बीबीसी मराठीशी संपर्क साधा

तुमच्या प्रतिक्रिया, मतं आम्हाला bbcmarathi या ईमेलवर पाठवा.

तुम्ही पाठवलेले सगळे ईमेल वाचण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देता येईलच, असं नाही. आम्ही तुमच्या ईमेलला प्रतिसाद देऊ किंवा स्पष्टीकरणासाठी थेट तुम्हाला संपर्क करू.

बीबीसी आणि ज्यांच्यावर बीबीसी अवलंबून आहे असे इतर सेवा पुरवठादार, तुमच्या वैयक्तिक माहितीची नोंद करतात. वाचकांच्या सवयीचा अभ्यास करणाऱ्या तसंच तक्रार निवारण करणाऱ्या यंत्रणा या माहितीच्या आधारावर तुमच्या प्रतिक्रिया समजून घेऊन त्यास प्रतिसाद देतात.

माहिती संरक्षण कायद्यानुसार आणि डेटा रिटेन्शन धोरणानुसार बीबीसी आणि आमचे सेवा पुरवठादार तुमची ही माहिती आपल्याजवळच सांभाळून ठेवू शकतात.

मीडियातली एक संस्था म्हणून बीबीसी तुमच्या या माहितीवर काही कायदेशीर कारणांमुळेच प्रक्रिया करेल. याचा उपयोग वाचकांबरोबर संवाद साधणं, त्यांना प्रतिक्रिया देणं, त्यांच्या टिप्पणी आणि शंकांचं समाधान करणं एवढाच आहे.

बीबीसी तुमच्या माहितीचं काय करते, याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही बीबीसीच्या प्रायव्हसी आणि कुकीज पॉलिसी या पानाला भेट द्या. बीबीसी तुमची वैयक्तिक माहिती कशी हाताळतंय, याविषयी तुमच्या तक्रारीवर समाधानकारक उत्तर न मिळाल्यास तुम्ही माहिती आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करू शकता.

आमच्या मजकुरासंदर्भात तक्रार नोंदवायची असेल तर तक्रार पान उपलब्ध आहे.