बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नोटांवर हवा- अनिल परब

नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाळासाहेब ठाकरे

"शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे. शिवसेनेने नोटांसंदर्भात कोणतीही मागणी केलेली नाही. या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. पण मला वैयक्तिकरित्या विचारल्यास बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नोटांवर असावा, अशी माझी मागणी असेल", असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले.

"प्रत्येकाला आपल्या नेत्याचा फोटो नोटांवर हवा असेल तर मी तर शिवसैनिक आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नोटांवर असायला हवा, असं माझं मत आहे. पण माझ्या वाटण्याला काही महत्त्व नाही. शेवटी नोटांवर कुणाचा फोटो असावा, हे सरकार ठरवतं. हा वाद जाणूनबुजून निर्माण करण्यात आला आहे", असं अनिल परब म्हणाले.

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोची मागणी केल्यानंतर आता चलनी नोटांसंदर्भातलं राजकारण तापू लागलंय.

या प्रकरणात देशभरातील अनेक नेत्यांनी उडी घेतली असून नोटांवर फोटो छापण्यासाठी नेत्यांसहित नेटिझन्सकडून पर्याय सुचवले जातायत.

नेमकं प्रकरण सुरु कसं झालं?

तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात एक विचार आल्याचं सांगितलं.

नोट

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले की, "परवा दिवाळी होती. आपण सर्वांनी गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली. सुख आणि शांतीसाठी प्रार्थना केली. व्यापारी तसंच इतर सर्वजण लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती ठेवत असल्याचं आपण पाहतो. रोज सकाळी काम सुरु करण्याआधी त्यांची पूजा करतात. आज माझं केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना आवाहन आहे की, भारतीय चलनावर गांधींजींचा फोटो आहे तो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला गणपती आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावला जावा. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. पण सोबतच देवी-देवतांचे आशीर्वादही हवे आहेत."

एवढंच नाही तर केजरीवालांनी यावेळी इंडोनेशियाचंही उदाहरण दिलं. "सर्व नव्या नोटा बदला असं आमचं म्हणणं नाही. पण नव्या नोटांवर हे फोटो छापत सुरुवात करु शकतो. इंडोनेशियात 85 टक्के मुस्लीम आणि दोन टक्के हिंदू लोकसंख्या आहे. मात्र तरीही त्यांनी नोटेवर गणपतीचा फोटो छापला आहे. मी देशातील 130 कोटी जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करत आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

गुजरात निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्या या विधानाकडे 'हिंदुत्व कार्ड' म्हणून पाहिलं जात असतानाच देशभरातील इतर नेत्यांनीही या वादात उडी घेत अनेक पर्याय सुचवायला सुरुवात केली.

पैसा

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केजरीवाल यांना ट्विटरवर खोचक प्रश्न विचारले आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "कुबेरजींना सोडून दिलं का? भगवान विष्णूंशिवाय लक्ष्मी माता कशा खूश राहणार? आणि नवग्रह? तुम्ही जय श्रीरामचा नारा देता आणि भगवान श्रीरामाला विसरलात? सीतामाता, हनुमानजी नसतील तर अर्थव्यवस्था कशी सुधारणार? या नोटा कत्तलखाने, मांसाहारी हॉटेल, मासळी बाजार आणि बारमध्येही जाणार. मग आपण काय करणार केजरीवालजी?"

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

बाबासाहेबांचा फोटो छापा..

नोटांवर फोटोच छापायचे असतील तर ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला, अर्थक्रांतीचा सखोल अभ्यास केला, त्यांचा फोटो हवा, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली.

फक्त सुषमा अंधारेच नाही तर काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला पसंती दिलीय. तर म्हणतात, "भारतीय चलन हे देशाच्या सार्वभौमत्वाचं प्रतिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या सार्वभौमत्वाला घटनात्मक रुप दिलं आहे, त्यामुळं नोटांवर डॉ. आंबेडकरांचा फोटो असणं हे अधिक लवचिक अर्थात सर्वमान्य होईल."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

हरियाणाचे गृहमंत्री व भाजपचे फायरब्रँड नेते अनिल विज यांनी एका ट्विटद्वारे अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "अखेरीस लक्ष्मीचे पुजारी असणाऱ्या केजरीवालांच्या मनातील गोष्ट ओठांवर आली. बहाणा नोटांवर लक्ष्मी छापण्याचा असला तरी, प्रत्येक काम करण्यापूर्वी लक्ष्मीच त्यांच्या डोळ्यापुढे असेल."

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

दुसरीकडे, भाजपचे आयटी सेलचे इंचार्ज अमित मालवीय यांनीही या प्रकरणी केजरीवालांवर टीका केली आहे. मालवीय एका ट्विटद्वारे म्हणाले की, "केजरीवालांनी नुकताच एक फतवा जारी करून दिल्लीत फटक्यांवर बंदी घातली होती. ते कट्टर हिंदू विरोधी आहेत."

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

चलनी नोटांवर छत्रपती शिवरायांचा फोटो असावा..

विशेष म्हणेज केजरीवालांच्या या मागणीस भाजप नेत्यांकडून विरोध होत असताना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून मात्र पाठिंबा मिळतोय. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी चलनी नोटांवर छत्रपती शिवरायांचा फोटो असावा अशी सूचना केली आहे. नितेश राणे यांनी ट्विटवर 200 रुपयांची नोट पोस्ट करत 'हे परफेक्ट आहे' असं म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

चलनी नोटांवर मोदींचा फोटो लावा

यानंतर भाजपचे आमदार राम कदम यांनीही 500 रूपयांच्या नोटेवर स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापावा अशी मागणी केली आहे.

राम कदम यांनी 500 रुपयांच्या चार नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेला फोटो ट्वीट करत 'अखंड भारत… नया भारत… महान भारत… जय श्रीराम… जय मातादी' असं म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 7
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 7

दरम्यान भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट करत म्हटलंय की, "दिवाळी साजरी केल्यावर तुरुंगात डांबू असं म्हणणारे, राम मंदिर नाकारणारे, काश्मीरी हिंदूंचा करणारे आज राम राम आणि लक्ष्मी गणेश नावाचा जप करतायत. राजकारणातील त्यांच्या यू-टर्नचा आणखी एक भाग आहे. "

X पोस्टवरून पुढे जा, 8
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 8

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)