ते तलावाकाठी धर्मोपदेश देत होते, तेवढ्यात मगरीनं झडप घातली...

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Science Photo Library

इथिओपियातल्या एका तलावाजवळ अनुयायांना बाप्तिस्मा देणारे एक ख्रिश्चन धर्मगुरू मगरीच्या हल्ल्यात ठार झाले आहेत.

दक्षिण इथियोपियात रविवारी सकाळी डोको इश्ते हे 80 लोकांचा बाप्तिस्मा समारंभ पार पाडत होते. अबाय तलावाजवळ हा कार्यक्रम सुरू होता.

"एका व्यक्तीला बाप्तिस्मा देऊन झाल्यानंतर ते दुसऱ्या व्यक्तीकडे वळले. तितक्यात मगरीनं पाण्यातून बाहेर उडी घेत त्यांच्यावर हल्ला केला," असं स्थानिक रहिवासी केटेमी कैरो यांनी बीबीसीला सांगितलं.

इथिओपिया

मगरीनं हात, पाय आणि पाठीवर केलेल्या हल्ल्यामुळे डोको यांचा मृत्यू झाला.

"मच्छिमार आणि स्थानिकांनी धर्मगुरू डोको यांना वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आलं नाही," असं पोलीस अधिकारी इनेटू कान्को यांनी सांगितलं.

"डोको यांना मगर तलावात ओढून न्यायच्या प्रयत्नात होती, पण मासेमारीसाठीच्या जाळीचा वापर करून लोकांनी तिला रोखलं. यानंतर मगर पळून गेली," असं कान्को यांनी पुढे सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)