ट्रंप आणि किम 12 जूनला सिंगापूरमध्ये भेटणार

किम

फोटो स्रोत, Getty Images

डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-उन यांची भेट 12 जूनला सिंगापूरमध्ये होणार.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीट करून यांची माहिती दिली आहे. 12 जूनला आम्ही सिंगापूरमध्ये भेटत आहोत तसंच जगातिक शांततेसाठी प्रयत्न करू असं ट्रंप यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दोन्ही नेत्यांमध्ये आतंरराष्ट्रीय पातळीवर चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं होतं. त्यानंतर एप्रिल महिन्यात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटणार असल्याचं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर ही बहुचर्चित भेट होत आहे.

याच भेटीच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियानं 3 अमेरिकी नागरिकांची गेल्या आठवड्यात सुटका केली होती.

यापूर्वीही सिंगापूरमध्ये दोन वेगवेगळ्या देशांच्या प्रमुखांमध्ये वाटाघाटी झाल्या आहेत. 2015मध्ये चीन आणि तैवानच्या नेत्याची ऐतिहासिक भेट सुद्धा याच शहरात झाली होती.

अमेरिका आणि सिंगापूरचे चांगले संबंध आहेत. सिंगापूरचे उत्तर कोरियाशी देखील राजनैतिक संबंध आहेत. पण, गेल्या नोव्हेंबरमध्ये सिंगापूरनं उत्तर कोरियाबरोबरचा सर्व व्यापार थांबला आहे.

हेही वाचलंत का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : कॅमेरांचा क्लिकक्लिकाट, स्मितहास्य आणि थोडाचा विनोद...

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)