दोन कोरिया एकत्र आले मग भारत-पाकिस्तान एक होऊ शकतील का?

भारत आणि पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारत आणि पाकिस्तान
    • Author, वुसअतुल्लाह खान
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, पाकिस्तानहून बीबीसीसाठी

दुसऱ्या महायुद्धात कोरियाची फाळणी झाली. त्यानंतर दोन देशांनी सलग तीन वर्षं युद्ध केलं. गेली 65 वर्षं ते सतत युद्धजन्य परिस्थितीत राहिले तरी दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांनी आता मात्र हातमिळवणी करायचं ठरवलं आहे.

इतक्या वर्षांच्या वैमनस्यानंतर दोन्ही कोरियांचे नेते एकत्र आले. हे चित्र महिन्याभरापूर्वी अकल्पनीय होतं. मग भारत आणि पाकिस्तान एकत्र येऊ शकतील का? अशी चर्चा सोशल मीडियावर सध्या सतत सुरू आहे. पण याचं सरळ उत्तर 'नाही' असं असणार आहे.

पूर्व आणि पश्चिम जर्मनी जसं एकत्र आले तसं कोरियाचे दोन भाग एकत्र यायला काही वेळ लागणार नाही. कारण त्यांची भाषा एकच, संस्कृती समान, खान-पान एक सारखंच आहे आणि दोन देशांच्या इतिहासातही बरंच साम्य आहे.

या उलट भारत-पाकिस्तान हे दोन वेगवेगळे देश आहेत. त्यांना एकत्र न यायला अनेक कारणं आहेत.

समजा उत्तर कोरियात मुस्लीम आणि दक्षिण कोरियात हिंदू लोक राहत असते, तर सात दशकांपूर्वी झालेल्या विभाजनाविषयी 2018 मध्ये दोन्हीकडचे लोक एकमेकांविषयी काय विचार करत असतील?

कोरियन लोकांचं नाक अगदी छोटं असतात, म्हणून ते एकमेकांना सहज भेटू शकतात. पण भारत आणि पाकिस्तानच्या लोकांचं नाक इतकं लांब असतं की ते समोर आले तर एखाद्याचं नाक कापलंही जाईल पण ते भेटणार नाही, गळून पडेल, पण झुकणार नाही.

सांगायचं म्हणजे दोन देशांचं नाक, म्हणजेच त्यांचा मान जास्त महत्त्वाचा आहे. मग अशात भारत आणि पाकिस्तान हे सामान्य शेजाऱ्यांसारखे राहू शकत नाही का?

नक्कीच आपण शांततेत राहू शकतो, पण का राहावं आम्ही तसं? आम्ही गुण्यागोविंदानं राहिलो तर आमच्यात आणि जगात काय फरक काय? सगळं किती कंटाळवाणं होऊन बसेल, नाही का?

आपल्याकडे भांडायला किती काही आहे, याचा विचार करा ना - काश्मीर आहे, अण्वस्त्र आहेत, संघाचा राष्ट्रवाद आहे, हाफीज सईद आहे, एकीकडे RAW तर दुसरीकडे ISI आहे, अफगाणिस्तान आहे, वाघा-अट्टारी सीमेवरची रुबाबदार परेड आहे, द्विपक्षीय चर्चा टाळण्याची शंभर कारणं आहेत. आपापल्या पिढ्यांमधल्या लोकांना मूर्खात काढणारा खोट्या इतिहासांचे कारखाने आहेत.

दोन्ही कोरियांमध्ये मैत्री झाली, ऐक्य झालं तर आश्चर्य वाटायला नको. त्यांच्याकडे काय आहे सुरकुत्या पडलेल्या आजींशिवाय? मग कुठे ते कोरिया आणि कुठे आपण - भारत-पाकिस्तान?

पाहा व्हीडिओ : ...मरणानंतर सगळे इथे एकत्र येतात

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : पाकिस्तानातल्या डेरा ईस्माईल खानच्या मुनावर शाह कब्रस्तानात तालिबानी आणि त्यांनी ठार केलेले लोक एकत्रितपणे चिरनिद्रा घेतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)