त्सुनामी, ज्वालामुखी, भूकंप का येतात? सायन्स काय सांगतं?

ज्वालामूखी

फोटो स्रोत, Reuters

इंडोनेशिया, सुमात्रा आणि इतर काही देशांत 2004ला त्सुनामीने हाहाकार उडवला होता. इथं वारंवार येणाऱ्या भूकंप आणि त्सुनामीमुळे अनेक नागरिकांचा बळी जातो.

इंडोनेशिया आणि या परिसरातील इतरही देशांत येणाऱ्या भूकंप, ज्वालामुखींचा उद्रेक आणि त्सुनामी या मागचं कारण आहे पॅसिफिक महासागराच्या भोवतीने असणारी 'रिंग ऑफ फायर'. ही रिंग ऑफ फायर आहे तरी काय?

पॅसिफिक बेसिनच्या भोवतीने समुद्राच्या आत पोटातील भूभागाच्या तळाशी Volcanic Arcs आणि Oceanic Trenchesची मालिका आहे. याला Ring of Fire असं म्हटलं जातं.

Oceanic Trenchesम्हणजे समुद्राच्या तळाशी असलेल्या जमिनीवरील खोलगट भाग होय. याची रुंदी कमी असते पण यांची लांबी फार जास्त असते. समुद्रातील सर्वांत खोलगट भाग म्हणजे Oceanic Trenches होय.

टेक्टॉनिक प्लेटच्या सीमा ज्या ठिकाणी एकमेकांना भिडतात आणि एक प्लेट दुसऱ्या प्लेटवर चढते त्या भागाला Subduction Zones म्हटलं जातं. तर या प्रक्रियेला Subduction म्हटलं जातं. या प्लेट जिथं एकमेकांवर चढतात अशा ठिकाणी ज्वालामुखींची साखळी असते. जी टेक्टॉनिक प्लेट खाली जाते ती वितळून जो मॅग्मा तयार होतो त्याचा आकार कमानीसारखा असतो. यांना Volcanic Arcs म्हटलं जातं.

ज्वालामूखी

फोटो स्रोत, Getty Images

पॅसिफिक बेसिनच्या महासागराभोवतीच्या Volcanic Arcs आणि Oceanic Trenchesच्या या शृखंलेला Ring of Fire असं नाव असण्याचं खास कारण आहे. ते म्हणजे इथं सर्वांत जास्त भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेक होत असतात. हा झोन जगातील सर्वांत मोठ्या टेक्टॉनिक प्लेटच्या सीमांवर आहे.

समुद्राच्या वर जितके जागरूक ज्वालामुखी आहेत, त्यातील अर्धे ज्वालामुखी या रिंगवर आहेत, म्हणून याला रिंग ऑफ फायर म्हटलं जातं.

भूगर्भातील तीव्र हालचाली

1960च्या दशकापर्यंत संशोधकांनी 'प्लेट टेक्टॉनिक' हा सिद्धांत विकसित केला होता. ज्वालामुखी आणि भूगर्भीय फिचर्स यांचं विश्लेषण या सिद्धांताने केलं आहे.

या सिद्धांतानुसार पृथ्वीचा पृष्ठभाग टेक्टॉनिक प्लेटच्या पॅचवर्कने बनला आहे. या विशाल टेक्टॉनिक प्लेटची जाडी 80 किलोमीटर इतकी मोठी असते. या प्लेट मंदगतीने पृथ्वीच्या लवचिक अशा गाभ्यावर हलत असतात.

रिंग ऑफ फायर

या प्लेटचा आकार आणि जागा काळाच्या ओघात बदलत असतात. यांचा वेग वर्षाला साधारण 1 सेंटिमीटर ते 10 सेंटिमीटर इतका असतो.

महासागरांच्या मध्यभागी लाव्हा बाहेर येण्याने सतत नवीन सी-बेड तयार होत असतात. समुद्राच्या पाण्यामुळे हा लाव्हा अल्प काळात थंड होतो.

नव्याने तयार होणाऱ्या Ocean Crustला जागा करून देण्यासाठी या प्लेट्स हलत असतात. त्यांच्या हालचालींमुळेच टेक्टॉनिक प्लेटच्या कडांच्या भागात मोठ्या भूगर्भीय घडामोडी होत असतात.

हालचालींमुळे काय होतं?

टेक्टॉनिक प्लेट एकमेकांपासून दूर जाऊ शकतात. त्यामुळे नव्या Ocean Floorला जागा निर्माण होते. काही प्लेट एकमेकांच्या दिशेने हालचाल करतात. त्यामुळे एका प्लेटची सीमा दुसऱ्या प्लेटच्या खाली जाते. फार मोठी हालचाल न होता हे होऊ शकतं.

टेक्टॉनिक आणि भूकंप

प्लेटच्या सीमांचा काही भाग एकमेकांच्या विरुद्ध दिशेने घसरतात, त्यातून लहान भूकंप येतात. San Andreas Fault हे याचं उदाहरण आहे. अशा फॉल्टमुळे Ocean Bedच्या वर हजारो फूट उंचीच्या कडा निर्माण होतात.

ज्वालामूखी

फोटो स्रोत, Getty Images

पण जेव्हा एखादी प्लेट दुसऱ्या प्लेटवर धडकते आणि दुसऱ्या प्लेटला खाली ढकलते तेव्हा जी प्लेट खाली असते तिचा खडकाचा काही भाग उष्ण तापमान आणि दाबामुळे वितळतो. नव्याने तयार झालेला हा मॅग्माचा पृथ्वीच्या पृष्ठभागातून उद्रेक होतो आणि अशांतून ज्वालामुखींची शृंखला तयार होते.

Subduction Zonesचा संबंध Ocean Trenchesशी आहे.

जेव्हा समुद्राच्या आता भूकंप येतो तेव्हा Ocean Floorचा एकभाग खाली घसरतो. अशा व्हर्टिकल फॉल्टमुळे त्सुनामी येते. स्विमिंगपूलमध्ये लाटा निर्माण करण्यासाठी व्हेवमशिनचा जसं काम करत तसंच हे आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)