राहुल देशपांडेंनी लालसिंह चड्ढाचं कौतुक केल्यानं नेटकरी नाराज का झाले?

फोटो स्रोत, Facebook/Rahul Deshpande
बॉलिवूडचा अभिनेता आमिर खानचा सिनेमा 'लाल सिंह चढ्ढा'भोवतीचा वाद काही केल्या क्षमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. आमिर खानसोबतच आता मराठी सिनेसृष्टीतल्या कलाकारांनाही या सिनेमाच्या वादाच्या झळा बसू लागल्या आहेत. ज्येष्ठ गायक वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनाही या सिनेमाच्या वादाचा स्पर्श झाला आहे.
राहुल देशपांडे यांचा आणि या सिनेमाच्या वादाचा नेमका संबंध काय ते आपण पाहुयात. 'लाल सिंह चढ्ढा' 11 ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. त्यावेळी या सिनेमाच्या प्रिमियरला राहुल देशपांडे यांनी सपत्नीक उपस्थिती लावली. सिनेमा पाहून झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या ट्विटर व इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टसोबत राहुल देशपांडे यांनी त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा आमिर खानसोबतचा फोटोही टाकला केला. मात्र, त्यानंतर ट्रोलर्सनी राहुल देशपांडेंना ट्रोल करायला सुरुवात केली. अखेरीस राहुल यांनी स्वतः दुसरी पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहून याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.
इन्स्टाग्रामवरच्या पहिल्या पोस्टमध्ये राहुल देशपांडे यांनी लिहिलंय की "लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट खूप मनापासून बनवलेला आहे. हा चित्रपट आपल्याला आतून ढवळून काढतो. यामध्ये आमिर खान यांचा उत्कृष्ट अभिनय आणि करीना कपूर आणि मोना सिंहची अप्रतिम कामगिरी आहे." तसंच आपल्याला प्रिमियरला बोलावल्याबद्दल त्यांनी आभारसुद्धा व्यक्त केले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 1
त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनी अतिशय तिखट शब्दांत त्यांच्यावर रोष व्यक्त केला . काहींनी त्यांच्या पोस्टचं समर्थनही केलं. लाल सिंह चढ्ढा हा सिनेमा आहे आणि त्या सिनेमांचं कौतुक केलं तर प्रॉब्लेम काय? हाही प्रश्न सोशल मीडियावर लोक मांडताना दिसतायत. मात्र तरीही फेसबुक आणि ट्विटरवरसुद्धा त्यांच्या या पोस्टला रोषाचा सामना करावा लागला. अखेर इन्स्टाग्रामच्या मूळ पोस्टवरच्या कमेंट्स राहुल यांना बंद कराव्या लागल्या. मात्र या सगळ्यावर राहुल यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी दुसरी एक पोस्ट लिहिली आहे.
या नव्या पोस्टमध्ये राहुल यांनी लिहलंय ''नमस्कार मित्रहो, लाल सिंह चढ्ढा ह्या चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळेस मी व्यक्त केलेल्या विधानातून पूर्णतः अनपेक्षित संदेश जातोय, असं मला वाटतंय. त्या प्रिमियरसाठी एक निमंत्रित कलाकार म्हणून, मी त्या चित्रपटासाठी परिश्रम घेतलेल्या पडद्यावरील व पडद्यामागील सर्वांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. ह्याचा अर्थ चित्रपटातील कलाकारांनी ह्यापूर्वी केलेल्या कुठल्याही कृतीचे व त्यांनी मांडलेल्या विचारांचे मी समर्थन करतो असे मुळीच नाही. आपणां सर्वांइतकीच भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे व मला त्याचा अभिमान आहे. म्हणूनच माझ्या विधानाचा विपर्यास करुन घेऊ नये. अशी आपणां सर्वांकडे नम्र विनंती आहे! लोभ आहेच, वृद्धिंगत व्हावा!''
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त, 2
राहुल यांच्या या दुसऱ्या पोस्टचं काहींनी समर्थन केलंय तर काहींनी यावर टीका केली आहे. संगीतकार आणि लेखक आशुतोष जावडेकर म्हणतात, "मूळ पोस्ट मध्ये film with lot of heart it आणि it stirs you from within असे लिहिले आहे. ते आणि हा खुलासा यांचा ताळमेळ बसत नाही आहे. एकतर विरोध स्वीकारून शांत आपल्या मताशी ठाम राहावे. किंवा सरळ निःसंदिग्ध शब्दात माफी मागावी. ते न केल्याने काय होते आहे हे वरती सगळ्या कॉमेंट सांगत आहेतच ! प्रीमियम साठी अनेकदा अनेक जण बोलावतात. आपण कुठे जावे हे अखेर आपल्या हातात असते. आणि त्यावर व्यक्त झाले की त्याची जबाबदारी आपलीच असते. जनमानस म्हणून एक गोष्ट असते ना अखेर. तिला किती गृहीत धरायचे याचे गणित आधी आमिरचे चुकले आणि मग राहुलचे. बाकी अमीर खान याच्या इस्लाम प्रेमाविषयी काय सांगावे. त्यालाही माझा विरोध नाही. हवे त्याने हवे त्या धर्माची उपासना करावी, री ओढावी. पण आपल्या धर्मातील विसंगती टिपण्याचे जर धाडस नसेल तर दुसऱ्याच्या धर्मात ढवळाढवळ करायला जाऊ नये. बाकी आमिर व्यवसाय जाणतो. त्याने लवकर पद्मनाभ मंदिरावर पिक्चर आणला तर मला आश्चर्य वाटणार नाही."
तर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे म्हणतात, "असा खुलासा देण्याची वेळ यावी हेच खेदजनक आहे."
राहुल यांनी मत मांडून त्यांची भूमिका स्पष्ट केलीय. मात्र, लाल सिंह चढ्ढा सिनेमा प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला केल्याचं बोललं त्यामुळे लाल सिंह चढ्ढा सिनेमाभोवतीचा वाद सिनेमालाच फायदेशीर ठरत असल्याचंही म्हटलं जातंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








