'सगळीकडे युद्ध पेटलं असतानाही मी सीरियात बार सुरू करण्याचा निर्णय घेतला'

सोमर हाझिम
फोटो कॅप्शन, सोमर हाझिम
    • Author, मॅट वारेहम
    • Role, न्यूजबीट प्रतिनिधी

2011मध्ये सीरियात गृह युद्ध सुरू झालं. त्याचा देशातल्या पर्यटन व्यवसायाला प्रचंड फटका बसला. त्यातूनच सोमर हाझिम यांना त्यांचं हॉटेल बंद करावं लागलं.

या परिस्थितीत लाखो लोकांना सीरिया सोडावं लागलं. पण, व्यवसाय पूर्ण बुडालेला असतानाही सोमर यांनी सीरियातच राहायचा निर्णय घेतला.

तीन वर्षांपूर्वी त्यांनी एक कंपनी सुरू केली आणि सरकार नियंत्रित सीरियाच्या राजधानीत दमास्कसमध्ये एक बार सुरू केला.

दमास्कसमधील नाईट लाईफ (रात्र जीवन) आनंददायी असतं असं सोमर सांगतात.

अर्थात, या महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या बातम्यांनुसार राहाण्यास सर्वांत योग्य अशा शहरांमध्ये दमास्कसचा क्रमांक तळाचा आहे.

तोफांच्या गडगडाटात ड्रिंक

2015मध्ये बार सुरू केला तेव्हाची आठवण सोमर सांगतात. "नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तो खरंच अवघड काळ होता. प्रत्येक जण ही जागा, हा बार बघायला येत होता. ज्यांनी ऐन युद्धकाळात हा बार सुरू केला त्या लोकांना बघायला लोक येत होते," असं सोमर यांनी Radio 1 Newsbeatला सांगितलं.

सोमर यांचा बार

फोटो स्रोत, COSETTE

युद्ध जोमात सुरू असताना बारमध्ये पैसा गुंतवणं हा मूर्खपणा आहे, असं सोमर यांना त्यांच्या मित्रांनी ठणकावलं. आपण एक जुगार खेळत आहोत, हेही त्यांना माहिती होतंच.

"तोफांचा गडगडाट होत असताना तुम्हाला त्यामधून जावं लागतं आणि मग ड्रिंक मिळतं. मला वाटतं याच कल्पनेनं अनेक लोकांना आकर्षित केलं, बारबद्दल भुरळ घातली," सोमर पुढे सांगतात.

उन्हाळ्याच्या सुरुवातीस रशियन सैन्याच्या मदतीनं सीरिया सरकारनं दमास्कसच्या उरलेल्या भागातील बंडखोरांनाही पराभूत केलं.

सोमर यांचा बार

फोटो स्रोत, COSETTE

"शहराला अलीकडे जी काही स्थिरता मिळाली आहे, त्यामुळे इथल्या नाईटलाईफला एक ओळख प्राप्त झाली आहे. सुरुवातीला एका रस्त्यावर अशी 3 ते 4 ठिकाणं होती. पण आता त्याच रस्त्यावर तुम्हाला 30 ठिकाणं पाहायला मिळतील," असं सोमर सांगतात.

गेल्या 7 वर्षांचा विचार केल्यास आता राजधानीतलं जनजीवन पूर्वपदावर आलं आहे, असं अनेकांना वाटू शकतं. पण आजही सीरियातलं युद्ध संपलेलं नाही.

सीरिया

फोटो स्रोत, AFP

UNनुसार, आजही सीरिया आणि इराकमध्ये इस्लामिक स्टेटचे 20,000 ते 30,000 कट्टरवादी आहेत.

असं असलं ती सोमर आशावादी आहेत.

"दमास्कसमध्ये आम्ही अनुभवलेला तो वाईट काळ होता. दमास्कस आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही, त्याचं रुपांतर एका वेगळ्या शहरात होत आहे," सोमर पुढे सांगतात.

सोमर यांची जुनी हॉटेल

फोटो स्रोत, SOMAR HAZIM

फोटो कॅप्शन, सोमर यांचं जुनं हॉटेल

दमास्कसमध्ये पुन्हा हॉटेल सुरू करण्याचा ते विचार करत आहेत.

"पर्यटक यायला लागले तर मी माझं हॉटेल पुन्हा सुरू करू शकतो. गेल्या 7 वर्षांत जे काही घडलं आहे ते विसरण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. मला वाटतं, आमच्याकडील सर्वोत्कृष्ट गोष्टी लवकरच तुम्हाला पाहायला मिळतील," असंही ते म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)