इंडोनेशिया भूकंप: '...तेव्हा त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर रक्त होतं'

फोटो स्रोत, Reuters
इंडोनेशियाला पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाचा हादरा बसला आहे. रविवारी रात्री आलेल्या या भूकंपाचे धक्के लाँबॉक बेटाला जाणवले आणि अनेक इमारतींना नुकसान झालं. जवळजवळ 100 जणांचा मृत्यू झाला असून किमान 10,000 लोक जखमी झाले आहेत.
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.9 इतकी होती. भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे हजारो इमारतींना तडे जाऊन नुकसान झालं. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.
लाँबॉकचं शेजारील बेट असलेल्या बाली बेटावर भूकंपानंतर नागरिक सैरावैरा पळत असल्याची दृश्यं CCTV कॅमेऱ्याने टिपले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
शेजारच्या गिली बेटावर अडकलेल्या साधारण हजार पर्यटकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने बोटी पाठवलेल्या आहेत.
लाँबॉक बेट जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षण आहे. आठवडाभरापूर्वी या बेटावर आलेल्या शक्तिशाली भूकंपातून बीबीसी मराठीचे प्रतिनिधी विनायक गायकवाड थोडक्यात बचावले होते. त्यांचा अनुभव तुम्ही इथे वाचू शकता.
त्यांच्याशी आज आम्ही केलेली चर्चाही इथे पाहू शकता.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
यूएस जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार लाँबॉकच्या उत्तरेला 10 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला होता. मात्र काही तासानंतर हा धोका टळल्याचं आपात्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
भूकंपाने दहशतीत असलेले लोक घरी जाण्यास नकार देत आहेत, त्यामुळे प्रशासन आणि मदत करणाऱ्या संस्था त्यांच्यासाठी तात्पुरती आश्रयस्थळं निर्माण करत आहेत.

इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी बेटांवर अडकलेल्यांना वाचवण्यासाठी मदतीचं आवाहन केलं आहे. आणखी विमानं या बेटांवर पाठवण्यात यावी, असा आग्रह त्यांनी केला आहे.

फोटो स्रोत, BASARNAS / HANDOUT
तीन C-130 Hercules विमानं आणि दोन हेलिकॉप्टर तंबू आणि बचाव सामुग्री पाठवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. पण भूकंपाने अनेक रस्ते आणि पूल खचल्याने घटनास्थळी पोहोचणं अवघड जात आहे.
सर्वाधिक भीषण नुकसान झालेल्या भागांमध्ये वीज पुरवठा तसंच फोन सुविधा खंडित झाल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
सध्या मृतांचा आकडा 98 वर असला तरी तो नक्की वाढेल, कारण किमान 200 लोक जखमी आहेत, असं इंडोनेशिया आपत्ती निवारण संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पुरवो नुग्रोहो यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
उत्तर लाँबॉकमध्ये एक मोठी मशीद कोसळली असून काही अवजड यंत्रं उपलब्ध नसल्याने तिथे नेमके किती जण अडकले आहेत, हे कळत नसल्याचं सुतोपो म्हणाले.
'...अचानक अंधार झाला नि काचा फुटल्या'
मताराम बेटावर उत्तेरस एका हॉटेलात फिलिपा हॉज आपल्या मित्रांबरोबर खात होत्या जेव्हा भूकंपाने सगळंकाही हादरू लागलं.
"अचानक अंधार झाला नि काचा फुटल्या. सर्वत्र गोंधळ उडाला आणि लोक एकमेकांवर पडू लागले. सगळ्यांना बाहेर पडण्याची घाई होती. सगळा मलबा आमच्यावर पडत होता," त्यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, MADE NAGI
"मी खूप वेळ माझ्या पार्टनरला शोधत होती. ओरडून ओरडून त्याला हाक देत होती. अखेर तो सापडला तेव्हा त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर रक्त होतं," फिलिपा यांनी पुढे सांगितलं.
बचावकार्यासाठी झटणाऱ्या 'प्लान इंडोनेशिया इंटरनॅशनल'चे कार्यकारी संचालक डिनी विडियास्तुती यांनी बीबीसीला सांगितलं की लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं, त्यांना आश्रय देणं सध्या सर्वांत महत्त्वाचं आहे.
"हजारो लोक, मुलंसुद्धा शेतांमध्ये असेच उघड्यावर आहेत... कुठल्याही संरक्षणाविना," डिनी सांगत होतं. "या भूकंपाचा फटका लाँबॉकमध्ये प्रचंड प्रमाणावर आहे, गेल्या आठवड्यात झालेल्या भूकंपापेक्षाही हा भूकंप जास्त विनाशकारी होता."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








