Rose Day : व्हॅलेंटाईन वीक म्हणजे काय? आज 'चॉकलेट डे' आहे तर उद्या 'टेडी डे'

फोटो स्रोत, Getty Images
'व्हॅलेंटाईन वीक' सुरू आहे. 14 फेब्रुवारीला साजरा केला जाणाऱ्या 'व्हॅलेंटाइन डे' पूर्वीचा हा आठवडा प्रेमाच्या विश्वात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
प्रेमात असलेल्या तरुणाई या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात.
व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा इतिहासही फारच रोमांचक आहे. रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो.
पूर्वी हा दिवस एखादं फुल किंवा एखादी भेटवस्तू देऊन साजरा केला जायचा. पण आता त्याची परिभाषाच बदली आहे.
फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली की, तरुणांमध्ये उत्सुकता असते ती 14 फेब्रुवारीची म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे' ची. पण या 'व्हॅलेंटाइन डे'ची सुरूवात एका आठवड्यापूर्वीच होते. काही लोक आपल्या पार्टनरला फुल, गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात. कुणी पार्टनरला रोमॅंटिक डेटला घेऊन जातं. चला जाणून घेऊ कोणत्या दिवशी कोणता डे साजरा केला जाणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
07 फेब्रुवारी: रोज डे
तर या वीकची सुरुवात होते 'रोज डे' ने. प्रेमाचं प्रतिक असलेला गुलाबाचं फूल देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. लाल गुलाब हे प्रेमाचं प्रतिक आहे.
तर जो प्रेमात आहे, पण समोरच्या व्यक्तीला अजून जाणून घ्याचं असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये गुलाबी रंगाचं गुलाब दिलं जातं. त्याशिवाय, पिवळा, नारंगी, पांढऱ्या रंगाच्या गुलाबाचींही वेगवेगळी महत्त्व आहे.

फोटो स्रोत, Getty Images
08 फेब्रुवारी: प्रपोज डे
दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीकडे आपल्या भावना व्यक्त करू शकता. या दिवसाचे हेच महत्त्व आहे.
त्यामुळे हा दिवस आणखी खास आणि अविस्मर्णिय कसा करता येईल त्याचं नीट प्लॅन करायला विसरू नका.

फोटो स्रोत, Getty Images
09 फेब्रुवारी: चॉकलेट डे
व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस हा चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी गोड खाऊन केली जाते. आणि त्यात चॉकलेट आवडत नाही, असा क्वचितच कोणी सापडेल.
बाजारात पण चॉकलेटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळ चॉकलेटच्या गोडव्या प्रमाणे प्रेमाचा गोडवा वाढण्यासाठी तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीला चॉकलेट देवून हा दिवस साजरा करू शकता.

फोटो स्रोत, Getty Images
10 फेब्रुवारी - टेडी डे
प्रेमात पडल्यावर प्रिय व्यक्तीला टेडी बिअर भेट देण्याची पद्धत आहे. विशेषत: मुलांना. व्हॅलेंटाईन वीकमधील चौथा दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो.
चॉकलेट्स प्रमाणे त्यातही अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या प्रियकराची आवड ओळखा, आणि एक छानसा टेडी भेट वस्तू म्हणून द्या.

फोटो स्रोत, Getty Images
11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे
रोज, चॉकलेट आणि टेडी गिफ्ट केल्यावर आता वेळ आलीये, एकमेकांना वचन देण्याची. त्यामुळेच व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी प्रॉमिस डे साजरा केला जातो.
कोणत्याही रिलेशनशिपमध्ये सुरूवातीपासूनच कमिटेड असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्रॉमिस डेला तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रेमात वचन देता तेव्हा त्यांचा तुमच्यावरील विश्वास आणखी दृढ होतो आणि नातं मजबूत होत जातं.

फोटो स्रोत, Getty Images
12 फेब्रुवारी - हग डे
'हग करणं' म्हणजे मिठी मारणं. प्रेम व्यक्त करण्याचं ते एक सुंदर माध्यम असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कुशीत असता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त शांत आणि निवांत वाटतं.
त्यामुळे कितीही व्यस्त असला तरी दररोज एकमेकांना भेटल्यावर हग करायला मुळीच विसरू नका. आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी 'हग डे' अवश्य सेलिब्रेट करा.

फोटो स्रोत, Getty Images
13 फेब्रुवारी - किस डे
व्हॅलेंटाईन वीक मधील सर्वात महत्त्वाचा आणि रोमॅंटिक दिवस म्हणजे किस डे. कारण या दिवशी प्रेमीयुगूल किस करून त्यांच्या मनातील प्रेमभावना एकमेकांना व्यक्त करत असतात. व्हॅलेंटाईन वीक अधिक रोमॅंटिक करण्यासाठी किस डे ला तुमच्या प्रिय व्यक्तीला किस करायला मुळीच विसरू नका.

फोटो स्रोत, Getty Images
14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाइन डे
आणि आता व्हॅलेटाईनच्या आठवड्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस... 14 फेब्रुवारी! प्रेम करण्याऱ्या व्यक्तीसाठी 'व्हॅलेंटाईन डे' हा एक स्पेशल दिवस असतो. 'व्हॅलेंटाईन डे' हा या आठवड्याचा जरी शेवटाचा दिवस असला तरी प्रेमवीरांसाठी त्यानंतरचा प्रत्येक दिवस तितकाच खास असतो. तरूण मुलं -मुली हा दिवस अगदी जल्लोषात साजरा करतात.
आता तुमच्या व्हॅलेंटाईनला सरप्राईज देण्यासाठी काहीतरी मस्त प्लॅन करा आणि हा वीक जल्लोषात सेलिब्रेट करा.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








