फेसबुक, इन्स्टाग्रामवर जास्त वेळ घालवण्यावर येणार निर्बंध

सोशल मीडिया

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या अॅप्सवर लोकांनी किती वेळ घालवावा यावर बंधन घालता यायला हवं, यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम नवीन टूलची निर्मिती करत आहेत.

सोशल मीडियाचा अतिवापर मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतो, या चिंतेतून ही घोषणा करण्यात आली आहे.

फेसबुक, इन्स्टाग्रामवर तुम्ही किती वेळापासून स्क्रोल करत आहात हे तुमचं तुम्हालाही समजणार आहे. या टूलमुळे निर्धारित वेळ पूर्ण झाल्यानंतर रिमांइडरही लावता येईल आणि काही वेळासाठी नोटिफिकेशन्सही बंद करता येतील.

या नव्या टूलमुळे सोशल मीडियाच्या वापरावर परिणाम होईल का? यामुळे फार काही फरक पडणार नाही, असं काही लोकांचं म्हणणं आहे.

"यामुळे लोकांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरण्यात फार काही बदल होईल, असं मला वाटत नाही," असं Oxford Internet Instituteच्या ग्रँट ब्लँक यांनी न्यूजबीटला सांगितलं.

"लोकांनी जास्तीत जास्त वेळ फेसबुकवर व्यतीत करावा, पण सतत येणारी नोटिफिकेशन कंटाळवाणी वाटू नयेत, म्हणून आपल्या व्यावसायिक वृद्धीचं संतुलन राखण्याचा हा प्रयत्न आहे, असं मला वाटतं," ब्लँक पुढे सांगतात.

फेसबुक टूल

फोटो स्रोत, FACEBOOK

डिसेंबर 2017मध्ये फेसबुकनं एक ब्लॉग पोस्ट केला होता. त्यामध्ये फेसबुकवर जास्तीत जास्त वेळ व्यतीत केल्यानंतर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल सांगितलं होतं.

मिशिगन विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्याला सलग 10 मिनिट फेसबुकवर स्क्रोल करण्यास सांगितलं होतं. दिवसाच्या शेवटी या मुलाला अतिशय कंटाळवाणं वाटत होतं. याउलट जी मुलं इतर मुलांसोबत चाट करत होती त्यांची स्थिती ठीक होती.

जी माणसं एखाद्या लिंकवर अनेकदा क्लिक करताता अथवा एकच पोस्ट दोनदा लाईक करतात, त्यांचं मानसिक आरोग्य सरासरीपेक्षा वाईट असतं.

'माझ्या वेळेचा दुरुपयोग'

लाईफस्टाईल व्लॉगर आणि इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्या एम. शेल्डन यांच्या मते, मित्र काय करत आहेत, हेच मी दिवसभर बघत असते.

"हा आपल्या कामाचा एक भाग असला तरी मला वाटतं की, फोन आणि सोशल मीडियाच्या वापरावर आपण खूप अवलंबून आहोत आता. मला थोडा मोकळा वेळ मिळाला तर मी तो स्क्रोल करण्यात घालवते," शेल्डन सांगतात.

Instagram पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त, 1

"मी 24 तास सोशल मीडियावर असते. सतत सोशल मीडियावर असणं ही माझी गरज आहे. हे नवीन टूल किती उपयोगी आहे किंवा कसंय मला माहिती नाही. मी सोशल मीडियाचा खूप जास्त वापर करते, हे मला माहिती आहे. त्यामुळे नवीन काय कळणार हे सांगणं कठीण आहे", शेल्डन सांगतात. "पण रिमाइंडर नोटिफिकेशन्सची मदत होऊ शकते", असं त्यांना वाटतं.

Instagram पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त, 2

"यामुळे फोन थोडा वेळ बाजूला ठेवावा, याची जाणीव मला होऊ शकते. गेल्या 6 तासांपासून तुम्ही हे अॅप वापरत आहात, असं सांगणारा एखादा मेसेज आला तर मी माझा खूप वेळ वाया घालवला, असं मला वाटू शकतं."

'दिवसातील 15 तास ट्विटरवर'

The Goat Agency या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे सहसंस्थापक हॅरी ह्युगो यांच्या मते, हा बदल दीर्घ काळापासून होत आहे.

"सोशल मीडियावर खूप जास्त वेळ घालवतात आणि ज्यांना मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी सोशल मीडियाच्या वापरावर काही मर्यादा घालणं महत्त्वाचं आहे", ते सांगतात.

Instagram पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त, 3

"आपण सोशल मीडियावर कित्येक तास घालवत आहोत, हे त्यांना कळलं तर यामुळे ते विचारप्रवृत्त होतील. टीनएजर असताना मी 15 ते 16 तास ट्विटरवर घालवायचो. पण आता मागे वळून बघताना माझं तसं वागणं आरोग्यासाठी हानिकारक होतं, असं मला वाटतं," असं हॅरी सांगतात.

"आपण सोशल मीडियाचा कसा आणि किती वापर करतो, हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. आपणच फोन सुरू करतो. आपणच इन्स्टाग्राम उघडत असतो. त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण फेसबुकला किंवा कुठल्याही अॅपला जबाबदार ठरवून मोकळं होऊ शकत नाही," हॅरी सांगतात.

"नवीन टूलमुळे सोशल मीडियाच्या वापरास प्रतिबंध होणार असला तरी यामुळे फार काही चांगला बदल होणार नाही," हॅरी मत व्यक्त करतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)