'भारत आमच्या नद्यांचं पाणी अडवतो' म्हणत पाकिस्तानने घातली भारतीय चॅनेल्सवर बंदी

पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचं सुप्रीम कोर्ट

पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने सर्व भारतीय टीव्ही चॅनेलवर पुन्हा एकदा बंदी घालून तिथल्या कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फिरवला आहे.

पाकिस्तानात जाणाऱ्या नद्यावर धरणं बांधून भारत त्यांचं पाणी अडवत आहे, म्हणून ही बंदी न्याय्य आहे, असं सरन्यायाधीश साकिब निसार म्हणाले.

भारत या धरणांचा वापर एखाद्या शस्त्रासारखा करत आहे, असं पाकिस्तानचं म्हणणं होतं. भारताने या आरोपांचा इन्कार केला आहे.

भारतीय टीव्ही चॅनेल आणि चित्रपट पाकिस्तानात लोकप्रिय आहेत. मात्र दोन्ही देशांमधल्या ताणतणावामुळे याधीही पाकिस्तानने अशा प्रकारची बंदी घातली होती.

लाहोर हायकोर्टाचा निर्णय फिरवताना निसार म्हणाले, "पाकिस्तानात येणाऱ्या नद्यांचं पाणी भारत रोखण्याचा प्रयत्न करतो आहे. मग आपण त्यांचे चॅनेल्स का बंद करू नये?"

पाकिस्तानातील 80 टक्के जमीन सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांवर अवलंबून आहे, ज्यांचा उगम हिमालयातून होतो.

1965 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तानने पहिल्यांदा भारतीय चित्रपटांवर बंदी घातली होती. ती बंदी 2008 मध्ये उठवली. मात्र ही बंदी वेळोवेळी घातली गेली.

2016 मध्ये काश्मीर मधील वादग्रस्त प्रदेशात झालेल्या निदर्शनांवर भारताने कारवाई केली होती. त्यानंतर पाकिस्तानने भारतातील सर्व टीव्ही आणि रेडिओ चॅनेल्सवर बंदी घातली होती. त्यामुळे पाकिस्तानातील सर्व चित्रपटगृहांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर काही काळानंतर ही बंदी उठवण्यात आली होती.

2016 मध्येच भारत प्रशासित काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या हल्ल्यात 18 जवानांचा बळी गेला होता. त्यानंतर पाकिस्तानी कलाकारांच्या भारतात काम करण्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)