किम जाँग-उन: 'अमेरिकेने आपला शब्द पाळला नाही तर उत्तर कोरिया धोरण बदलेल'

फोटो स्रोत, Reuters
आण्विक नि:शस्त्रीकरणाबाबत उत्तर कोरिया कटीबद्ध आहे. पण अमेरिकेने जर आपल्यावरील निर्बंध शिथिल केले नाहीत तर या धोरणात कोणत्याही क्षणी बदल होऊ शकतो, असा इशारा उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांनी दिला आहे.
नववर्षाच्या निमित्ताने देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी असं वक्तव्य केलं.
गेल्या वर्षी याच निमित्ताने केलेल्या भाषणात त्यांनी उत्तर कोरियाच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वपूर्ण बदल होत असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं. त्या भाषणापूर्वी उत्तर कोरियाने अनेक महत्त्वाकांक्षी आण्विक चाचण्या घेतल्या होत्या. त्यापैकी काही अण्वस्त्र थेट अमेरिकेपर्यंत पोहोचतील, असाही दावा उत्तर कोरियाने केला होता. त्यामुळे त्यावेळी प्याँगयांग आणि वॉशिंग्टन यांच्यात अनेक शाब्दिक चकमकी झाल्या होत्या.
पण गेल्या वर्षभरात किम यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांची कोरियांच्या सीमेवर भेट घेतली तर जून 2018मध्ये किम यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची सिंगापूर येथे भेट घेतली.
नववर्षाला देशाला उद्देशून भाषण करण्याची परंपरा उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक किम इल-सुंग यांनी सुरू केली होती, जी किम जाँग-उन पुढे नेत आहेत.

फोटो स्रोत, EPA
सहसा हे भाषण उत्तर कोरियाच्या जनतेला ध्यानात ठेऊन केलं जातं. यामध्ये देशाची प्रगती, अर्थव्यवस्था याबाबत भाष्यं केलं जातं. पण प्याँगयांगचा जगाबाबतचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय विश्लेषक हे भाषण कानात तेल ओतून ऐकत असतात.
"सगळ्या जगासमोर दिलेल्या आश्वसनांचं अमेरिकेनं पालन केलं नाही आणि उलट त्यांनी आर्थिक निर्बंध घालून उत्तर कोरियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर नाईलाजानं आम्हाला देशाच्या सुरक्षेसाठी नवे पर्याय शोधावे लागतील," असं यंदाच्या भाषणात किम म्हणाले.
बीबीसी कोरियन सर्व्हिसच्या सोलस्थित प्रतिनिधी लॉरा बीकर यांच्या मते, अमेरिकेनं 2019मध्ये आश्वासनं पूर्ण करावीत, अशी उत्तर कोरियाची अपेक्षा आहे. नाहीतर अण्वस्त्र निर्मिती पुन्हा सुरू होईल, असा या भाषणाचा अर्थ होतो.
बंदी घातलेले बॅलिस्टिक आणि आण्विक मिसाईलची निर्मिती केल्याच्या कारणांवरून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनंही उत्तर कोरियावर आर्थिक प्रतिबंध घातले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, उत्तर कोरिया अण्वस्त्र निर्मिती आणि प्रसार थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि ट्रंप यांच्या भेटीसाठी आपण कधीही तयार आहोत, असंही ते म्हणाले.
NK Newsचे ऑलिव्हर हॉथम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "किम यांच्या भाषणाचा कल अपेक्षित होता. कोरियन जनतेसमोर स्वत:ची उंची वाढवणं, अमेरिकेला सकारात्मक पण खंबीर इशारा देणं तसंच दक्षिण कोरियासोबत सहकार्याची चाचपणी करणं, असं या भाषणातून दिसून येतं."
गेल्या वर्षभरात बदलाचे वारे
गेल्या वर्षीच्या भाषणात त्यांनी दक्षिण कोरियात होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक्समध्ये उत्तर कोरिया भाग घेणार असल्याचं जाहीर केलं होते. त्यानंतर कोरियन देशातील संबंधात एक नवं पर्व सुरू झालं.
2017मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडीनंतर एप्रिल 2018मध्ये किम जाँग-उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जे-इन यांच्यात कोरियन दोन्ही देशाच्या सिमेवर भेट झाली होती. त्यांनतर त्यांच्यात दोनदा भेटी-गाठी झाल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
पण जून 2018मध्ये सिंगापूर येथे किम आणि ट्रंप यांची भेट ही 2018मधली ऐतिहासिक घटना ठरली. या भेटीत उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातले संबंध सुधारण्यासाठी आणि आण्विक नि:शस्त्रीकरणाच्या दिशेने काम करण्याची दोन्ही देशांनी तयारीही दर्शविली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
ट्रंप-किम यांच्या भेटीनंतर मात्र दोन्ही देशांच्या संबंधात फारशी सुधारणा झाली नाही. पण भविष्यात चांगल्या सुधारणांची अपेक्षा आहे, असं जाणकरांचं मत आहे.
उत्तर कोरियाने मिसाईल आणि अण्वस्त्रांची निर्मिती थांबवली असली तरी कोरियन द्वीपकल्पाच्या संपूर्ण आण्विक नि:शस्त्रीकरणाबाबत अमेरिका साशंक आहे.
उत्तर कोरियाने काही अण्वस्त्र चाचणी प्रणाली नष्ट केल्या आहेत. पण छुप्या पद्धतीने कोरिया अण्वस्त्र निर्मिती करत असल्याचा अमेरिकेचा दावा आहे.
फेब्रुवारीपर्यंत किम यांच्यासोबत दुसरी भेट होईल, असं ट्रंप यांनी याआधी म्हटलं आहे. पण त्याबाबत कोणतीही तारिख निश्चित केलेली नाही.
दुसऱ्या कोरियन परिषदेसाठी किम परत एकदा दक्षिण कोरियाला भेट देतील, अशी अपेक्षा आहे. पण त्याबाबतही अजून काही जाहीर केलेलं नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








