सांगितले, "सकाळपासून लोकांना इथे यायला बंदी घातली आहे."

खैबर पख्तुनख्वाच्या हेल्थ कमिशनने या भागात खबरदारीचा उपाय म्हणून 100 बेड लावले.

अल-जझिराने काय लिहिलं?

भारताच्या कारवाईनंतर कतारचे न्यूज ब्रॉडकास्टर अल-जझिराने एका वृत्तात लिहिलं: "बुधवारी हल्ल्याच्या ठिकाणी गेल्यावर अल-जझिराला दिसलं की उत्तर पाकिस्तानच्या जाबा टॉपबाहेर जंगल आणि दुर्गम भागात चार बाँब पडले होते. बाँबस्फोटामुळे झालेल्या खड्ड्यांमध्ये झाडं आणि दगडं पडली होती. मात्र तिथे कुठल्याही प्रकारचा ढिगारा किंवा जीवितहानी झाल्याचे पुरावे नव्हते."

भारतीय हवाई हल्ल्यानंतर तिथे मृतदेह किंवा कुणी जखमी झाल्याचं दिसलं नाही, असं स्थानिक हॉस्पिटलचे अधिकारी आणि तिथे पोहोचलेल्या रहिवाशांनी सांगितलं.

त्या भागात जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिराविषयी स्पष्ट माहिती मिळाली नाही. जिथे बाँब झाले, तिथून एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका डोंगरमाथ्यावर एक मदरसा आहे. हा मदरसा जैश-ए-मोहम्मद चालवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

काही अंतरावर एक साईनबोर्ड होता, त्यावरून स्पष्ट झालं की तिथे शाळा आहे, जी एक सशस्त्र गट चालवत होता.

या बोर्डावर तलीम-उल-कुरा मदरशाचा प्रमुख मसूद अझहर असल्याचं आणि मोहम्मद युसूफ अझहर प्रशिक्षक असल्याचं सांगण्यात आलं होतं.

काही लोकांनी सांगितलं की तिथे स्थानिक शाळेतील मुलं शिकतात. मात्र काहींनी सांगितलं की तिथे जैशच्या मुलांचं प्रशिक्षण केंद्र होतं.

जब्बाचं जंगल

एका व्यक्तीने ओळख उघड न करता सांगितलं, "डोंगरावर उभारलेला मदरसा अतिरेक्यांचं प्रशिक्षण शिबीर होतं."

31 वर्षांच्या दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं, "तिथे जैशचं शिबीर असल्याचं प्रत्येकालाच माहिती होतं. तिथे लोकांना युद्धाचं प्रशिक्षण दिलं जायचं."

मात्र काही अंतरावर राहणाऱ्या मीर अफजल गुलजार यांनी सांगितलं, "इथे कुठलंही शिबीर नव्हतं आणि अतिरेकीही नव्हते. इथे 1980मध्ये मुजाहिद्दीनचं शिबीर होतं. मात्र आता ते नाही."

31 जानेवारी 2004ला विकिलीक्सने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा एक मेमो लीक केला होता. त्यात म्हटलं होतं की जाबाजवळ जैश-ए-मोहम्मदचं प्रशिक्षण शिबीर आहे. तिथे शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचं बेसिक आणि अॅडव्हान्स्ड प्रशिक्षण दिलं जातं.

रॉयटर्सचा रिपोर्ट

ब्रिटनची न्यूज एजन्सी 'रॉयटर्स'ने जाबाच्या दौऱ्यानंतर लिहिलं आहे:

तिथे हल्ल्यात जखमी झालेला केवळ एक पीडित आहे. त्याच्या उजव्या डोळ्यला दुखापत झाली आहे. जाबामध्ये वरच्या डोंगरांकडे बोट दाखवत गावकऱ्यांनी सांगितले की इथे चार बाँब पडल्याच्या खुणा आहेत, आणि झाडं पडलेली आहेत.

त्या भागात वॅन चालवणाऱ्या अब्दुल रशीद यांनी सांगितलं, "या स्फोटांनी सगळंच हादरलं होतं. कुणी मेलेलं नाही, काही झाडं पडली आहेत आणि एका कावळा मेला आहे."

नूरान शाह

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, नूरान शाह यांनी रॉयटर्सशी संवाद साधला

जाबा हे डोंगरी भागात वसलं आहे. इथे अनेक नद्याही आहेत. तिथूनच कघान घाटाचा रस्ता उघडतो, जे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. तिथे 400 ते 500 लोक मातीच्या घरात राहत असल्याचे स्थानिक सांगतात.

'रॉयटर्स'ने साधारण 15 लोकांशी बातचीत केली. मात्र नूरान शाहशिवाय कुणीही जखमी नव्हतं, असं त्यांना कळलं.

अब्दुल रशीद यांनी सांगितलं, "मी इथे एकही मृतदेह बघितला नाही. केवळ एकच स्थानिक कुठल्यातरी वस्तूने जखमी झाला आहे."

जाबाजवळ असलेल्या हॉस्पिटलच्या बेसिक हेल्थ युनिटचे एक अधिकारी मोहम्मद सादिक त्या रात्री ड्युटीवर होते. त्यांनी सांगितलं, "हे खोटं आहे. आम्हाला एकही जखमी व्यक्ती सापडलेली नाही."

मात्र तिथे जैश-ए-मोहम्मद असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. जैश-ए-मोहम्मदचं इथे प्रशिक्षण शिबीर तर नाही, मात्र एक मदरसा आहे, असं कळलं.

नूरान शाह म्हणाले, "हा तालीम-उल-कुरान एक मदरसा आहे. गावातील मुलं तिथे शिकतात. तिथे (शस्त्रांचं) प्रशिक्षण दिलं जात नाही."

मदरशाचं 'जैश-ए-मोहम्मद'शी कनेक्शन आहे, असं सांगणारा तो साईनबोर्ड गुरुवारी काढण्यात आला आणि मीडियाला तिथे जाण्यापासून रोखण्यात आलं. मात्र मागून ती मदरशाची इमारत दिसत होती आणि तिचं काहीही नुकसान झालेलं नव्हतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 4

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)