Freedom Trashcan: लिपस्टिक

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, कामाच्या ठिकाणी मेकअप करून वावरणाऱ्या महिलांना इतर महिला सहकाऱ्यांच्या तुलनेत अधिक पगार मिळतो.
500 अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड आर्थिक पसारा असलेली ही कॉस्मेटिक इंडस्ट्री सौंदर्याचा आभास देते, असं टीकाकार सांगतात.
काही आशियाई देशांमध्ये गोऱ्या कांतीला उजाळा देणाऱ्या प्रॉडक्टसची चलती आहे. पण अनेक ठिकाणी कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट्सच्या जाहिराती निषेधाला किंवा आंदोलनाला आमंत्रण देतात.
या जाहिराती बनवतानाच मूळ व्हीडिओत मोठया प्रमाणावर बदल केले जातात. या जाहिराती पाहून सर्वसामान्य महिला स्वत:ची मॉडेल्सशी तुलना करू लागतात.
अमेरिकेत सफ्रागेट्स या महिला गटाने पहिल्यांदा लिपस्टिकचा स्वीकार केला. महिलांनी नम्र असावं, या अपेक्षेला उत्तर म्हणून त्यांनी असं केलं. मात्र आता अनेक महिला सामाजिक अपेक्षांच्या दडपणाविरोधात जागृत होत, मेकअपविना सेल्फी काढून ते सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.







